Gaurav More Buy A New Home In Powai: 'ताडपत्रीचं घर ते फ्लॅट...', फिल्टरपाड्याचं गौरव मोरेचं स्वप्नांचं घर अस्तित्वात, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Gaurav More Buy A New Home In Powai: गौरव मोरेनं आजवर अनेक एकांकीका, नाटकं केली. त्यानंतर त्यानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना आपलंस केलं.

Gaurav More Buy A New Home In Powai: आपल्या हक्काचं, आपल्या स्वप्नांचं एक घर मुंबईत (Mumbai News) असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशंच काहीसं स्वप्न 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) फेम गौरव मोरेनं (Gaurav More) पाहिलं होतं. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून अवघ्या महाराष्ट्रभरात नावारुपाला आलेल्या अभिनेता गौरव मोरेनं असंच आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहिलेलं. आणि ते सत्यातही उतरवलं. गौरवनं त्याच्या आयुष्यातील खास क्षण त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या गौरवनं आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर पवईत आपलं हक्काचं घर मिळवलं आहे. फिल्टरपाड्यात पत्र्याच्या घरात राहणाऱ्या गौरव मोरेनं पवईत फ्लॅट घेतला आहे.
गौरव मोरेनं आजवर अनेक एकांकीका, नाटकं केली. त्यानंतर त्यानं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना आपलंस केलं. काही दिवसांपूर्वीच गौरवनं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा निरोप घेतला आणि सध्या तो 'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेल्या गौरव मोरेनं काही दिवसांपूर्वीच एक नवीकोरी गाडी खरेदी केली. त्यानंतर म्हाडाच्या लॉटरीच्या निमित्तानं त्याचं मुंबईतील हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं. नुकताच गौरवला त्याच्या घराचा ताबा मिळाला. गौरवनं आपल्या घराच्या चाव्यांचा फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये गौरव मोरे काय म्हणाला?
अभिनेता गौरव मोरेनं सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बोलताना गौरव मोरे म्हणाला की, "ताडपत्री ते फ्लॅट, फिल्टर पाडा ते पवई हा प्रवास बघताना खूप छोटा वाटतो, पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहे. जिथे राहतो तिथेच आपल घर असाव हे कायम मनात होत.लहानपणापासुन वाटत होत जिथे राहतो तिथेच घर घ्यायचं आणि आज ते स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरलं..."
"काल दिनांक 25-09-2025 रोजी आम्हाला आमच्या पवईच्या नवीन घराचा ताबा मिळाला. ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे. आणि काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघुन मन भरून आलं आणि वाटलं आपण आपल्या परिवारासाठी काहीतरी केल.माझी नाळ कायम फ़िल्टर पाडा आणि पवई सोबत जोडली गेली आहे आणि ती कधीच तुटणार नाही.माझं हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी @mhadaofficial चे मनापासून आभार मानतो.", असं गौरव मोरे म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























