एक्स्प्लोर

प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..

मला पूर्ण प्रकरण माहित नाही, कारण मी चित्रपट बनवण्यात व्यस्त आहे. पण मला इतकच माहित आहे की..

Gashmir Mahajani On Prajakta Mali: राज्यात बीडच्या मस्साजोग प्रकरणात सरपंच संतोष देशमुख हत्येने महाराष्ट्र हादरला असून  राजकारणाला वेग आलाय. आरोप प्रत्यारोपांच्या वर्तुळात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यानंतर मोठा गदारोळ उडाला. पत्रकार परिषद घेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली. दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकार प्राजक्ता माळीला पाठिंबा देताना दिसले. फुलवंती चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर अभिनेता गश्मीर महाजनीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

मला पूर्ण प्रकरण माहित नाही, कारण मी चित्रपट बनवण्यात व्यस्त आहे. पण मला इतकच माहित आहे की प्राजक्ता ही सक्षम, स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री आहे आणि मी त्यासाठी तिचा आदर करतो. असं गश्मीर म्हणाला. Instagram वर 'आस्क मी एनीथिंग' या शीर्षकाखाली त्याला एका चाहत्याने 'प्राजक्ताच्या बाजूने काही बोलशील का?'असा प्रश्न विचारला होता. त्यावर गश्मीरने ही प्रतिक्रिया दिली आहे. 

नक्की काय म्हणाला गश्मीर महाजनी? 

गश्मीर आणि प्राजक्ताने फुलवंती या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यामध्ये निर्मिती क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल टाकलेल्या प्राजक्तासोबत शास्त्रीबुवांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता गश्मीर महाजनीने सक्षम, स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री आहे आणि मी त्यासाठी तिचा आदर करतो. असं त्याने म्हटलं. गश्मीर शिवाय सचिन गोस्वामी, कुशल बद्रिके, विशाखा सुभेदार, सुशांत शेलार इत्यादी कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दिलाय. गश्मीर म्हणाला, मला पूर्ण प्रकरण माहित नाही, कारण मी चित्रपट बनवण्यात व्यस्त आहे. पण मला इतकच माहित आहे की प्राजक्ता ही सक्षम, स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री आहे आणि मी त्यासाठी तिचा आदर करतो.

प्राजक्ता माळी प्रकरणावरून अभिनेता गश्मीर महाजनी म्हणाला, 'मी चित्रपट बनवण्यात व्यस्त, पण मला एवढंच माहितीय की, प्राजक्ता..

बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या वक्तव्याचा समाचार घेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांना जाहीरपणे माफीही मागावी लागली. या संपूर्ण प्रकरणात आपापसातील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा वापर होता कामा नये असं म्हणत प्राजक्ता माळीने भूमिका स्पष्ट केली होती. तिच्या भूमिकेवर मराठी कला विश्वातील अनेक कलाकारांनी पाठिंबाही दर्शवला. यात गश्मीर महाजनीने ही प्रतिक्रिया दिली आहे. 

हेही वाचा:

Suresh Dhas Prajakta Mali: सुरेश धस यांची दिलगिरी, वादावर पडदा टाकला; अभिनेत्री प्राजक्ता माळीची भूमिका काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
Walmik Karad: 'कडक कपडे घालून शानमध्ये येणार, वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार'; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
'वाल्मिक कराड आज शरण येणार, कडक कपडे घालून शानमध्ये येणार...'; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 31 Dec 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड सीआयडीसमोर शरण, पुण्यातील कार्यालयाबाहेर येताच नेमकं काय घडलं?
Walmik Karad: आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
आधी पुण्यातच मुक्काम, आठ दिवसांपूर्वी राज्याबाहेर निसटला; 23 दिवस वाल्मिक कराड नेमका कुठे होता?
Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...  
Walmik Karad: 'कडक कपडे घालून शानमध्ये येणार, वाल्मिक कराड आज शरणगती पत्कारणार'; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने चर्चांना उधाण
'वाल्मिक कराड आज शरण येणार, कडक कपडे घालून शानमध्ये येणार...'; जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
Santosh Deshmukh Case : इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
इकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचाली, तिकडे संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंच्या भेटीला
Walmik Karad: वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर करण्याची कुणकुण लागतात सुरेश धस मुंबईत फडणवीसांच्या भेटीला निघाले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद, 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु
संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध, राज्यातील ग्रामपंचायतींचं कामकाज आजपासून बंद, 'या' 3 जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु
Satish Wagh Case: सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांना मारण्यासाठी वापरलेलं ते धारदार शस्त्र कुठे? कोर्टात युक्तीवादावेळी नेमकं काय घडलं?
Embed widget