(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Grammy Awards 2023 : 'ग्रॅमी पुरस्कार' सोहळ्यात महिलांचा बोलबाला; भारतीयांची मान अभिमानाने उंचावणार?
Grammy Awards : ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथे पार पडत आहे.
Grammy Awards 2023 : ग्रॅमी पुरस्कार (Grammy Awards 2023) हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडतो आहे. या वर्षीचा पुरस्कार सोहळा खूपच खास आहे. या वर्षी नामांकन जाहीर झालेल्यांमध्ये महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे 65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात महिलांचा बोलबाला पाहायला मिळत आहे.
भारतीयांची मान अभिमानाने उंचावणार?
रिकी केज यांना तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्काराठी नामांकन मिळालं आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट अमर्सिव ऑडिओ अल्बम कॅटेगरीत नामांकन जाहीर झालं आहे. तसेच सितार वादक पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकरलादेखील दोन कॅटेगरीत नामांकन मिळालं आहे. आता रिकी किंवा अनुष्का या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज भारतात 'ग्रॅमी पुरस्कार' सोहळ्याचं प्रसारण होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यंदाच्या पुरस्कार सोहळ्याची नामांकनं जाहीर करण्यात आली होती. यंदाचा पुरस्कार सोहळा ट्रेव्हर नोहा होस्ट करत आहेत. भारतीय संगीतप्रेमींना आज घरबसल्या हा पुरस्कार सोहळा पाहता येत आहे.
The #GRAMMYs start NOW! 🎶
— Recording Academy / GRAMMYs (@RecordingAcad) February 6, 2023
📲 Watch Music's Biggest Night live on @CBS and @ParamountPlus. pic.twitter.com/K37yvXLOJb
दिग्गजांच्या उपस्थितीत ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात जगभरातील संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहिले आहेत. यात हॅरी स्टाइल्स, बॅड बनी, स्टीव्ह लासे, मेरी जे, ब्लिगे, ल्यूक कॉम्ब्स, सॅम स्मिथ, किम पेट्रास, ब्रँडी कार्लिले आणि लिझो यांचा समावेश आहे. संगीतप्रेमी गेल्या काही दिवसांपासून या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याची प्रतीक्षा करत होते. आता या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
ग्रॅमी पुरस्कार कोणाला मिळतो?
ऑक्टोबर 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीतील सर्वोत्कृष्ट रेकॉर्डिंग, रचना आणि कलाकार यांना ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे. बियॉन्से, टेलर स्विफ्ट, केंड्रीक आणि एडल अशा संगीतक्षेत्रातील अनेक लोकप्रिय मंडळींना यंदाच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे नामांकन जाहीर झाले आहे. तसेच रिकी केज आणि अनुष्का शंकर हे भारतीयदेखील या स्पर्धेत आहेत. या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात दिग्गज कलाकारांपासून ते नवख्या कलाकरांपर्यंत अनेक मंडळी सहभागी झाले आहेत.
संबंधित बातम्या