एक्स्प्लोर

Fatwa Marathi Movie : मराठी रुपेरी पडद्यावर ‘फतवा’ चित्रपटाचा म्युझिक अनावरण सोहळा संपन्न

Fatwa Marathi Movie : ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत ‘फतवा’ या चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

Fatwa Marathi Movie : वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट सध्या लक्षवेधी ठरतायेत. गोष्टी नामंजूर असल्या की त्याविरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. फतव्याच्या वेगवेगळया बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. पण आता ‘फतवा’ हे शीर्षक असणारा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर येऊ घातला आहे. या चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. चित्रपटाचा टीझरही याप्रसंगी प्रदर्शित करण्यात आला. ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत आणि प्रतिक गौतम दिग्दर्शित ‘फतवा’ चित्रपट 9 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी ‘फतवा’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडदयावर येते आहे. या दोघांसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे,अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकार ‘फतवा’मध्ये दिसणार आहेत. डॉ.यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

प्रेम हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. कुणी त्यात आकंठ बुडालेला असतो, तर कुणी त्याच्या चाहुलीने मोहरलेला असतो. कुणाला त्याचे चटकेही बसलेले असतात. ‘फतवा’ चित्रपटातून प्रेमाचा वेगळा पैलू उलगडणार असून हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने याप्रसंगी व्यक्त केला. 

वेगवेगळ्या ढंगातील सहा गाणी या चित्रपटात आहेत. बाबा चव्हाण यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध कलेली ‘अलगद मन’, ‘प्रेमाचा गोंधळ’ ही दोन गाणी चित्रपटात असून ‘अलगद मन’ हे मनस्पर्शी गीत गायिका पल्लक मुच्चल यांनी गायलं आहे. तर ‘प्रेमाचा गोंधळ’ हे रांगडेबाज गीत गायक नंदेश उमप यांच्या पहाडी आणि दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. गीतकार डॉ.विनायक पवार यांच्या लेखनीतून उतरलेलं ‘चोरून चोरून’, ‘सजनी दोघं एक होऊ’ या प्रेमगीतांना अभय जोधपूरकर वेदा नेरुरकर यांचे मधुर स्वर लाभले असून संजीव–दर्शन यांनी या गीतांना संगीत दिले आहे. गीतकार अमोल देशमुख यांनी गीतबद्ध केलेलं ‘पुन्हा पुन्हा’ या भावप्रधान गाण्याला पद्मश्री सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. प्रतीक गौतम,प्रवीण पगारे,सिद्धार्थ पवार यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. आराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेलं ‘अली मौला’ ही कव्वाली साबरी ब्रदर्स यांनी गायली आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे.

‘फतवा’ चित्रपटाची कथा प्रतिक गौतम यांची आहे. छायांकन दिलशाद व्ही. ए. तर संकलन फैजल महाडिक, इमरान महाडिक यांचे आहे. कला योगेश इंगळे तर साहसदृश्य कौशल मोजेस यांची आहेत. रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे तर वेशभूषा वर्षा यांची आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

Jeta : 25 नोव्हेंबर रोजी 'जेता' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; नीतिश आणि स्नेहल साकारणार प्रमुख भूमिका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget