एक्स्प्लोर

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, तटकरेंच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam : 'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ अलिबागमध्ये चित्रीकरण सुरु, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam : मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा नवा चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिक्षणातील बदल, मराठी शाळांची घटणारी संख्या आणि मातृभाषेतून होणाऱ्या जडणघडणीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा अलिबाग येथे महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग उपस्थित होते.

यावेळी आदिती तटकरे म्हणाल्या, ''आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीत शाळेचे मोठे योगदान असते. मातृभाषेतून होणारे शिक्षण विद्यार्थ्यांच्या संस्कारांवर खोलवर परिणाम करणारे आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ या चित्रपटातून समाजाला योग्य संदेश मिळेल आणि तो विचार करायला लावणारा ठरेल. रायगड जिल्ह्यात या चित्रपटाचा मुहूर्त होत असल्याचा मला विशेष अभिमान आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे व निर्मात्या क्षिती जोग नेहमीच समाजाला आरसा दाखवणारे आशयसंपन्न चित्रपट सादर करत असतात. त्यांचा हा नवीन चित्रपटही नक्कीच मनाला स्पर्श करणारा ठरेल.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditi Varda Sunil Tatkare (@aditisuniltatkare)

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''आज मी जे काही आहे, ते माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. मातृभाषेतून शिकताना मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. या चित्रपटातून मातृभाषेतून होणारे शिक्षण कमीपणाचं नसून खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न असेल. मुहूर्ताला मा. आदिती तटकरे यांसारख्या समाजभान असलेल्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.”

क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटात नेमके कोण कोण कलाकार झळकणार आहेत याबाबत मात्र अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Gharat Ganpati Re-release Date: माझ्या कोकणचो रुबाब भारी... गणेशोत्सवाच्या धामधुमीत चित्रपटगृहात 'घरत गणपती' पुन्हा झळकणार, कधी रिरिलीज होणार?

Shah Rukh Khan Reacted On His Shoulder Injury: दुखापतीनंतर शाहरुख खानच्या खांद्याची मोठी शस्त्रक्रिया, म्हणाला, 'नॅशनल अवॉर्ड उचलण्यासाठी माझा एकच हात पुरेसा...'

महत्त्वाच्या बातम्या

Rajnikant Anirudh Kavya Marriage: अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
Avinash Arun Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
Subodh Bhave: सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
Madhuri Dixit Ashok Saraf KBC: 'दोघांनीही आपला खोकला फेमस केला'; अशोक सराफ यांची KBCमध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर संकर्षण कऱ्हाडे म्हणाला...
'दोघांनीही आपला खोकला फेमस केला'; अशोक सराफ यांची KBCमध्ये एन्ट्री, माधुरी दीक्षितसमोर संकर्षण कऱ्हाडे म्हणाला...

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident Parinay Fuke Son: आमदार परिणय फुकेंच्या मुलाने दारुच्या नशेत अनेकांना चिरडलं, एकाचा मृत्यू, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
आमदार परिणय फुकेंच्या मुलाने दारुच्या नशेत अनेकांना चिरडलं, एकाचा मृत्यू, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
NCP Merger: परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
NCP Merger: मोठी बातमी : विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
विलीन न होता थेट NDA सोबत जाऊ, राष्ट्रवादी पवार पक्षात विलिनीकरणावर 4 मतं, R R आबांचे सुपुत्र रोहित पाटलांचाही मोठा निर्णय
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट का मागितली? फडणवीसांच्या भेटीवेळी काय झाली चर्चा, सुनील तटकरेंचं उत्तर, म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवारांची भेट का मागितली? फडणवीसांच्या भेटीवेळी काय झाली चर्चा, सुनील तटकरेंचं उत्तर, म्हणाले...
Mumbai Crime News: आईला भेटून परतली; गर्दीमुळे घाईघाईत जनरल डब्यात चढली, बापाच्या वयाच्या व्यक्तीकडून किळसवाणं कृत्य, विरोध करताच ट्रेनमधून खाली ढकललं, नायगाव स्टेशन प्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी
आईला भेटून परतली; गर्दीमुळे घाईघाईत जनरल डब्यात चढली, बापाच्या वयाच्या व्यक्तीकडून किळसवाणं कृत्य, विरोध करताच ट्रेनमधून खाली ढकललं, नायगाव स्टेशन प्रकरणाची स्टार्ट टू एंड स्टोरी
पाण्यासाठी नागरिकांचे आमदारांना खडे बोले, चंद्रकांत पाटलांनी झेडपी अध्यक्षांना सुनावले; माफी मागत तातडीने काम फत्ते
पाण्यासाठी नागरिकांचे आमदारांना खडे बोले, चंद्रकांत पाटलांनी झेडपी अध्यक्षांना सुनावले; माफी मागत तातडीने काम फत्ते
Embed widget