मराठ्यांचा इतिहास चुकीचा दाखवला, चित्रपटात मराठ्यांचा ऐतिहासिक पराक्रम कमी लेखण्याचा प्रकार: जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad On Har Har Mahadev: राज्यात हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरून राजकीय राडा सुरू आहे. विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला शो सोमवारी राष्ट्रवादीने बंद पाडला.
Jitendra Awhad On Har Har Mahadev: राज्यात हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटावरून राजकीय राडा सुरू आहे. विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला शो सोमवारी राष्ट्रवादीने बंद पाडला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रेक्षकांसोबतही राडा झाला. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि माताही मावळ्यांचा इतिहास चुकीचा दाखविल्याचा आरोप, राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच हा सिनेमा दाखवला जाऊ नये, अशी त्यांनी मागणी केली आहे. या संदर्भात आज त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. या यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, या चित्रपटात वारंवर मराठा मराठी यात फरक दाखवण्यात आला आहे. तसेच या चित्रपटात मराठ्यांचा ऐतिहासिक पराक्रम कमी लेखण्याचा हा जो प्रकार आहे, हा एका विशिष्ठ मानसिकतेतून होतो, असंही ते म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हर हर महादेव सिनेमावर माझाच नाही तर अनेकांचा आक्षेप आहे. त्या आक्षेपाला धरून मी प्रेक्षकांना विनंती केली होती की, आपण हा सिनेमा पाहू नका. याला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही आणि मी लोकांना बाहेर जायला सांगितलं, असं ते म्हणाले आहे. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला की, त्यावेळी तिथे एक परिचित नावाची व्यक्ती होती. त्यांनी असा आरोप केला आहे की, आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली आहे. यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या तीन पत्रकारांनी बाईट दिली आहे. पत्रकारांनी स्वतः सांगितलं आहे की, तो माणूस दारू पिलेला होता. त्यानी शिवीगाळ केली. त्याने कार्यकर्त्यांवर हात उचलला. त्यानंतर प्रसंग घडला.
राष्ट्रवादीला सिनेमावर आक्षेप होता तर त्यानी सेन्सॉर बोर्डाकडे जायला हवं होत, असं या वादावरून भाजपने म्हटलं होत. यावर बोलताना ते म्हणाले की, सेन्सॉर बोर्ड काय करतं, हे काय नवीन नाही. मात्र अफजल खानाची माहिती बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना देतायत. म्हणजे शिवाजी महाराजांना अफजल खानाची माहिती नव्हती?, असं ते चित्रपटाची एका दृश्याबद्दल बोलताना म्हणाले आहेत. ते म्हणाले, शिवाजी महाराजांना अफजल खानाची संपूर्ण माहिती होती. मात्र चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आला.
हर हर महादेव चित्रपटाची काही दृश्यांवर आक्षेप घेत आव्हाड म्हणाले की, ''बाजीप्रभू देशपांडे हे शिवाजी महाराजांवर तालावर चालवतात. यावर एकातरी मराठी माणसाला विश्वास बसणार का? ते म्हणाले, राजकीय वादावादी बाजूला ठेवा. शिवाजी महाराजांचे नम्र सेवक बाजीप्रभू देशपांडे, आम्ही इतिहासात वाचत आलो. ते बाजीप्रभू परवानगी मागतात की मला शिवाजी महाराजांशी लढायचं आहे. यात त्यांची तलवारबाजी दाखवण्यात आली.''