Highest Paid Actor: अल्लू अर्जुन, सलमान-शाहरुख सोडा, 'हा' मराठमोळा अभिनेता देशातील हाईएस्ट पेड अॅक्टर; एका एपिसोडसाठी घेतोय एवढं मानधन
Highest Paid Actor On Television: सर्वात आधी छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यानंतर त्यानं मोठा पडदा गाजवला आणि आता हाच अभिनेता तब्बल 8 वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

Highest Paid Actor On Television: अनेकजण टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून (Television Industry) बॉलिवूडमध्ये (Bollywood) किंवा टॉलिवूडमध्ये (Tollywood) पदार्पण करतात. म्हणजेच, लहान पडद्यावरुन अनेक सेलिब्रिटी मोठ्या पडद्यावर झळकतात. कपिल शर्मापासून विक्रांत मेस्सीपर्यंत आधी टेलिव्हिजन आणि त्यानंतर बॉलिवूड गाजवणाऱ्या सेलिब्रिटींची यादी मोठी आहे. पण, असा एक कलाकार आहे. ज्यानं सर्वात आधी छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यानंतर त्यानं मोठा पडदा गाजवला आणि आता हाच अभिनेता तब्बल 8 वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 8 वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणारा अभिनेता दुसरा-तिसरा कुणी नसून अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) आहे. आपल्या आगामी टेलिव्हिजन शोसाठी शरद केळकरनं विक्रमी मानधन (Sharad Kelkar Is Highest Paid Actor On Television) घेतल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आता शरद केळकर टीव्हीवरील सर्वात महागडा अभिनेता (Sharad Kelkar Is Most Expensive Actor On TV) बनला आहे.
आपल्या आवाजानं आणि अभिनयानं भल्या भल्या बॉलिवूड कलाकारांसमोर पुरून उरणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे, शरद केळकर. शरद केळकरनं आजवर अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. तसेच, 'पीके', 'रामलीला' आणि 'तान्हाजी' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर, 'लय भारी' या मराठी सिनेमातही शरद केळकरनं दमदार भूमिका साकारली होती. अशातच शरद केळकर आता टीव्हीवर पुनरागमन करत आहे.
View this post on Instagram
इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, शरद केळकर 'तुम से तुम तक' या टेलिव्हिजन शोसाठी दररोज 3.5 लाख रुपये घेतो. या मोठ्या रकमेसह, शरद केळकर टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात महागडा अभिनेता बनला आहे, त्यानं कपिल शर्मा, हिना खान, दिलीप जोशी यांसारख्या दिग्गजांच्या कमाईलाही मागे टाकलं आहे.
शरद केळकरनं 2001 मध्ये 'आक्रोश' आणि 'साथ फेरे' सारख्या शोमधून करिअरला सुरुवात केली. 2013 मध्ये त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला रामलीला'मध्ये काम केलं. मोठ्या पडद्यावर येण्यापूर्वी शरद केळकरनं 'सा रे गा मा पा चॅलेंज', 'रॉक-एन-रोल फॅमिली' आणि 'पती पत्नी और वो' सारखे अनेक टीव्ही शो होस्ट केले होते.
शरद केळकरच्या हिट फिल्म्स
'रामलीला'च्या यशानंतर शरद केळकरनं 'मोहेंजोदारो', 'रॉकी हँडसम', 'भूमी', 'हाऊसफुल 4' आणि 'तान्हाजी' यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय, त्यानं एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली'च्या हिंदी आवृत्तीतील प्रभासला आवाज दिला आहे. 'तुम से तुम तक' या नव्या शोद्वारे शरद केळकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
'तुम से तुम तक'ची कहाणी काय?
'तुम से तुम तक' या शोमध्ये अनु नावाची मुलगी आणि आर्यवर्धन नावाचा 46 वर्षीय उद्योगपती यांच्यातील नातेसंबंधाचं वर्णन करणारी एक असामान्य प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. हा कार्यक्रम सामाजिक रूढी, वर्गभेद, वयाचे अडथळे आणि निःशर्त प्रेम या विषयांवर खोलवर भाष्य करेल. अभिनेत्री निहारिका चौकसी अनुची भूमिका साकारणार आहे आणि शरद केळकर आर्यवर्धनची भूमिका साकारणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















