Happy Birthday Prabhudeva : भारताचा ‘मायकल जॅक्सन’, सलमान खानच्या चित्रपटामुळे प्रभू देवाला मिळाली दिग्दर्शक म्हणून ओळख!
Prabhudeva Birthday Special : अष्टपैलुत्वाने संपन्न प्रभुदेवा केवळ कोरिओग्राफरच नाही तर, एक उत्तम अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक देखील आहे.

Prabhudeva Birthday Special : प्रभुदेवा (Prabhudeva) हे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक आहेत. प्रभुदेवा 3 एप्रिलला आपला वाढदिवस साजरा करतात. कोरिओग्राफर म्हणून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. आपल्या शानदार नृत्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्याच्या दमदार नृत्यशैलीमुळे त्यांना ‘भारताचा मायकल जॅक्सन’ देखील म्हटले जाते. अष्टपैलुत्वाने संपन्न प्रभुदेवा केवळ कोरिओग्राफरच नाही तर, एक उत्तम अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक देखील आहे. त्यांनी तिन्ही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे. 32 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी एकाहून अधिक मोठ्या हिट चि त्रपटांमध्ये गाणी कोरिओग्राफ केली आहेत.
संपूर्ण देशाला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रभुदेवाच्या डान्स स्टेपची क्रेझ आहे. 90च्या दशकात जेव्हा मायकल जॅक्सनची सर्वत्र चर्चा होती. त्यावेळी प्रभुदेवा यांनी आपल्या खास शैलीने लोकांवर जादू केली. त्यांचे 'मुकाबला' हे गाणे आजही लोकांना खूप आवडते. त्यांच्या उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम
प्रभुदेवा केवळ दक्षिणेतीलच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहेत. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. रेमो डिसूझाचा चित्रपट ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी 2’, ‘तुतक तुतक तुतिया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
सलमान खानच्या चित्रपटाने बदलले नशीब
प्रभुदेवाने हिंदी चित्रपटसृष्टीत ‘वॉन्टेड’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट सलमान खानच्या करिअरचा टर्निंग पॉइंट मानला जातो. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमालीची वाढ झाली होती. या चित्रपटानंतर सलमान खानची प्रतिमा अॅक्शन हिरो अशी झाली. त्यानंतर सलमानने एकापाठोपाठ अनेक मोठे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.
‘या’ चित्रपटांचे केलेय दिग्दर्शन
प्रभुदेवा यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘वॉन्टेड’नंतर ‘राऊडी राठौर’सारखा सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केला. यानंतर त्यांनी ‘रमैया वस्तावैय्या’, ‘आर... राजकुमार’, ‘अॅक्शन जॅक्सन’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘दबंग 3’ आणि ‘राधे’ यांचे दिग्दर्शनही केले आहे.
हेही वाचा :
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात, रुग्णालयात दाखल
- Beast Trailer Release : विजय थलापतीच्या 'बीस्ट'चा ट्रेलर रिलीज, सिनेमात अॅक्शनचा तडका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
