एक्स्प्लोर
Shivaji Satam Birthday : बँकेत कॅशियर ते सीआयडी; 'रामायण'मालिकेतील 'या' अभिनेत्यामुळे शिवाजी साटम यांचं आयुष्य बदललं
सीआयडी या मालिकेमधील शिवाजी साटम (Shivaji Satam) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
बँक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी एका बँकेत कॅशियर म्हणून काम केले. मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ अभिनेते आणि रामायणात राजा दशरथाची भूमिका साकारणाऱ्या बाळ धुरी यांच्यासोबत शिवाजी यांची भेट झाली. त्यांनी शिवाजी यांना अभिनयात पदार्पण करण्यासाठी संधी दिली. शिवाजी यांनी 1988 मध्ये रिलीज झालेल्या पेस्टोनजी या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
View this post on Instagram
शिवाजी साटम यांच्या 'नायक', 'वास्तव', 'गुलाम-ए-मुस्तफा', 'चाइना गेट', 'यशवंत', 'जिस देश में गंगा रहता है', 'हू तू तू' आणि 'सूर्यवंशम' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या सीआयडी या मालिकेमधील शिवाजी साटम यांच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली. अभिनयाबरोबरच शिवाजी हे चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मिती देखील करतात.
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement