Gully Boy Sequel: 'गली बॉय'च्या सिक्वेलमध्ये विकी कौशल, अनन्या पांडे; रणवीर सिंह आणि आलिया भट्टला रिप्लेस करणार?
Sequel Updates : पहिल्या भागात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट होते, ज्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला.
Gully Boy Sequel Updates : बॉलिवूडच्या (Bollywood) सर्वात चर्चेत असणाऱ्या चित्रपटांपैकी एक 'गली बॉय' (Gully Boy). या चित्रपटानं रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) दमदार अभिनयाच्या जोरावर सर्वांना आपली भूरळ घातली. जोया अख्तरच्या (Zoya Akhtar) दिग्दर्शनात बनलेला हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज करण्यात आला होता. आता 6 वर्षांनी या चित्रपटाच्या सीक्वेलची चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ऑफिशिअली घोषणा करण्यात आलेली नाही. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या पार्टमध्ये विक्की कौशल आणि अनन्या पांडे झळकणार आहेत.
फिल्मफेअरमधील एका वृत्तानुसार, 'गली बॉय'च्या सिक्वेलमध्ये काम करण्यासाठी निर्माते विकी कौशल आणि अनन्या पांडे यांच्याशी चर्चा करत आहेत. या प्रकल्पासाठी एका दिग्दर्शकाचीही निवड झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अर्जुन वरैन सिंह 'गली बॉय 2' चं दिग्दर्शन करणार?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर बेबी फिल्म्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या 'खो गये हम कहां'चं दिग्दर्शक अर्जुन वरैन सिंह 'गली बॉय'च्या सिक्वेलचं दिग्दर्शन करणार आहेत.
अनन्या पांडे योग्य पर्याय?
अनन्या पांडेनं 'खो गये हम कहां' मध्ये अर्जुन वरैन सिंहसोबत काम केलं आहे. चित्रपट निर्मात्याचा असा विश्वास आहे की, तो यासाठी योग्य पर्याय आहे. रिपोर्टनुसार, असं म्हटलं आहे की, विकी गेल्या काही काळापासून या प्रोजेक्टवर काम करत आहे.
View this post on Instagram
रणवीर-आलियाला रिप्लेस करणार?
मूळ चित्रपटात काम केलेले रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि सिद्धांत चतुर्वेदी हे सिक्वेलमध्ये दिसतील का? यावर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "हे शक्य नाही. जर 'गली बॉय 2' बनवला गेला आणि तो यशस्वी झाला, तर तिसऱ्या भागात हे दोघे पुन्हा एकत्र येण्याची अपेक्षा आहे. सुत्रांनी असंही सांगितलं की,"पण 'गली बॉय'च्या सिक्वेलबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही."
महत्त्वाच्या इतर बातम्या :