Happy Birthday Kangana Ranaut : कधीकाळी एक ब्रेड खाऊन दिवस काढणारी कंगना आज करोडोंची मालकीण! वाचा तिच्या या प्रवासाबद्दल...
Kangana Ranaut Birthday : कधीकाळी संघर्ष करत अवघ्या ब्रेडवर जगणारी कंगना इतक्या वर्षात मेहनत करून करोडोंच्या संपत्तीची मालक बनली आहे.
Kangana Ranaut Birthday : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. इंडस्ट्रीत आपल्या अभिनयासाठी आणि प्रत्येक मुद्द्यावर बेधडक मत व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाचा आज 35वा वाढदिवस आहे. कंगनाने अतिशय कमी वयातच इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कंगनाला चित्रपटांमध्ये काम मिळाले आणि ती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू शकली. कंगनाला अनेकदा यश मिळाले नाही, पण तिने कधीही हार मानली नाही.
कधीकाळी संघर्ष करत अवघ्या ब्रेडवर जगणारी कंगना इतक्या वर्षात मेहनत करून करोडोंच्या संपत्तीची मालक बनली आहे. कॅकनॉलेजच्या रिपोर्टनुसार कंगनाची संपत्ती करोडोंची आहे. तिच्याकडे एकूण 94 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
12वीत नापास होऊन गाठली दिल्ली!
कंगनाच्या आई-वडिलांची इच्छा होती की, तिने डॉक्टर व्हावे. परंतु, कंगना 12वीतच नापास झाली आणि अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीला आली होती. दिल्लीत राहून तिने नाट्यदिग्दर्शक अरविंद गौर यांच्याकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि इंडिया हॅबिटॅट सेंटरचा भाग बनून अनेक नाटकांमध्ये काम केले. लेखक-अभिनेते गिरीश कर्नाड यांचे 'रक्त कल्याण' हे तिचे पहिले नाटक होते.
कुटुंबानेही सोडली होती साथ
संघर्षाच्या काळात कुटुंबाकडून आर्थिक मदत न मिळाल्याने कंगना अनेकदा केवळ चपाती किंवा ब्रेडसोबत लोणचे खाऊन दिवस काढले होते. कंगनाने चित्रपटात काम करावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा नव्हती. यानंतर त्यांच्या कुटुंबात दुरावा आला होता. कंगनाचा ‘लाईफ इन अ मेट्रो’ हा तिसरा चित्रपट आला होता. या चित्रपटानंतर कंगनाच्या कुटुंबीयांनी तिच्याशी पुन्हा बोलणे सुरू केले आणि आज ती आपल्या कुटुंबासोबत आनंदाने नांदत आहे.
कोटींच्या घरात कंगनाची कमाई
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना ब्रँड एंडोर्समेंटमधून सर्वाधिक कमाई करते. ती एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी 3-3.5 कोटी रुपये आकारते. आता ती अभिनेत्रीसोबतच एक फिल्म प्रोड्यूसरही बनली आहे. रिपोर्टनुसार ती एका वर्षात सुमारे 15 कोटी रुपये कमवते.
कंगना रनौतची मुंबईत 1-2 नव्हे, तर तीन घरे आहेत. कंगना मुंबईच्या खार पश्चिम भागात ऑर्किड ब्रीझच्या 16 नंबर रोडवरील इमारतीत राहते. कंगनाचे या इमारतीत तीन फ्लॅट आहेत. कंगनाच्या या फ्लॅटची किंमत जवळपास 14 कोटी रुपये आहे.
मुंबईशिवाय कंगनाचा मनालीमध्येही बंगला आहे. काही काळापूर्वी कंगनाने हा आलिशान बंगला बांधला आहे. कंगनाच्या या बंगल्यात 8 खोल्या आहेत, ज्या तिने अतिशय सुंदरपणे सजवल्या आहेत. ती तिच्या मनालीच्या बंगल्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असते.
संबंधित बातम्या
- Kangana Ranaut : कंगना रणौतला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं दिला नकार
- Bharti Singh : 'लोकांना वाटलं नशेमुळे त्याचं करिअर संपलं पण..'; भारतीनं केलं कपिलचं कौतुक
- Rajpal Yadav : '...म्हणून मी जेठालाल ही भूमिका नाकारली'; राजपाल यादव यांनी सांगितलं कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha