Entertainment News Live Updates 9 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Jun 2022 02:07 PM
श्वेताच्या जीवघेण्या प्लॅनमध्ये चिमुकली दीपिका अडकणार, आयेशा-कार्तिकच लग्न पुन्हा मोडणार!

Rang Majha Vegla : ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एकीकडे कार्तिकीला तिच्या बाबांविषय सत्य कळलं आहे. तर, दुसरीकडे दीपिकाची खोटी आई बनून आलेली बाई देखील आता इनामदारांच्या घरातून बाहेर गेली आहे. सगळं काही सुरळीत सुरु असताना आता पुन्हा एकदा श्वेताच्या डोक्यात एक नवी जीवघेणी योजना आली आहे. मात्र, यावेळी तिच्या या प्लॅनमध्ये चिमुकली दीपिका अडकणार आहे.


आता कार्तिकीला तिच्या वडिलांबद्दलचं सत्य कळलं आहे. इतकी वर्ष दीपाने लपवून ठेवलेलं सत्य अखेर चिमुकल्या कार्तिकीसमोर आलं आहे. मात्र, या नंतर आता तिच्या मनात अनेक प्रश्नाचं काहूर माजलं आहे. कार्तिकीच्या बालमनाला असंख्य प्रश्न पडले आहे. तर, कार्तिक दीपाचा नवरा आहे, तर आपण त्याचीच मुलगी आहोत, हे त्याला का माहित नाही? तो आपल्याला का स्वीकारत नाही?, असे अनेक प्रश्न कार्तिकीला पडले आहेत. आपल्या मनातील हे सगळे प्रश्न विचारून ती दीपाला हैराण करत आहे. तर, चिमुकल्या लेकीला उत्तरं तरी कशी द्यावीत, या विचारत दीपा देखील दुःखी झाली आहे.


वाचा संपूर्ण बातमी 

‘विक्रम 2’मध्ये RRR फेम ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री होणार

Vikram 2 Update : लोकेश कनगराज दिग्दर्शित कमल हासन (Kamal Haasan) अभिनित ‘विक्रम’ (Vikram) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 3 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर त्याच्या सिक्वेलची चर्चाही जोर धरू लागली आहे. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘विक्रम’च्या पुढच्या भागात दाक्षिणात्य अभिनेता राम चरणची (Ram Charan) एन्ट्री होऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे.


‘विक्रम’च्या कथेत कमल हासन आपल्या नातवाच्या शोधात असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण, हा नातू चित्रपटात दाखवलेलाच नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार 'विक्रम'च्या पुढच्या भागात अभिनेता राम चरण, कमल हासनच्या नातवाची भूमिका साकारणार आहे. आता ‘RRR’ आणि ‘विक्रम’ या दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटातील एकत्र येणार म्हणजे बॉक्स ऑफिसवर नक्कीच धमाल पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांवर दिसली ‘भूल भुलैया 2’ची जादू, तिसऱ्या आठवड्यात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ‘भूल भुलैया २’ चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन आता 20 दिवस झाले आहेत. या 20 दिवसांत कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटाने अनेक विक्रमही रचले आहेत. ‘भूल भुलैया 2’ने आता 161 कोटींची कमाई केली आहे. ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट गेल्या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर 'भूल भुलैया 2'ने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांना तगडी टक्कर दिली आहे.


वाचा संपूर्ण बातमी 

'500 रुपये दे कौतुक करतो'; मजेशीर कमेंट करणाऱ्या नेटकऱ्याला कार्तिक म्हणाला...

Kartik Aaryan : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या  'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या त्याच्या चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत आहे.  कार्तिक हा सोशल मीडियाच्या माध्यमामधून त्याच्या चाहत्यांसोबत चर्चा करत असतो. ट्विटरवर कार्तिकनं #AskKartik नावाचे सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमध्ये अनेकांनी कार्तिकला काही प्रश्न विचारले प्रश्न तर काहींनी कार्तिकच्या अभिनयाचं कौतुक केलं. एका नेटकऱ्यानं मात्र कार्तिकला एक मजेशीर कमेंट केली. त्यानं '500 रुपये दे कौतुक करतो' असं ट्वीट केलं. नेटकऱ्यांच्या या कमेंटला कार्तिकनं दिलेल्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधलं. 


सविस्तर वाचा 

नसीरुद्दीन शाह यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

Naseeruddin Shah : नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. फरहान अख्तर, कंगना रनौत यांनी या वक्तव्याबाबतचे त्यांचे मत व्यक्त केले होते. आता नुकतीच ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी देखील नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. 


