Friends Actor Matthew Perry Death Case : 'फ्रेंड्स' फेम अभिनेता मॅथ्यू पेरीची हत्या झाली? दोन डॉक्टरांसह पाचजण अटकेत
Friends Actor Matthew Perry Death Case : 'फ्रेंड्स' या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Friends Actor Matthew Perry Death Case : 'फ्रेंड्स' या गाजलेल्या मालिकेतील अभिनेता मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूच्या ( Matthew Perry Death Case) एक वर्षानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मॅथ्यूच्या मृत्यू प्रकरणी दोन डॉक्टरांसह पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. यामध्ये मॅथ्यू पेरी यांच्यासोबत राहणारी त्यांची असिस्टंटचाही समावेश आहे. या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अमेरिकन-कॅनेडियन अभिनेता मॅथ्यू पेरी यांचा मृतदेह मागील वर्षी 28 ऑक्टोबर 2023 रोजी लॉस एंजलिस येथील त्यांच्या राहत्या घरी हॉट टबमध्ये आढळला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
गुरुवारी यूएस ॲटर्नी मार्टिन एस्ट्राडा म्हणाले की, 'या आरोपींनी पैसे कमवण्यासाठी मॅथ्यू पेरीच्या ड्रग्ज व्यसनाचा फायदा घेतला. अभिनेता जे करतोय ते चुकीचं आहे हे त्यांना माहीत होतं. त्यांना माहित होते की मॅथ्यू पेरीसाठी हा एक मोठा धोका आहे, परंतु तरीही त्यांनी ते केले. या अटकांमुळे मॅथ्यू पेरीचा मृत्यू त्याच्या जवळच्या लोकांनी घडवून आणलेली एक शोकांतिका असावी असे सूचित करणारे धक्कादायक पुरावे मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
लिव्ह-इन असिस्टंट आणि डॉक्टरांवर आरोप...
या प्रकरणात मॅथ्यू पेरीचा दीर्घकाळ सहाय्यक असलेली केनेथ इवामासा आणि त्याची काळजी घेत असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे. या सगळ्यांनी कथितपणे 'फ्रेंड्स' अभिनेत्याला हजारो डॉलर्समध्ये केटामाइन ड्रग्जची विक्री केली. या ड्रग्जच्या सेवनाने अभिनेत्याचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अभिनेत्याचा मृतदेह हॉट टबमध्ये सापडला तेव्हा त्याचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. मात्र आता हे संभाव्य हत्येचे प्रकरण मानले जात आहे.
'केटामाइन क्वीन' जसवीन संघा कोण आहे?
ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे मॅथ्यू पेरीच्या मृत्यूप्रकरणी ज्या पाच जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत त्यात जसवीन संघा नावाच्या महिलेचा समावेश आहे. तिला केटामाइन क्वीन म्हणून ओळखले जाते. जसवीनने अभिनेत्याला केटामाइन पुरवल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 41 वर्षीय जसवीन संघा ही ब्रिटिश-अमेरिकन नागरिक आहे. धोकादायक ड्रग्ज व्यवहारासंदर्भात ती फेडरल अधिकाऱ्यांच्या रडारखाली आहे. 'केटामाइन क्वीन ऑफ लॉस एंजेलिस' म्हणून ओळखली जाणारी ही महिला तिच्या नॉर्थ हॉलिवूडच्या घरातून ड्रग्जचा व्यवसाय चालवते.
उपचारादरम्यान लागले ड्रग्जचे व्यसन
उपचारादरम्यान मॅथ्यू पेरीला केटामाईनचे व्यसन जडले, असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे. त्याच्या जुन्या डॉक्टरांनी मदत करण्यास नकार दिल्याने त्याची या दोन आरोपी डॉक्टरांशी ओळख झाली. डॉक्टर डॉ. साल्वाडोर प्लॅसेन्सिया आणि डॉ. मार्क चावेझ आणि आणखी एका स्ट्रीट डिलरने यासाठी एक कट आखला होता. या दोन डॉक्टरांमध्ये काही टेक्सट मेसेजची देवाणघेवाण झाली, ज्यामध्ये एकाने लिहिले की, 'हा मूर्ख किती पैसे खर्च करेल.' असाही एक मेसेज होता.
केनेथने गुन्हा कबूल केला...
मॅथ्यू पॅरी यांची लिव्ह-इन असिस्टंट केनेथ इवामासा यांनी आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, 28 ऑक्टोबर रोजी फ्रेंड्स स्टार हॉट टबमध्ये कोसळला. त्यानंतर पॅरामेडिक्सला बोलावण्यात आले, त्यांनी त्याला मृत घोषित केले. इवामासा याने एरिक फ्लेमिंग या दुसऱ्या आरोपीकडून केटामाइन मिळवले आणि मॅथ्यूजला दिले. एरिक फ्लेमिंगला सुरुवातीला जसवीन संघाकडून ड्रग्ज मिळाले. केनेथ इवामासा यांना मॅथ्यू पेरीसाठी केटामाइनच्या अंदाजे 50 वाट्या मिळाल्या होत्या, त्यापैकी 25 अभिनेत्याच्या मृत्यूच्या चार दिवस आधी देण्यात आल्या होत्या.