एक्स्प्लोर

FIR Against Shahrukh Khan, Deepika Padukone: हायप्रोफाईल केस; शाहरुख खान, दीपिका पादुकोण विरोधात FIR, लावलेत अनेक गंभीर आरोप

FIR Against Shahrukh Khan, Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण वादात अडकले आहेत. दोघांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे.

FIR Against Shahrukh Khan, Deepika Padukone: बॉलिवूडचा (Bollywood News) किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि मस्तानी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. दोघेही सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. बॉलिवूडच्या दोन्ही दिग्गज स्टार्स विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. दोघांविरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांवरही अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.  एका व्यक्तीनं दोन्ही स्टार्स विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयानं शाहरुख-दीपिकाविरुद्ध एफआयआर (FIR Against Shahrukh-Deepika) नोंदवण्याचे आदेश दिले, त्यानुसार दोन्ही स्टार्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण वादात अडकले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी ओम शांती ओम आणि चेन्नई एक्सप्रेस सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. आता राजस्थानमध्ये दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या याचिकेनंतर न्यायालयानं शाहरुख-दीपिकाविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. पण प्रकरण नेमकं काय? हे सविस्तर जाणून घेऊयात... 

प्रकरण नेमकं काय? 

शाहरुख आणि दीपिका ज्या प्रकरणात अडकले आहेत, ते मुळात राजस्थानातील भरतपूरचं आहे. वकील कीर्ति सिंहनं दोन्ही स्टार्सविरोधात कोर्टात एक याचिका दाखल केली होती आणि आता कोर्टानं या प्रकरणी दोन्ही सुपरस्टार्सविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी डिफेक्टिव व्हीकल्सच्या मार्केटिंगचा आरोप शाहरुख आणि दीपिका विरोधात लावण्यात आला आहे. 

गुन्हा नोंदवल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. कीर्ती सिंह यांचा आरोप आहे की, त्यांनी 2022 मध्ये सुमारे 23.97 लाख रुपयांची कार खरेदी केली. त्यानंतर त्यांनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसकडून कार कर्जही घेतलं आणि त्यातील अर्धी रक्कम रोखीनं भरली.

तक्रारीत काय म्हटलंय? 

तक्रारीत म्हटलंय की, जेव्हा ही समस्या कंपनी आणि डीलरला कळवण्यात आली, तेव्हा त्यांनी ते उत्पादनातील दोष असल्याचं मान्य केलं आणि कोणताही ठोस उपाय देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर वाहन बदलण्याची किंवा पैसे परत करण्याची मागणी देखील नाकारण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात, कंपनीच्या अधिकाऱ्यांसह, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावरही या कारची जाहिरात केल्याचा आणि ग्राहकांना दिशाभूल करण्यात जबाबदार भूमिका बजावल्याचा आरोप आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या: 

Three People Claimed Sridevi Chennai Farm House: श्रीदेवींच्या चेन्नईतल्या फार्म हाऊसवर तिघांचा दावा; बोनी कपूर यांची न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Movie Tuzya Aaila Trailer: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’! ‘तुझ्या आयला’ सिनेमाचा ट्रेलर चर्चेत, दमदार विषय, नावासारखीच भन्नाट स्टारकास्ट
‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’! ‘तुझ्या आयला’ सिनेमाचा ट्रेलर चर्चेत, दमदार विषय, नावासारखीच भन्नाट स्टारकास्ट
Netflix Trending This Week: कॉमेडी ते ॲक्शन, थ्रिलर काय म्हणाल ते! नेटफ्लिक्सवर या वीकेंडला धुमाकूळ घालतायत या 10 फिल्म्स-सीरिज; वाचा लिस्ट
कॉमेडी ते ॲक्शन, थ्रिलर काय म्हणाल ते! नेटफ्लिक्सवर या वीकेंडला धुमाकूळ घालतायत या 10 फिल्म्स-सीरिज; वाचा लिस्ट
Akshay Kumar Negative Roles: अक्षय कुमारने व्हिलन म्हणूनही गाजवलंय बॉलिवूड; बॉलिवूडच्या खिलाडीच्या या 5 खलनायकी भूमिका पाहिल्यात?
अक्षय कुमारने व्हिलन म्हणूनही गाजवलंय बॉलिवूड; बॉलिवूडच्या खिलाडीच्या या 5 खलनायकी भूमिका पाहिल्यात?
हरवलेली चातुर्मासाची पोथी घेऊन देवीच्या महालात पोहोचला बाप्पा; ‘आई तुळजाभवानी’मध्ये मोठा ट्विस्ट!
हरवलेली चातुर्मासाची पोथी घेऊन देवीच्या महालात पोहोचला बाप्पा; ‘आई तुळजाभवानी’मध्ये मोठा ट्विस्ट!

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget