एक्स्प्लोर

Manala Lighting Song: महाराष्ट्राच्या प्रत्येक 'मनाला लायटिंग' करत आनंद देणारं मराठी लव्हसॉन्ग; तुम्ही ऐकलंय?

Manala Lighting Song: महाराष्ट्राच्या प्रत्येक मनाला लायटिंग करत आनंद देणारं फसक्लास प्रेमगीत 'मनाला लायटिंग' प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. तुम्ही ऐकलंय का?

Manala Lighting Fussclass Dabhade Movie Song: बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट (Marathi Movie) 'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade) मधील नवं रोमँटिक गाणं 'मनाला लायटिंग' (Manala Lighting) हे नुकतंच प्रदर्शित झालं आहे. लग्नानंतरच्या प्रेमळ क्षणांवर आधारित असलेल्या या गाण्यात सोनू आणि कोमलच्या अरेंजवाल्या लव्हस्टोरीचा गोडवा, त्यांच्या नव्या नात्यातील जवळीक पाहायला मिळत आहे. शिवाय तायडी आणि दाजींचं लग्नानंतरचं प्रेम आणि पप्पूचं हरवलेलं प्रेम सुद्धा बघायला मिळतंय. अमेय वाघ-राजसी भावे, क्षिती जोग- हरीष दुधाडे, सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर या जोडप्यांचा गोड अंदाज या गाण्यात दिसतोय. अमितराज यांच्या संगीतानं आणि क्षितिज पटवर्धन यांच्या शब्दांनी या गाण्याला एक वेगळाच श्रृंगारीक साज चढवला आहे. तर अमितराज यांच्याच आवाजातून व्यक्त झालेला प्रेमभाव संगीतप्रेमींना भावणारा आहे. 

निर्माते भूषण कुमार म्हणतात की, "मनाला लाइटिंग' हे गाणं हे प्रेक्षकांना प्रेमाच्या दुनियेत घेऊन जाईल. सोनू आणि कोमल यांचं हळवं प्रेम आणि गोड केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळते. हे गाणं आपलं आहे, असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटेल. सोनू आणि कोमलचा लग्नानंतरचा हा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल." 

आनंद एल राय यांनी सांगितलं की, "लग्न झाल्यानंतरचे सुरुवातीचे क्षण सर्वांसाठीच खूप खास असतात. प्रत्येक जोडप्याच्या नात्यातील हे सुंदर क्षण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या गाण्याची संगीत टीम कमाल आहे."

दिग्दर्शक हेमंत ढोमे याबाबत बोलताना म्हणाला की, "अरेंज मॅरेजनंतरचे काही दिवस एकमेकांना समजून घेण्यात जातात. एकमेकांच्या सहवासात घालवलेला तो प्रत्येक क्षण खूप गोड असतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रोमान्स दडलेला असतो. प्रेम हळुवार खुलत असतं. एकदंरच हे सोनेरी क्षण दाखवण्याचा प्रयत्न आम्ही यात केला आहे. लग्नं झालेल्या, होऊ घातलेल्या किंवा तशी स्वप्नं बघणाऱ्या प्रत्येकाला हे गाणं आपलंसं करून टाकणार याची मला खात्री आहे."

दरम्यान, हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' येत्या 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टी-सीरीज, कलर येल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित 'फसक्लास दाभाडे'चे भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओज करत आहे.

पाहा 'मनाला लाइटिंग' गाणं : 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Upcoming Films May Beat Pushpa 2: 'पुष्पा'भाऊचा रेकॉर्ड चक्काचूर करू शकतात 'या' 5 फिल्म्स; बॉक्स ऑफिसवर करतील कब्जा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis:भोंग्याला सरसकट परवानगी नाही, उल्लंघन केल्यास परवानगी कायमची रद्द :देवेंद्र फडणवीसJitendra Awhad On Nitesh Rane : मच्छी कशी कापणार, हलाल की झटका?  : जितेंद्र आव्हाडMaharashtra Anandacha Shidha | आनंदाचा शिधा योजना अखेर बंद करण्याचा सरकारचा निर्णयBhaskar Jadhav On Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार : भास्कर जाधव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
पाकिस्तानी पत्रकार म्हणाला, टीम इंडिया पाकिस्तानात का गेली नाही? हार्दिक पांड्याकडून भन्नाट उत्तर!
Aaditya Thackeray Meet Pankaja Munde : मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे पंकजा मुंडेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
मटणासाठी मल्हार सर्टिफिकेट;नितेश राणेंच्या निर्धारावर आव्हाड संतापले, म्हणाले, मग मच्छी कशी कापणार?
Immigration and Foreigners Bill 2025 : देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
देशातील आणखी चार कायदे हद्दपार होणार? नव्या कायद्यांमध्ये प्रस्तावित बदल आहेत तरी काय??
राजकारण्यांचा नावडता, अधिकारी चळाचळा कापतात त्या तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार? अंजली दमानियांच्या मागणीने चर्चांना उधाण
सरकार बीडमध्ये तुकाराम मुंढेंची नियुक्ती करणार का? अंजली दमानियांच्या मागणीने चर्चांना उधाण
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
काळा चष्मा, मोकळे केस, शिल्पा शेट्टीचा 'लेडी बॉस' लुक चर्चेत!
Guillain Barre Syndrome : नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
नाशिक शहरात जीबीएसचा शिरकाव! साठ वर्षीय व्यक्तीला लागण, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती
तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे 67 कोटींच्या कार, शातीर, बदमाशप्रमाणे वागला; मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? असीम सरोदेंकडून प्रश्नांची सरबत्ती
Embed widget