एक्स्प्लोर

Housefull 5 Box Office Collection Day 3: 'हाऊसफुल 5'च्या वादळाचं तिसऱ्या दिवशी त्सुनामीत रुपांतर, अक्षय कुमारकडून 17 फिल्म्सच्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर! 

Housefull 5 Box Office Collection Day 3: 'हाऊसफुल 5'नं तिसऱ्या दिवशी ज्या पद्धतीनं कमाई करायला सुरुवात केली, ते पाहता असं दिसतंय की, पहिल्या दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जणू वादळच आलं होतं. अन् आता तिसऱ्या दिवशी चक्क त्सुनामी आलीय.

Housefull 5 Box Office Collection Day 3: अक्षय कुमार (Akshay Kumar), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), रितेश देशमुख (Riteish Deshmukh), नाना पाटेकर (Nana Patekar) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) अशा सुपरस्टार 19 अॅक्टर्सनी आपल्या दमदार अभिनयानं फुलवलेली फिल्म 'हाऊसफुल 5'नं बॉक्स ऑफिसवर (Housefull 5 Box Office Collection) ओपनिंग डेच्या दिवशी धमाका केला. 6 जूनला रिलीज झालेल्या या फिल्मनं पहिल्या वीकेंडच्या शेवटच्या दिवशीही बॉक्स ऑफिस गाजवलं.  

फिल्मचा तिसरा दिवस म्हणजे, पहिला विकेंड रविवारचा. रविवारच्या सुट्टीचा फिल्मला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं.असं वाटतंय जसं फिल्मनं आपल्या ओपनिंग डेचा रेकॉर्ड मोडला आहे. अशातच आता फिल्म दुसऱ्या दिवसापेक्षाही जास्त कमाई करेल. जाणून घेऊयात फिल्मनं आतापर्यंत किती कमाई केली? त्याबाबत सविस्तर... 

'हाऊसफुल 5'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

ऑफिशियल डेटानुसार, फिल्मनं पहिल्या दिवशी 24.35 कोटी रुपये कमावले आहेत. दुसऱ्या दिवशी फिल्मच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 'हाऊसफुल 5'चा एकूण गल्ला 32.38 कोटी रुपयांवर पोहोचला. म्हणजेच, फिल्मनं फक्त 2 दिवसांत 56.73 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. 

तिसऱ्या दिवशी, सकाळी 10.20 वाजेपर्यंत, चित्रपटानं 31.5 कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे एकूण कलेक्शन 88.23 कोटी रुपये झालं, असं सॅकनिल्कनं म्हटलंय. दरम्यान, आजचा डेटा अंतिम नाही. तो बदलू शकतो.

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

'जाट' आणि 'केसरी 2'चे रेकॉर्ड धोक्यात

सॅक्निल्कनं म्हटलंय की, या वर्षी प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या 'जाट'नं 88.26 कोटी रुपये आणि 'केसरी 2'नं 92.53 कोटी रुपये कमावले आहेत. अंतिम डेटा आल्यानंतर त्यांचे रेकॉर्डही मोडता येतील. त्यांचा रेकॉर्ड तुटला आहे की नाही, हे निर्मात्यांनी दिलेल्या डेटानंतर स्पष्ट होईल.

याशिवाय, या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपैकी कालपर्यंत चित्रपटानं 14 चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला होता. अशातच आता 'हाऊसफुल 5'नं 'भूल चुक माफ'च्या 69 कोटी रुपयांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलं आहे आणि इतर 15 चित्रपटांना मागे टाकलं आहे. 'जाट-केसरी 2'ला मागे टाकताच ही संख्या 17 वर पोहोचेल.

'हाऊसफुल 5'चं बजेट आणि वर्ल्डवाईड कमाई 

'हाऊसफुल 5' हा चित्रपट 225 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे आणि सॅक्निल्कच्या मते, या सिनेमानं 2 दिवसांत जगभरात 87 कोटी रुपये कमावले आहेत. जर आपण आजच्या देशांतर्गत कमाईत भर घातली तर ती 100 कोटींवर पोहोचते. तरुण मनसुखानी दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित या चित्रपटात अक्षय कुमारसह 19 मोठे चेहरे आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Muzammil Ibrahim Reveals He Dated Deepika Padukone: 'दीपिका पादुकोणला मी आवडायचो, तिनंच मला प्रपोज केलेलं...'; प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget