हसून हसून पोट दुखेल, बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट एकाच सिनेमात; हाऊसफुल 5 चा ट्रेलर आऊट; पाहा व्हिडीओ
Housefull 5 Trailer Out : हसून हसून पोट दुखेल, बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट एकाच सिनेमात; हाऊसफुल 5 चा ट्रेलर आऊट; पाहा व्हिडीओ

Housefull 5 Trailer Out : हाऊसफुल 5 (Housefull 5 Trailer Out) या चित्रपटाचा ट्रेलरचीप्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 6 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरमध्ये (Housefull 5 Trailer Out) प्रेक्षकांना प्रचंड कॉमेडी पाहायला मिळणार असून, चाहत्यांनी या ट्रेलरला भरभरून पसंती दिली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, आणि जॅकी श्रॉफ यांसारखे अनेक मोठे कलाकार झळकणार आहेत.
View this post on Instagram
ट्रेलरमध्ये काय दाखवण्यात आलंय?
ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की रंजीत डोबरियाल यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक क्रूझवर पार्टी ठेवली आहे. या पार्टीमध्ये ते त्यांच्या संपत्तीच्या वारसदाराची घोषणा करणार असतात. त्यांच्या सर्व मुलांनी या पार्टीला हजेरी लावलेली असते. मात्र, मृत्यूपत्र वाचण्याआधीच रंजीत यांचा खून होतो. आणि इथूनच सुरु होते हास्याने भरलेली मर्डर मिस्ट्री!
जॅकलीन फर्नांडिस, नरगिस फकरी आणि सोनम बाजवा कोणत्या अभिनेत्रीची भूमिका चर्चेत?
ट्रेलर पाहून चित्रपटाची कथा थोडीशी समजते, पण त्यातली कॉमेडी खास आकर्षण ठरणार आहे. अक्षय कुमारचे पंचेस तुफान विनोदी आहेत, तर रितेश देशमुखही आपल्या खास शैलीत धमाल करतो. चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नरगिस फकरी आणि सोनम बाजवा या अभिनेत्रीही दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये अक्षय कुमार माकडांसोबत धमाल करताना दिसतो. तर जॅकी श्रॉफने आपल्या मुलगा टायगर श्रॉफचा प्रसिद्ध डायलॉग "छोटी बच्ची हो क्या?" वापरून प्रेक्षकांना हसवले आहे.
हाऊसफुल 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या भाग कोणत्या वर्षी झाला प्रदर्शित?
हाऊसफुलचा आत्तापर्यंतचा हा 5 वा भाग आहे. पहिला भाग 2010 मध्ये, दुसरा 2012, तिसरा 2016 आणि चौथा भाग 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सर्व भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता पाचव्या भागाचा ट्रेलर पाहूनही प्रेक्षक कौतुक करत थकताना दिसत नाहीत. इतके कलाकार एका चित्रपटात एकत्र पाहायला मिळणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























