Prajakta Mali : तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाहीये..., प्राजक्ता माळीला आली लग्नाची मागणी; म्हणाली, माझं काही खरं...
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला सोशल मीडियावर एका चाहत्याने लग्नासाठी मागणी घातली आहे. त्यावर प्राजक्ताने उत्तराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
Prajakta Mali : फुलवंती सिनेमामुळे सध्या अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही बरीच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळालं. सिनेमाच्या या यशानंतर प्राजक्ताचं बरंच कौतुकही झालं, कारण याच सिनेमातून तिने निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं होतं. नुकतच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांसोबत संवाद साधला. त्यामध्ये एका चाहत्याने थेट प्राजक्ताला लग्नाची मागणीच घातली आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर आस्क मी हे सेशन घेतलं. त्यामध्ये तिने म्हटलं होतं की, चला आज पहिल्यांदाच अशाप्रकारे गप्पा मारुयात..! यावेळी अगदी तिच्या क्रशपासून ते तिच्या सिनेमापर्यंत अनेक प्रश्न चाहत्यांनी प्राजक्ताला विचारले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्राजक्ताने दिल्याचं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे ज्या चाहत्याने तिला लग्नाची मागणी घातली आहे, त्याच्याही प्रश्नाचं उत्तर प्राजक्ताने दिलं आहे.
प्राजक्ताला चाहत्याने घातली लग्नाची मागणी
प्राजक्ताला एका चाहत्याने लग्नाची मागणी घालत म्हटलं की, तू माझ्यासोबत लग्न करणार का? तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाहीये.. Love you...! चाहत्याच्या या प्रश्नावर उत्तर देताना प्राजक्ताने म्हटलं की, माझं काही खरं नाही...तुम्ही करुन टाका...(सगळेच जे थांबलेत) (जनहित मे जारी..) (Spread the Words) प्राजक्ताच्या या उत्तराची सध्या बरीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.
फुलवंती सिनेमाची कथा काय?
‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका आहे. ज्या भूमिकेत प्राजक्त माळी आहे. ती कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात तेही पेशवे दरबारात तिचं येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. ही भूमिका अभिनेता गष्मीर महाजनी साकारत आहे. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं. नृत्यांगणा ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज आणि आव्हानांवर हा सिनेमा आधारित आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात मांडण्यात आलीये.
View this post on Instagram