एक्स्प्लोर

IIFA 2022 Postponed : यूएईमध्ये होणारा IIFA पुरस्कार लांबणीवर! 'या' कारणामुळे सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय

आयफापुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी या सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 

IIFA 2022 Postponed : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) द इंटरनेशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA)चा  या वर्षीचा पुरस्कार सोहळा पार पडणार होता.  पण आता या सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय आयफानं घेतला आहे. हा निर्णय  यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान (Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan)  यांच्या निधनानंतर आयफा पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी घेतला. शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांच्या निधनानंतर 40 दिवस यूएईमध्ये शोक व्यक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे आयफानं पुरस्कार सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 

आयफाचा पुरस्कार सोहळा 19 ते 22 मे दरम्यान अबू धाबी येथील एका आयलँडवर पार पडणार होता. आता हा सोहळा 14 जुलै  2022 ते 16 जुलै 2022 दरम्यान पार पडणार आहे. याबाबत आयफा पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी एका पोस्टमधून माहिती दिली आहे.  या पोस्टमधून त्यांनी शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांना श्रद्धांजली वाहिली. 

आयफा पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरस्कार सोहळ्याशी संबंधित इतर  माहिती लवकरच शेअर केल्या जातील. IIFA ने तिकीट खरेदीदार आणि चाहत्यांची माफी मागितली आहे. त्यांनी आश्वासन दिले आहे की भारत-UAE मैत्रीचा हा उत्सव नंतर साजरा केला जाईल. 

आयफा हा हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध पुरस्कार आहे. गेली कित्येक वर्ष जगातील विविध शहरांमध्ये हा सोहळा आयोजित केला जात आहे. तसेच बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमधील देखील सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित राहतात. तसेच या सोहळ्यामधील कलाकारांच्या रेड कार्पेट लूकची चर्चा सोशल मीडियावर होत असते. या सोहळ्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकार वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स देखील करतात.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by IIFA Awards (@iifa)

संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांचे  13 मे रोजी  निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. यूएईच्या मिनिस्ट्री ऑफ प्रेसिडेंन्शिअर अफेअर्सने आज अध्यक्ष शेख खलिफांच्या मृत्यूची बातमी जाहीर केली आहे. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
South Star Ravi Prakash: मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....
Filmfare Marathi 2026‘गोंधळ’चा 'फिल्मफेअर मराठी' मध्ये डंका; 19 नामांकनांपैकी 6 पुरस्कार! शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
‘गोंधळ’चा 'फिल्मफेअर मराठी' मध्ये डंका; 19 नामांकनांपैकी 6 पुरस्कार! शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Embed widget