Divya Pahuja: हाॅटेलमध्ये गोळ्या घालून हत्या अन् 11व्या दिवशी कालव्यात सापडला मृतदेह; मॉडेलच्या मर्डरची थरारक मिस्ट्री
Model Divya Pahuja Murder Case: दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या तोहाना कालव्यात फेकून दिल्याचे खुद्द बलराजने पोलिसांना सांगितले
Divya Pahuja: मॉडेल दिव्या पाहुजाची (Divya Pahuja) 2 जानेवारीला सिटी पॉइंट हॉटेलच्या रूममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी बंगालमधून अटक करण्यात आलेल्या बलराज नावाच्या व्यक्तीची चौकशी पोलिसांनी केली. त्याची चौकशी केल्यानंतर दिव्या पाहुजाचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या (Haryana) तोहाना कालव्यात फेकून दिल्याचे खुद्द बलराजने पोलिसांना सांगितले होते. दिव्या पाहुजा हत्याकांडातील मुख्य आरोपी अभिजीत सिंह याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी बलराज गिलवर सोपवली होती.
कालव्यात सापडला मृतदेह
मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हिचा मृतदेह गुरुग्राम पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दिव्या पाहुजाचा मृतदेह हरियाणातील टोहाना येथे कालव्यात सापडला ही माहिती ANI या वृत्तसंस्थेला गुरुग्रामचे पोलीस अधिकारी सुभाष बोकेन यांनी दिली. मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे 25 सदस्यीय पथक पटियाला येथे पोहोचले होते. गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसह एनडीआरएफची टीम पटियाला ते खनौरी सीमेपर्यंतच्या कालव्यात मृतदेहाचा शोध घेत होती. मात्र दिव्या पाहुजाचा मृतदेह हरियाणातील तोहाना कालव्यातून सापडला असून, कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्याचा फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला, ते पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. गुरुग्राम गुन्हे शाखेचे सहा पथक मृतदेहाच्या शोधात व्यस्त होते.
Model Divya Pahuja murder case: Divya Pahuja's body found in a canal in Tohana, Haryana: Subhash Boken, PRO Gurugram Police
— ANI (@ANI) January 13, 2024
More details are awaited.
बलराजच्या सांगण्यावरून दिव्याचा मृतदेह सापडला
बलराज देश सोडून बँकॉकला पळून जाण्याचा विचार करत होता. त्याला आणि रवी बंगाला कोलकाता विमानतळावरून अटक करण्यात आली. बलराज गिलने दिव्याचा मृतदेह त्याचा बॉस अभिजीतच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नेला होता. या कामात रवी बंगा त्याला साथ देत होता. अभिजीत सिंगने त्याच्या हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दिव्याचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवला. मग त्याने गाडीच्या चाव्या बलराजकडे दिल्या आणि त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. या कामासाठी अभिजीतने त्याला 10 लाख रुपयेही दिले होते.
पोलिसांनी सहा आरोपींना केली अटक
गुरुग्राम क्राइम ब्रँचने या हत्येप्रकरणी सहा आरोपींची नावे दिली असून त्यात मुख्य आरोपी अभिजीत सिंह, हेमराज, ओम प्रकाश, मेघा, बलराज गिल आणि रवी बंगा यांची नावे आहेत. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. दिव्या पाहुजा (27) ही बलदेव नगर, गुरुग्राम येथील रहिवासी होती. तिची धाकटी बहीण नैनाने एका वेब साइटला सांगितले होते की, 2 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दिव्यासोबत तिचे शेवटचे बोलणे झाले होते. दिव्याने अर्ध्या तासात घरी पोहोचणार असल्याचे सांगितले होते, मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. नैनाच्या तक्रारीवरून गुरुग्रामच्या सेक्टर-14 पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: