एक्स्प्लोर

Gulhar : 'लहर आली, लहर आली गं...'; गल्हरमधील गाणं प्रदर्शित

'लागीरं झालं जी' मालिकेतील शितली म्हणजेच शिवानी बावकर 'गुल्हर' या चित्रपटात रमेश चौधरींसोबत मुख्य भूमिकेत आहे.

Gulhar : ज्या गाण्याची झलक मागील बऱ्याच दिवसांपासून रसिकांच्या कानांना सुरेल संगीताची अनुभूती देत होतं ते आता प्रत्यक्ष भेटीला आलं आहे. 'गुल्हर'चं मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून सर्वत्र ज्या गाण्याची चर्चा होती, ते गाणं संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू झालं आहे. प्रदर्शनापूर्वीच 'गुल्हर'मधील 'लहर आली, लहर आली गं...' या गाण्यानं रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. आता हे संपूर्ण गाणं व्हिडीओसह रिलीज करण्यात आलं आहे. आॅडीओप्रमाणेच या गाण्याचा व्हिडीओही रसिकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहे. सुमधूर संगीत आणि आवाजाच्या जोडीला 'लहर'मधली नवी कोरी जोडीही प्रेक्षकांना भावत आहे. व्हिडीओ पॅलेसच्या माध्यमातून हे गाणं रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली निर्माते शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, अबिद सय्यद यांनी 'गुल्हर'ची निर्मिती केली आहे. 'गुल्हर'च्या दिग्दर्शनासोबतच रमेश चौधरी यांनी यात मुख्य भूमिकाही साकारली आहे. 'लागीरं झालं जी' मालिकेतील शितली म्हणजेच शिवानी बावकर या चित्रपटात रमेश चौधरींसोबत मुख्य भूमिकेत आहे. या दोघांवर चित्रीत करण्यात आलेलं 'लहर आली, लहर आली गं...' हे गाणं 'गुल्हर'मधील दोघांच्या प्रेमकथेत गुलाबी रंग भरण्याचं काम करणारं आहे. या निमित्तानं प्रेक्षकांना शिवानी आणि रमेश या नव्या जोडीची केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा जरी एका ११ वर्षांच्या मुलाभोवती गुंफण्यात आली असली तरी त्यात एका प्रेमी युगुलाच्या लव्ह स्टोरीचा अँगलही आहे. हे गाणं वैभव कुलकर्णी आणि पद्मनाभ गायकवाड यांनी लिहिलं असून, पद्मनाभनंच अजय गोगावले आणि अपूर्वा निशादच्या आवाजात संगीतबद्ध केलं आहे. रिलीज करण्यात आलेलं या गाण्याचं लक्षवेधी पोस्टर उत्सुकता वाढवणारं आहे. पावसात भिजणारी शिवानी-रमेश ही जोडी या पोस्टरवर आहे. 

6 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणाऱ्या 'गुल्हर'वर देश-विदेशातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे. मानाच्या समजल्या जाणाऱ्या बऱ्याच पुरस्कारांवरही या चित्रपटानं आपलं नाव कोरलं आहे. अभिनय, दिग्दर्शन, लेखनासोबतच तांत्रिक विभागातील कामाचंही कौतुक झालं आहे. मोहन पडवळ यांनी 'गुल्हर'ची कथा लिहिली असून, संजय नवगिरे यांनी पटकथा व संवादलेखन केलं आहे. शिवानी-रमेश या जोडीसोबत या चित्रपटात रवी काळे, भार्गवी चिरमुले, विनायक पोद्दार, माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्नील लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ, गणेश शितोळे आदि कलाकारांनी अभिनय केला आहे. उत्तम डिओपी आणि संकलक म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुमार डोंगरे यांनी सिनेमॅटोग्राफीसोबतच संकलनही केलं आहे. केदार दिवेकर यांनी पार्श्वसंगीत, विशाल पाटील यांनी नृत्य दिग्दर्शन, तर निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी ध्वनी आरेखन केलं आहे. योगेश दीक्षित यांनी डिआयचं काम पाहिलं आहे. या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड अमर लष्कर आहेत.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan Gauri Spratt Home: आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
आमिर खान, गौरी स्प्रॅटला लग्नानंतर चारच महिन्यांत राहतं घर सोडावं लागणार? जोडप्याकडून नव्या घराचा शोध सुरू, कारण काय?
Alia Bhatt On Ranbir Kapoor Ramayana: 'मला तुझा खूप अभिमान वाटतोय, रणबीर...'; आलिया भट्टची खास पोस्ट चर्चेत, नवऱ्याचं कौतुक करताना चिमुकल्या लेकीचे क्युट फोटोही शेअर, PHOTOs
'मला तुझा खूप अभिमान वाटतोय, रणबीर...'; आलिया भट्टची खास पोस्ट चर्चेत, नवऱ्याचं कौतुक करताना चिमुकल्या लेकीचे क्युट फोटोही शेअर, PHOTOs
Jailer 2 OTT: रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
Kareena Kapoor khan on Saif ali khan Attack: 'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Embed widget