वाचा सविस्तर वाचा 

आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार नयनतारा-विग्नेशचा विवाह सोहळा

Nayanthara, Vignesh Shivan : अभिनेत्री  नयनतारा (Nayanthara) आणि विग्नेश शिवन (Vignesh Shivan) यांचा विवाह सोहळा 9 जून रोजी रिलीज होणार आहे. नयनतारा आणि  विग्नेश यांचा लग्न सोहळा महाबलिपुरम येथे पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी नयनतारा आणि  विग्नेश हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते. नयनतारा आणि  विग्नेश यांचा विवाह सोहळा  महाबलिपुरममधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार आहे. त्यांच्या लग्न सोहळ्याला शाहरुख खान (Shah Rukh Khan), रजनीकांत (Rajinikanth) असे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 


वाचा सविस्तर बातमी

मानहानीचा खटला जिंकल्यानंतर जॉनीने मानले चाहत्यांचे आभार!

Johnny depp : हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी आणि अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीविरुद्ध मानहानीचा खटला जिंकल्यानंतर हे यश जल्लोषात साजरा करताना दिसत आहे. दरम्यान, त्याने त्याच्या विजयात आणि वाईट काळात साथ दिल्याबद्दल, सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने आधी टिकटॉक आणि नंतर इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. या व्हिडीओ काही वेळांतच लाखो व्हूज मिळाले आहेत.


वाचा संपूर्ण बातमी

किंग खानच्या चित्रपटात दिसणार पुण्यातील 'हे' मेट्रो स्टेशन

Shah Rukh Khan : प्रसिद्ध अभिनेता आणि बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या  शाहरुख खानने  (Shah Rukh Khan) 3 एप्रिल रोजी 'जवान' (Jawan) या त्याच्या आगामी चित्रपटचा टीझर रिलीज केला. या टीझरमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले पण आता हा टीझर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.  पुणे (Pune) मेट्रोच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा पुण्यातील  संत तुकाराम नगर या मेट्रो स्थानकावर बसलेला दिसत आहे. 


वाचा सविस्तर बातमी

किंग खानच्या चित्रपटात दिसणार पुण्यातील 'हे' मेट्रो स्टेशन

Shah Rukh Khan : प्रसिद्ध अभिनेता आणि बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या  शाहरुख खानने  (Shah Rukh Khan) 3 एप्रिल रोजी 'जवान' (Jawan) या त्याच्या आगामी चित्रपटचा टीझर रिलीज केला. या टीझरमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले पण आता हा टीझर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.  पुणे (Pune) मेट्रोच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा पुण्यातील  संत तुकाराम नगर या मेट्रो स्थानकावर बसलेला दिसत आहे. 


वाचा सविस्तर बातमी

पहिलाच चित्रपट ठरला सुपरहिट, तरीही कारकीर्द वाचवू शकली नाही अमीषा पटेल!

Ameesha Patel Birthday : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल (Ameesha Patel) आज (9 जून) आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. 9 जून 1976 रोजी मुंबईत गुजराती कुटुंबात जन्मलेल्या अमीषाने 2000मध्ये 'कहो ना प्यार है' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. 2001मध्ये आलेला तिचा 'गदर' हा चित्रपटही सुपरहिट ठरला. अमीषा पटेलने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत 40हून अधिक चित्रपट केले आहेत. मात्र, तिच्या कारकिर्दीचा आलेख सतत घसरत राहिला.


अमीषाला या 'कहो ना प्यार है' चित्रपटात तिच्या वडिलांमुळे भूमिका मिळाली होती. या चित्रपटाच्या यशानंतर 2001 साली आलेल्या 'गदर' चित्रपटातून खऱ्या अर्थाने तिला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात सनी देओलसोबत अमीषाने उत्तम काम केले होते. या चित्रपटासाठी अमीषाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. 2002 मध्ये अमिषाने बॉबी देओलसोबत 'हमराज' चित्रपटात काम केले होते. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. तीन वर्षात सलग तीन हिट चित्रपट देऊनही अमीषाचे करिअर मात्र उतरणीला लागले.

