Hanuman OTT Release: अखेर तेजा सज्जाच्या 'हनुमान'ला ओटीटीचा मुहूर्त सापडला, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा? जाणून घ्या सविस्तर
Hanuman OTT Release: तेजा सज्जाचा हिट चित्रपट हनुमान हा अखेरीस ओटीटीवर रिलीज करण्यात आलाय. या चित्रपटाने जगभरात 100 कोटींहून अधिकची कमाई केली होती.
Hanuman OTT Release: काही महिन्यांपूर्वी बॉक्स ऑफिस गाजवणारा तेजा सज्जाचा (Teja Sajja) हनुमान (Hanuman) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता हा सिनेमा अखेरीस ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आलाय. हा चित्रपट महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. पण त्या चित्रपटाला आज अखेरीस या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. शनिवार 16 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आलाय.
दिग्दर्शक प्रशांत वर्माचा सुपरहिरो आधारीत 'हनुमान' (Hanuman) चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अभिनेता तेजा सज्जाची (Teja Sajja) प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.या चित्रपटातील व्हीएफक्स (VFX)आणि इतर तांत्रिक बाबींचेही कौतुक झाले होते. थिएटरमध्ये कमाल दाखवल्यानंतर आता हनुमान चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.
कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?
ही सिरिज OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित करण्यात आलीये. ZEE5 वर इंग्रजी सबटायटल्ससह हा चित्रपट तेलगूमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याचप्रमाणे तेलुगूमध्ये हा चित्रपट ZEE5 वर रेंटने देखील घेता येऊ शकतो. हनुमान हा सिनेमा जिओ सिनेमावरही स्ट्रीम होत आहे. त्यावर हा सिनेमा कोणत्याही दक्षिण भारतीय भाषेत नाही. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट हिंदीत इंग्रजी सबटायटल्ससह पाहू शकता. शनिवारी संध्याकाळी 8 वाजता कलर्स सिनेप्लेक्सवर या चित्रपटाचा प्रीमियरही झाला आहे.
का होतेय हनुमानची इतकी चर्चा?
हनुमान चित्रपटाने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, राज दीपक शेट्टी आणि विनय राय यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.हा चित्रपट 12 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.