एक्स्प्लोर

पॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला हायकोर्टाचा दिलासा कायम

अभिनेत्री गेहना वसिष्ठने पॉर्न चित्रपट बनवून ते एका कंपनीला विकल्याचे प्रकरण गाजत असतानाच अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही अश्लील व्हिडीओची निर्मिती केल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं.

मुंबई : पॉर्न व्हिडीओची निर्मिती तसेच अश्लील चित्रीकरणात सहभाग घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे या दोन अभिनेत्रींना मुंबई उच्च न्यायालयानं 6 ऑक्टोबरपर्यंत तूर्तास दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यापुढे यावर सोमवारी सुनावणी पार पडली. याच प्रकरणी राज कुंद्रा आणि उमेश कामत नामक अन्य एका आरोपीलाही हायकोर्टानं दिलेला दिलासा पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवला आहे. अटकेनंतर पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी मुंबई पोलिसांनी आघाडी उघडल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे यासर्वांनी अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

शर्लिन चोप्रानं याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जाची गंभीर दखल घेतल शर्लिनला 15, 16, 17 मार्च रोजी मुंबई पोलिसांसमोर हजर राहून चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. तोपर्यंत तिच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये असे निर्देशही मुंबई पोलिसांना देण्यात आले होते. दिलेल्या निर्देशांनुसार शर्लिन चोप्रा वेळोवेळी चौकशीला हजर झाल्यानं तिच्या अटक पूर्व जामीनाची मुदत वेळोवेळी वाढवण्यात आली आहे.

अभिनेत्री गेहना वसिष्ठने पॉर्न चित्रपट बनवून ते एका कंपनीला विकल्याचे प्रकरण गाजत असतानाच अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही अश्लील व्हिडीओची निर्मिती केल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. युकेतील एका कंपनीनं शर्लिन चोप्रा हिच्याशी अश्लील चित्रपट निर्मितीबाबत करार केला होता. पेड कंटेंट असलेल्या या चित्रपटाची पायरेटेड कॉपी निघाली. त्यामुळे अश्लील चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि त्यात अभिनय केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आय.टी. कायद्यांतर्गत 6 नोव्हेंबर 2020 रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तर अभिनेत्री पूनम पांडेविरोधातही मुंबई पोलिसांनी अश्लील चित्राकरणाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यात अटकपूर्व जामीनासाठी तिनंही हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात शर्लिन आणि पूनमच्या अटकपूर्व जामीनावर एकत्र सुनावणी झाली त्याची दखल घेत हायकोर्टानं 6 ऑक्टोबरपर्यंत शर्लिन आणि पूनमसह इतर याचिकाकर्त्यांविरोधात कोणतीही कठेार कारवाई करण्यास मुंबई पोलिसांना मनाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Toxic Fame Actor Yash: 14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, 'टॉक्सिक' फेम यश एकाच व्यक्तीला करतो फॉलो; इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण, 'ती' एकमेव व्यक्ती कोण? 
14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, 'टॉक्सिक' फेम यश एकाच व्यक्तीला करतो फॉलो; इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण, 'ती' एकमेव व्यक्ती कोण? 
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget