Fardeen Khan Spotted With Mystery Woman: 'ही माझी बायको नाही रे...', इव्हेंटमध्ये मिस्ट्री वुमनसोबत स्पॉट झाला प्रसिद्ध अभिनेता; सर्वांसमोर म्हणाला असं काही की... VIDEO
Fardeen Khan Spotted With Mystery Woman: अभिनेता फरदीन खान एका इव्हेंटमध्ये आलेला, त्यावेळी तो एका मिस्ट्री वुमनसोबत स्पॉट झाला. फरदीन सुटाबुटात आणि ती महिला ब्लॅक कलरच्या ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसली. ती महिला कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Fardeen Khan Spotted With Mystery Woman: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) नुकताच स्पॉट झालाय. मुंबईतील (Mumbai News) एका इव्हेंटसाठी फरदीन खाननं हजेरी लावलेली. यावेळी अभिनेता एका महिलेसोबत स्पॉट झाला आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या. अनेकांनी फरदीन खानची पत्नी म्हणून दोघांचे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली, तर तिथे उपस्थित असलेल्या काही पॅपाराझींनासुद्धा ती महिला फरदीन खानची पत्नी असल्याचा समज झाला. पण, तेवढ्यात फरदीननं असं काही केलं की, सर्वांनाच त्यानं कोड्यात टाकलं.
अभिनेता फरदीन खान एका इव्हेंटमध्ये आलेला, त्यावेळी तो एका मिस्ट्री वुमनसोबत स्पॉट झाला. फरदीन सुटाबुटात आणि ती महिला ब्लॅक कलरच्या ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसली. दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. पण, त्या मिस्ट्री वुमनपेक्षाही त्या व्हिडीओमध्ये फरदीन खाननं केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. फरदीन खान व्हिडीओमध्ये पॅपाराझींना म्हणाला की, "ही माझी पत्नी नाही..."
फरदीन खानचा VIDEO व्हायरल (Fardeen Khan Viral Video)
फरदीन खान म्हणाला की, "मला स्पष्ट करायचंय की, ही माझी पत्नी नाही... ही माझी बहीण आहे... खूप हँडल्सवर तुम्ही सारेजण हिचा माझी पत्नी म्हणून उल्लेख करता..." फरदीनचं वक्तव्य ऐकताच त्याच्यासोबत असलेली त्याची बहीण लैला खान खळखळून हसू लागली. लैला खान म्हणाली की, "हे खरंच खूप गरजेचं होतं..."
View this post on Instagram
फरदीन खानसोबत दिसलेली 'ती' मिस्ट्री वुमन कोण? (Fardeen Khan Spot With Mistry Women)
फरदीन खानसोबत दिसलेली मिस्ट्री वुमन लैला खान आहे. लैला खान आणि फरदीन खान दोघेही सख्खे भाऊ-बहीण आहेत. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते फिरोज खान यांची ही दोन्ही मुलं. लैला खाननं फरहान फर्नीचरवाला याच्याशी आपली लग्नगाठ बांधलीय. लैला खान लाईमलाईटपासून दूर असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















