Oscar New Rules : 'ऑस्कर'चे नवे नियम जाहीर; फिल्म मेकर्सला आता 'या' रुल्सचं पालन करावं लागणार!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2'चा टीझर आऊट! 'या' दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ
Squid Game 2 Teaser Out : 'स्क्विड गेम' (Squid Game 2) या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. या या बहुचर्चित कोरियन वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे.
Adipurush box office collection Day 2 : पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट; तरी दोन दिवसांत पार केला 150 कोटींचा टप्पा
Adipurush box office collection Day 2 : रामायणावर आधारित असलेला 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे.
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 90 कोटींची जास्त कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 65 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे.
Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती
Adipurush Movie Latest Update : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमावर टीका होत आहे. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. पण आता 'आदिपुरुष' सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर म्हणाले.