Three People Claimed Sridevi Chennai Farm House: श्रीदेवींच्या चेन्नईतल्या फार्म हाऊसवर तिघांचा दावा; बोनी कपूर यांची न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
Three People Claimed Sridevi Chennai Farm House: श्रीदेवी यांच्या चेन्नईमधल्या फार्म हाऊसवर तीन लोक बेकायदेशीर दावा करत आहेत. याप्रकरणी बोनी कपूर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Three People Claimed Sridevi Chennai Farm House: बॉलिवूडच्या (Bollywood News) दिवंगत सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवींच्या (Bollywood Actress Sridevi) चेन्नईमधल्या फार्म हाऊसवर मालकी हक्क सांगणाऱ्या तीन जणांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोड (ECR) वर असलेली मालमत्ता श्रीदेवी यांनी 19 एप्रिल 1988 रोजी एम, सी, संबंदा मुदलियार यांच्याकडून खरेदी केलेली. ज्यांना दोन मुलं आणि दोन मुली होत्या. या प्रकरणी चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, बोनी कपूर यांनी आरोप केला आहे की, चेन्नई येथील फार्महाऊसवर तीन लोक बेकायदेशीर दावा करत आहेत. जी त्यांच्या दिवंगत पत्नी श्रीदेवी यांनी एप्रिल 1988 मध्ये खरेदी केली होती.
बोनी कपूर यांनी याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, मुदलियार यांच्या कुटुंबानं 1960 मध्ये परस्पर संमतीनं मालमत्ता विभागली होती आणि या कौटुंबिक व्यवस्थेच्या आधारे, अभिनेत्रीनं कायदेशीररित्या हा भूखंड मिळवला होता. पण, आता एक महिला आणि तिची दोन मुलं मालमत्तेवर आपला हक्क सांगत आहेत. त्यांचा दावा आहे की, ती महिला मुदलियार यांच्या मुलाची दुसरी पत्नी होती.
बोनी कपूर यांनी याचिकेत दावा केला आहे की, मालमत्ता ज्यांच्या नावावर होती, त्या पुरूषाची पहिली पत्नी 1999 पर्यंत जिवंत असल्यानं दुसरं लग्न बेकायदेशीर ठरते. ज्यामुळे कथित दुसरं लग्न रद्द ठरतं. 2005 मध्ये तांबरम तहसीलदारांनी त्यांना दिलेल्या कायदेशीर वारसा प्रमाणपत्रालाही त्यांनी आव्हान दिलं आणि म्हटलं की, कुटुंब तांबरममध्ये राहत नसून मैलापूरमध्ये राहत असल्यानं अधिकाऱ्याला कोणतंही अधिकार क्षेत्र नाही. त्यांनी तिघांवर वाद निर्माण करण्यासाठी प्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, बोनी कपूर यांनी जून 1996 मध्ये श्रीदेवीशी लग्न केलेलं. या जोडप्याला खुशी आणि जान्हवी कपूर या दोन मुली आहेत. तर श्रीदेवी यांचं 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये निधन झालं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