विक्रमच्या यशानंतर सूर्याला कमल हसन यांनी दिलं 'रोलेक्स' घड्याळ

Vikram :  अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांचा विक्रम (Vikram) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत 200 कोटींची कमाई केली. विक्रम या चित्रपटामध्ये अभिनेता सूर्यानं ड्रग्स माफिया असणाऱ्या रोलेक्स नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. बुधवारी (8 जून) कमल हसन यांनी सूर्याला त्यांच्या भूमिकेच्या नावाप्रमाणेच 'रोलेक्स' हे घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं. या घडाळ्याची किंमत 47 लाख रुपये आहे. 

Happy Birthday Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी असूनही सोनमला करावी लागली ‘वेट्रेस’ची नोकरी!

Sonam Kapoor Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आज (9 जून) तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या सोनम कपूर प्रेग्नंट आहे आणि अशा परिस्थितीत तिचा वाढदिवस आणखी खास असणार आहे. सोनमला तिच्या वाढदिवसाची उत्सुकता खूप आधीपासून लागली होती. तिने पती आनंद आहुजासोबतचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर करून वाढदिवसाच्या आठवड्याची सुरुवात केल्याचा आनंद शेअर केला होता. आज अखेर तो आनंदाचा दोवास आला आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया अभिनेत्रीबद्द्लच्या काही खास गोष्टी...


बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सोनम तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध आहे. फॅशनला नवी व्याख्या देणारी सोनम अनेकदा तिच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करत असते. अभिनेत्रीच्या रेड कार्पेट लूकपासून ते रोजच्या लूक्सपर्यंत सारंकाही नेहमीच चर्चेत असतं.


वाचा संपूर्ण बातमी 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


‘मिस मार्वल’चा ग्रँड प्रीमिअर, मार्वल सिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेताही झळकणार!


मार्वल स्टुडिओच्या बहुप्रतिक्षित सिरीज ‘मिस मार्वल’चा आज ग्रँड प्रीमिअर होणार आहे. अभिनेत्री इमान वेलानी यात ‘कमला खान’च्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेता-चित्रपट निर्माता फरहान अख्तर मार्वल स्टुडिओच्या पहिल्या मुस्लिम सुपरहिरो सीरीज 'मिस मार्वल'मध्ये झळकणार आहे.


'सुजल-द वोर्टेक्स' 30 पेक्षा अधिक भाषेत होणार प्रदर्शित


'सुजल-द वोर्टेक्स' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. 'विक्रम वेधा' फेम पुष्कर आणि गायत्रीने या वेबसीरिजचे लेखन आणि निर्मिती केली आहे. ही वेबसीरिज आठ पेक्षा अधिक भाषेत प्रदर्शित होणार आहे.


ओटीटीवर दिसली ‘बाबा निराला’ची जादू, अवघ्या दोन दिवसांत पार केले 100 मिलियन व्ह्यूज!


एमएक्स प्लेयरच्या 'एक बदनाम-आश्रम' या वेब सीरीजचा तिसरा सीझन चांगलाच पसंत केला जात आहे. प्रेक्षकही ही सीरीज मोठ्या प्रमाणावर पाहत आहेत. आत बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’ने एक मोठा विक्रम केला आहे. बॉबी देओल स्टारर या वेब सीरीजच्या तिसऱ्या सीझनने ओटीटीच्या जगात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सीरीजचा तिसरा सीझन रिलीज होताच काही तासांतच व्ह्यूजचा विक्रम केला. ‘एक बदनाम-आश्रम 3’ला अवघ्या 32 तासांत 100 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.


अभिनेत्री सोनाली सहगलला कोरोनाची लागण


देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. बॉलिवूडमध्येदेखील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. आता अभिनेत्री सोनली सहगलला कोरोनाची लागण झाली आहे. सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.


‘झोलझाल’ चित्रपटतून अभिनेता अमोल कागणे प्रेक्षकांच्या भेटीला


'हलाल', 'भोंगा', 'बेफाम', 'वाजवूया बँड बाजा', 'लेथ जोशी' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीनंतर अमोल कागणेने 'बाबो' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले असून, येत्या 1 जुलैला पुन्हा एकदा तो नव्याकोऱ्या आणि हास्यांची मैफिल घेऊन 'झोलझाल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पदार्पणातच एक ना अनेक पारितोषिकं पटकावणारा हा तरुण निर्माता, अभिनेता म्हणजे एक अजब रसायनच आहे. हा मेडिकलचा विद्यार्थी आपल्या फावल्या वेळात मनोरंजनासाठी नाटकं करू लागला आणि त्यातूनच अमोलला त्याच्या करिअरची अचूक दिशा गवसली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.