एक्स्प्लोर

Singer Arpit Bala: LIVE कॉन्सर्टमध्ये भयंकर घडलं; गायक ऑडियन्सवर थुंकला, बाटलीही फेकली, नेमकं काय घडलं?

Singer Arpit Bala Trolled: अर्पित बाला याचा लाइव्ह कॉन्सर्टमधला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Arpit Bala viral video spitting on fan: लाईव्ह स्टेज शोदरम्यान अॅक्टर (Live Performance) असो किंवा गायक, बऱ्याचदा त्यांच्यासोबत काही न काही घडत असते.  कधी कलाकारांना स्टेजवर कला सादर करत असताना प्रेक्षकांकडून (Singer viral video) अपमान सहन करावा लागतो.  तर, कधी कलाकार किंवा गायकाचा स्टेजवर परफॉर्मन्स  सादर करत असताना उद्रेक होतो. सध्या एका गायकाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. गायकाला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. फरिदाबादचा  प्रसिद्ध गायक  अर्पित बाला सध्या चर्चेत आहे. अर्पितनं लाइव्ह शोदरम्यान भयंकर गोष्ट केली. त्याचा प्रेक्षकांवर थुंकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

2025 मध्ये  बरगद या गाण्यामुळे अर्पित बालाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.  त्याचं हे गाणं प्रचंड गाजलं.  नुकतंच 28 मार्च रोजी त्याचा परफॉर्मन्स होता. त्याचा कार्यक्रम हैदराबाद येथील  किंगडम क्लब एंड  किचन  येथे झाला.  या कार्यक्रमात त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. मात्र, या कार्यक्रमात भयंकर गोष्ट घडली.  गर्दीतील कुणीतरी गायकावर लाइव्ह कॉन्सर्टवर बाटली फेकली. यावेळी अचानक परिस्थिती बिघडली. 

परिस्थिती बिघडल्याने अर्पितचा संयम सुटला. त्यानं रागाने प्रतिक्रिया दिली. तो यावेळेस भडकला असल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  अर्पित मंचावरुन रागाने विचारतो की,  बाटली कुणी फेकली आहे. त्या व्यक्तीला ओळखल्यावर गायक त्याच्यावर थुंकतो.  तसेच त्याला सर्वांसमोर ओरडतो.  यावेळी उपस्थित सर्व जण त्याला चीअर करतात.  

यावेळी गायक त्या व्यक्तीला, 'इथे बघ.. काय झालं? का भीती वाटली का आता?', असं म्हणाला. गायकाने पुन्हा ती बाटली त्याच्या दिशेनं फेकली. बाटली फेकून तो म्हणाला, 'हे तुझ्या बहिणीच्या लग्नाला हुंडा म्हणून देऊन टाक'. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्या माणसाला बाहेर काढायला सांगितले.  यानंतर अर्पितने उपस्थितांना ताकीद देत सांगितलं की,  'या कार्यक्रमासाठी तुम्ही किती पैसे दिले, याची मला पर्वा नाही', यानंतर त्याने आपला परफॉर्मन्स सुरु ठेवला.

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.  काही नेटकऱ्यांनी गायकावर टीका केली.  तर, काहींनी त्याच्या वागणुकीला योग्य असल्याचं म्हटलं.  सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Bigg Boss marathi season 6: बिग बॉसच्या घरातून 2 तगड्या स्पर्धकांची EXIT; वाइल्ड कार्ड स्पर्धक होणार बाद, चाहते शॉक

महत्त्वाच्या बातम्या

Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget