लोकप्रिय तेलुगू अभिनेते फिश वेंकट यांचं निधन, प्रेक्षकांना हसवणारा कलाकार काळाच्या पडद्याआड
लोकप्रिय तेलुगू अभिनेते आणि विनोदी कलाकार फिश वेंकट यांचे आज ( 18 जुलै 2025) निधन (Fish Venkat passes away ) झाले आहे.

Fish Venkat passes away : लोकप्रिय तेलुगू अभिनेते आणि विनोदी कलाकार फिश वेंकट यांचे आज ( 18 जुलै 2025) निधन (Fish Venkat passes away ) झाले आहे. मूत्रपिंड आणि यकृत निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांचे खरे नाव हे वेंकट राज होते. दरम्यान, ते अनेक महिन्यांपासून नियमित डायलिसिसवर होते. अलीकडेच त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांनाव्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
तेलुगू उद्योगात शोककळा
मुलगी श्रावंती हिने यापूर्वी आर्थिक मदतीसाठी सार्वजनिक आवाहन केले होते, ज्यामध्ये असे म्हटले होते की 50 लाख रुपयांच्या किडनी प्रत्यारोपणाची तातडीने गरज आहे. पवन कल्याण आणि विश्वक सेन सारखे कलाकार आणि तेलंगणा सरकारचे मंत्री यांनी आर्थिक मदत दिली होती. वैद्यकीय प्रयत्न आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक आवाहनांनंतरही, योग्य किडनी दाता सापडला नाही आणि त्यांची प्रकृती खालावली. वेंकट यांच्या निधनाने तेलुगू उद्योगात शोककळा पसरली आहे, चाहते आणि सहकारी कलाकार गब्बर सिंग, अधूर आणि डीजे टिल्लू सारख्या चित्रपटांमध्ये छाप पाडणारे अनेकजन श्रद्धांजली वाहत आहेत.
प्रेक्षकांना हसवणारा कलाकार काळाच्या पडद्याआड
फिश वेंकट हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय विनोदी कलाकार होते. जे विशेषतः तेलंगणा भाषेत विनोद करण्यासाठी ओळखला जात होते. त्यांनी 'बानी', 'अधर्स', 'धी' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याच्या विनोदी पात्रांनी प्रेक्षकांना खूप हसवले होते. याशिवाय, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकाही केल्या आहेत. दरम्यान, फिश वेंकट यांच्या नधनावर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
फिश वेंकट हे पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रवंती यांच्यासोबत हैदराबादमध्ये राहत होते
मिळालेल्या माहितीनुसार, फिश वेंकट हे त्यांची पत्नी सुवर्णा आणि मुलगी श्रवंती यांच्यासोबत हैदराबादमध्ये राहत होते. त्यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीवर दुःखाची लाट पसरली आहे. चाहते आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर श्रद्धांजली वाहत आहेत आणि शोक व्यक्त करत आहेत. अलीकडेच त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांनाव्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. आज उपचार सुरु असतानाचा त्यांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात सक्रीय; अजित पवारांचे PRO संजय देशमुख यांचं निधन, अनेकांना धक्का
























