(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Entertainment News Live Updates 8 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
सलमानच्या नव्या चित्रपटाचं नाव जाहीर; लूकनं वेधलं लक्ष
सलमानच्या आगामी चित्रपटाचं नाव 'किसी का भाई किसी की जान' असं आहे. या चित्रपटातील सलमानचा लूक देखील रिव्हिल करण्यात आला आहे. लांब केस, डोळ्यावर गॉगल अशा डॅशिंग लूकमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खान फिल्म्स या नावाच्या युट्युब चॅनलवरुन 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील सलमानच्या लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमानच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे.
सेक्रेड गेम्समुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेने ऊस कामगारांच्या मुलांसाठी उभी केली शाळा
बहुचर्चित असलेल्या सेक्रेड गेम्स (sacred games) या वेबसिरीजमुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेला (rajshri deshpande) आपण आतापर्यंत अनेक चित्रपटात पाहिले आहे. मात्र अभिनयाच्या पलीकडे राजश्री करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची देखील अनेकदा चर्चा होते. तिच्या अशाच एका सामाजिक उपक्रमांने सर्वांचे मनं जिंकले आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबादच्या ढोरकीन तांड्यावर राजश्रीच्या हस्ते एका जिल्हा परिषदेच्या शाळेचे (zp School) लोकार्पण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या शाळेची ईमारत राजश्रीने स्वखर्चाने उभी केली आहे.
'पोन्नियिन सेल्वन' चित्रपटाचा भव्य ट्रेलर रिलीज
मणिरत्नम यांचा पोन्नयिन सेल्वन-1 हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा ट्रेलर तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 10 व्या शतकाचा इतिहास दाखवण्यात आला आहे. ऐश्वर्या राय बच्चन पोन्नियिन सेल्वनमध्ये राणी नंदिनीची भूमिका साकारत आहे. तर ट्रेलरमधील ऐश्वर्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर केली रद्द
हॉलिवूडचा लोकप्रिय गायक जस्टिन बीरचे चाहते जगभर आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी जस्टिन बीबर आजाराशी झुंज देत असल्याने चर्चेत आला होता. पण आता जस्टिन बीबर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जस्टिन बीबरने वर्ल्ड टूर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Lootere : हंसल मेहताच्या 'लुटेरे'चा टीझर आऊट
Lootere Teaser : हंसल मेहताचा मुलगा जय मेहताच्या आगामी 'लुटेरे' या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. या वेबसीरजी निर्मितीदेखील हंसल मेहता करत आहे.
View this post on Instagram
Ashwattha : लोकेश गुप्तेच्या आगामी 'अश्वत्थ' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात
Ashwattha : 'अश्वत्थ' (Ashwattha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता लोकेश गुप्ते (Lokesh Gupte) निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आजपासून पुण्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे
View this post on Instagram
Aapdi Thaapdi : श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे खेळणार 'आपडी-थापडी'चा खेळ
Aapdi Thaapdi : श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) मराठी मनोरंजनक्षेत्रासह बॉलिवूडमध्येदेखील आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) लवकरच 'आपडी थापडी' (Aapdi Thaapdi) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
View this post on Instagram
Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो आऊट
Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमो शेअर करत महेश मांजरेकरांनी लिहिलं आहे,"मी करणार करणार आहे बिग बॉस मराठीची सगळ्यात मोठी घोषणा... पहात रहा आपलं लाडकं कलर्स मराठी!".
View this post on Instagram