'...मोदी साहेबांनी ठरवलं तर अर्धा तासही लागणार नाही', छोट्या पुढारीने पाकिस्तानला दम भरला
Ghanshyam Darode : '...मोदी साहेबांनी ठरवलं तर अर्धा तासही लागणार नाही', छोट्या पुढारीने पाकिस्तानला दम भरला

Ghanshyam Darode : "माझं सुटसुटीत मत आहे, पाकिस्तान (Pakistan) वाल्यांनो आमच्या नादी लागू नका. तुमची आणि आमची तुलना कधीच कुठे होणार नाही. तुमची जेवढी लोकसंख्या नाही, तेवढे आमच्याकडे कैदी आहेत. आमच्या नादीला लागू नका. तुम्ही का भारताच्या नादी लागताय? भारत देशाने आणि मोदी साहेबांनी (Narendra Modi) ठरवलं तर तुम्हाला तिकडं येऊन ठोकायला अर्धा तासही लागणार नाही. तुम्ही सुखाने जगा आम्ही सुखाने जगतोय. तुमचं आता पाणी बंद केलंय, तर तोंडचं पाणी पळालंय. आणखी अन्न-धान्य बंद करायचं आहे", असं बिग बॉस फेम छोटा पुढारी घनश्याम दरोडे (Ghanshyam Darode) म्हणाला आहे. तो एका युट्युब चॅनेलला बोलत होता.
घनश्याम दरोडे म्हणाला, आपल्या निष्पाप लोकांचा जीव गेलाय, याचं वाईट वाटतंय. पाकिस्तानला नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांची जागा दाखवली, हे खूप बरं वाटतंय. युद्ध झालं तरी आपण इतिहास बघितलाय. आपल्याला काही फरक पडणार नाही. पाकिस्तानने सुरुवात केली होती. सिंधू खोऱ्यातील पाणी आपण दूर केलंय. पाकिस्तानने निष्पाप लोकांचा जीव घेतलाय, त्याचं मनापासून दु:ख वाटतंय. त्यांच्या धमक नसतानाही जाणून बुजून आपल्या लोकांचा जीव घेतलाय. त्याचाही बदला घेण्याचं काम आपण करत आहोत.
पुढे बोलताना घनश्याम दरोडे म्हणाला, पाकिस्तानने आपल्या भारताचा नाद करु नये. आपल्या नादी लागू नये. यांनी निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे. यांनी अजून दादागिरी केली तर यांची घरं राहणार नाहीत. ते लवकरच होणार आहे. पंतप्रधान मोदी साहेब आहेत, सर्व लोक एक आहेत. मी नागरिक म्हणून मोदींना सांगतोय. पाकिस्तानला सुट्टी द्यायची नाही. त्यांच्या घरात जाऊन घडा शिकवायचा आहे. आम्ही जर तुमच्या नादी लागलो तर एकही शिल्लक राहणार नाही. मी समजूतीचा इशारा देतोय...तुम्ही कितीही वळवळ केली तरी आमच्या पुढे जाऊ शकणार नाहीत. तुमच्यात तेवढी धमक नाही. कोणीही उठतंय आणि सिंधू खोऱ्यात रक्ताचे पाट वाहतील म्हणतोय. तुम्हाला थोडफार तरी पटायला पाहिजे. बघू कोण कोणाचा श्वास रोखतोय. यांना पाणी नाही, आता अन्नधान्य बंद करायचं. रातोरात पाकिस्तान राहायचं नाही, असा इशाराही घनश्याम दरोडेने दिलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या























