Hrithik Roshan, Sussanne Khan : ‘एक्स’ आणि ‘नेक्स्ट’सोबत हृतिक-सुझानची पार्टी! सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा!
Hrithik Roshan, Sussanne Khan : पणजीमध्ये रेस्टॉरंट ओपनिंगनंतर सुझानने कार्यक्रमाचे काही अनसीन फोटो पोस्ट केले आहेत. तिने एक मॉन्टाज व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Hrithik Roshan, Sussanne Khan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) याची माजी पत्नी सुझान खान (Sussanne Khan ) हिने गोव्यात स्वतःचे नवे बार-किचन सुरू केले आहे. यावेळी तिने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत तिचा माजी पती-अभिनेता हृतिक रोशन, त्याची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री सबा आझादसोबत (Saba Azad) पोहोचला होता. तर, सुझान खान देखील चर्चित बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत (Arslan Goni) गोव्याला गेली होती. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत आणि गॉसिप कॉरिडॉरमध्येही त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सुझानने स्वतः पार्टीचे अनेक फोटो व्हिडीओ कोलाजच्या रूपात तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एवढेच नाही, तर अर्सलानने तिचे अभिनंदन देखील केले आहे. सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हार्ट आणि कीस इमोजीसह तिची ही पोस्ट शेअर केली आहे.
पाहा पोस्ट :
पणजीमध्ये रेस्टॉरंट ओपनिंगनंतर सुझानने कार्यक्रमाचे काही अनसीन फोटो पोस्ट केले आहेत. तिने एक मॉन्टाज व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने हृतिक आणि सबासोबत पोजही दिल्या आहेत. जास्मिन भसीनसह अनेकांनी सुझानचे अभिनंदन केले आहे. त्याच वेळी, काही फॉलोअर्सला हे चौघे एकत्र पोज देताना पचनी पडत नाहीय. एका यूजरने लिहिले आहे की, ‘हे सर्व पाहून चक्कर आली, नवरा, गर्लफ्रेंड, बायको, बॉयफ्रेंड.’ याला उत्तर देताना कुणीतरी लिहिलंय की, ‘आयुष्य हे मित्रासारखं आहे, वाईट गोष्टी घडतात आणि तुम्ही पुढे जा.’ दुसऱ्या एका फॉलोअरने लिहिले, ‘अभिनंदन, पण तुम्ही आणि हृतिक पुन्हा एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे.’
सुझानने गोव्यात एक आलिशान कॅफे-बार सुरु केला आहे. या पार्टीत तिचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. पूजा बेदी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. या निमित्ताने हृतिक-सबा आणि सुझान-अर्सलन यांच्या नात्यावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा :
- Aathva Rang Premacha : सप्तरंगी प्रेमाचा नवा रंग घेऊन येतेय रिंकू राजगुरू, 'आठवा रंग प्रेमाचा' लवकरच होणार प्रदर्शित
- Ranbir-Alia Wedding : ना 14 ना 17 एप्रिल... 'या' दिवशी आलिया-रणबीर घेणार सात फेरे
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha