Girija Oak News : आधी भांबावली, मग आभार मानले अन् खंत व्यक्त केली...; व्हायरल विकृत फोटोंबाबत मराठमोळी नॅशनल क्रश गिरीजा ओक काय-काय म्हणाली?
Girija Oak Blue Saree Photos Viral : काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एका निळ्या साडीतल्या सौंदर्यवतीचे फोटो व्हायरल झाले होते.

Girija Oak First reaction after Blue Saree Photos Viral : काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एका निळ्या साडीतल्या सौंदर्यवतीचे फोटो व्हायरल झाले होते. प्रत्येकजण तिच्या फोटोंवर बोलत आहेत. तसेच, त्या फोटोत दिसणारी 'ती' नेमकी कोण? याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच अनेक चाहते पुढे येऊन तिची ओळख सांगत आहेत. अशातच जिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ती दुसरी-तिसरी कुणी नसून मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) होती. गिरीजा ओक सध्या सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून व्हायरल झाली आहे. दरम्यान, गिरीजा ओकने याबाबत आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अभिनेत्री गिरीजा ओक काय म्हणाली?
गिरीजा ओक म्हणाली की, “सोशल मीडियावर सध्या जे सुरू आहे ते खरंच भांबावून टाकणारं आहे. अनेकांनी मला खूप प्रेमाने मेसेज, फोटो आणि मीम्स पाठवले, याबद्दल मी मनापासून आभारी आहे. काही पोस्ट तर प्रचंड क्रिएटिव्ह आहेत. पण याचबरोबर काही अश्लील, AI वापरून एडिट केलेले फोटोही फिरत आहेत. आजच्या काळात मी सुद्धा सोशल मीडिया वापरणारीच आहे, त्यामुळे ट्रेंडिंग गोष्टींबरोबर असे विकृत फोटो कसे बनवले जातात हे माहित आहे. लाइक्सच्या खेळाला नियम नसल्यानेच याची भीती वाटते.”
गिरीजा ओक पुढे म्हणाली, “माझा मुलगा सध्या सोशल मीडिया वापरत नाही, पण भविष्यात वापरेलच. इंटरनेटवर हे मॉर्फ केलेले फोटो कायमचे राहतात. त्याने असे कोणतेही चुकीचे फोटो पाहिले तर काय वाटेल, याचा विचार करूनच घाबरायला होतं. त्याला हे खरे नसलेले फोटो आहेत हे कळेल, पण अशा गोष्टींचा परिणाम होतोच. म्हणूनच अशी चुकीची पोस्ट व्हायरल करू नका, ही माझी मनापासून विनंती आहे.”
गिरीजा म्हणाली, “हे बोलून कदाचित फारसा फरक पडणार नाही, पण गप्प बसणं योग्य वाटलं नाही. जे लोक असे फोटो-व्हिडीओ बनवतात किंवा त्यांना लाइक करतात, त्यांनी किमान एकदा तरी त्याचा परिणाम काय होतो याचा विचार करा. आपल्या एका लाइकमुळे चुकीच्या गोष्टींना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळतं.”
शेवटी ती म्हणाली, “या सगळ्यामुळे अनेकांना माझ्या कामाबद्दल नव्याने माहिती मिळाली याचा मला आनंद आहे. त्यामुळे असंच प्रेम राहू द्या. मीही उत्तम काम करत राहीन. नाट्यगृहात किंवा सिनेमागृहात भेटूया.”
View this post on Instagram
हे ही वाचा -
























