डेट नाईटनंतर हार्दिक पंड्या गर्लफ्रेंडसोबत स्पॉट; पॅप्सची गर्दी पाहताच तिला सुरक्षित कारपर्यंत पोहोचवलं; कोण आहे हार्दिकची गर्लफ्रेंड?
या दोघांना पाहताच पॅपराझींनी गर्दी केली आणि काही क्षणांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. .

Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या मैदानावरील कामगिरीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अलीकडेच हार्दिक पंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा मुंबईत एका रोमँटिक डेट नाईटवर एकत्र दिसले. या दोघांना पाहताच पॅपराझींनी गर्दी केली आणि काही क्षणांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. .
व्हायरल व्हिडीओमध्ये हार्दिक माहिकाचा हात घट्ट धरून तिला गर्दीतून बाहेर काढताना दिसतो. पॅप्स आणि चाहत्यांची गर्दी वाढताच हार्दिकने माहिकाला आधी सुरक्षितपणे गाडीत बसवलं. ती कारमध्ये बसल्यानंतरच हार्दिक तिथून हलला. त्याचा हा प्रोटेक्टिव्ह अंदाज पाहून चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं असून, “खरा पार्टनर असाच असतो”, “हार्दिकचा हा अंदाज मन जिंकणारा असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
𝗚𝘂𝘆𝘀, 𝘁𝗵𝗶𝘀 𝗶𝘀 𝗴𝗲𝘁𝘁𝗶𝗻𝗴 𝗧𝗢𝗢 𝗠𝗨𝗖𝗛 🤬🙏
— Jara (@JARA_Memer) December 25, 2025
A fan tried to approach Hardik Pandya for a selfie but couldn’t get close.
𝗙𝗮𝗻: 𝗕𝗛𝗔𝗔𝗗 𝗠𝗘 𝗝𝗔𝗢 (Go to Hell) 😡
𝗛𝗮𝗿𝗱𝗶𝗸: Either didn’t hear it, or heard it and chose to ignore.
This incident happened… pic.twitter.com/B929w11Iwi
महिकाचा हार्दिकचा तो व्हिडिओ व्हायरल
पण ही घटना काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका वादग्रस्त प्रसंगानंतर समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी माहिका शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पॅपराझींनी चुकीच्या अँगलने शूट केल्यामुळे ती अस्वस्थ झाल्याचं दिसून आलं होतं. या प्रकारानंतर हार्दिकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पॅप्सना प्रायव्हसी जपण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच या डेट नाईटदरम्यान हार्दिक स्वतःच माहिकासाठी ‘बॉडीगार्ड’ बनल्याचं स्पष्ट दिसत आहे.
कोण आहे महिका शर्मा?
माहिका शर्माबद्दल बोलायचं झालं, तर ती पेशाने मॉडेल, अभिनेत्री आणि फिटनेस एक्स्पर्ट आहे. तिनं अनेक नामांकित फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केलं असून मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिरातीही केल्या आहेत. फॅशन आणि फिटनेसशी संबंधित कंटेंटसाठी ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर माहिकाचे 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून, तिच्या पोस्ट्सला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. मॉडेलिंग, फिटनेस प्रोजेक्ट्स आणि ब्रँड एंडोर्समेंट्स हे तिच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. अंदाजे तिची मासिक कमाई 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत असल्याचंही सांगितलं जातं.
हार्दिक आणि माहिका यांचं नातं सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र, या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एकीकडे मैदानावर आक्रमक अंदाज, तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातील हार्दिक पंड्याचा हा वेगळा पैलू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.























