Entertainment News Live Updates 6 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
डिसेंबरचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी धमाकेदार; एक दोन नव्हे तर तब्बल 32 चित्रपट होणार प्रदर्शित
Movies Releasing In December 2022 : यावेळी 2022 हे वर्ष चित्रपटप्रेमींसाठी काहीसे निराशाजनक ठरले आहे. बॉयकॉटच्या (Boycott) ट्रेंडमध्ये काही चित्रपट काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत. मात्र, वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात (December 2022) प्रेक्षकांसाठी काहीतरी खास घडणार आहे. डिसेंबरचा दुसरा आठवडा हा अनेक चित्रपटांनी भरलेला असणार आहे. क्राइम, थ्रिलर, कॉमेडीपासून सस्पेन्सपर्यंत सर्व काही या आठवड्यात प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला 5 ते 11 डिसेंबर दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संपूर्ण यादी सांगणार आहोत. या डिसेंबर महिन्यात जवळपास 32 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; तिसऱ्या सिझनचं शूटिंग झालं पूर्ण
Ali Fazal Mirzapur 3: मिर्झापूर या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सीरिजचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सीरिजच्या तिसऱ्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. मिर्झापूरमधील गुड्डू पंडित ही भूमिका साकारणारा अभिनेता अली फजलनं (Ali Fazal) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मिर्झापूर- 3 (Mirzapur 3) चं शूटिंग पूर्ण झाले आहे. आता लवकरच मिर्झापूर सीरिजचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Yog Yogeshwar Jay Shankar: 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिका रंजक वळणावर !
Yog Yogeshwar Jay Shankar: छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. सध्या ‘योगयोगेश्वर जय शंकर’ ( Yog Yogeshwar Jay Shankar) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता या मालिकेत रंजक वळण येणार आहे. मालिकेत बालशंकर अंतापूर सोडून जगत कल्याणासाठी निघणार हा आध्यात्मिक टप्पा सध्या चरणसीमेवर असून चिमणाजी – पार्वती या दांपत्याने बालशंकरचा केलेला सांभाळ आणि आता त्याने त्यांना सोडून जाण्याचा क्षण निर्माण होणे, हे प्रेक्षकांना भावुक करणार आहे.
'वेड' सिनेमातील 'बेसुरी' गाणं आऊट
अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) सध्या त्यांच्या आगामी 'वेड' (Ved) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून जेनेलिया मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. आता या सिनेमातील 'बेसुरी' (Besuri) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Akshay Kumar: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार; शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले...
Vedant Marathe Veer Daudale Saat: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) हा 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedant Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अक्षयनं आज एक पोस्ट शेअर करुन चित्रपटाबाबत माहिती दिली. आता नुकताच अक्षयनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे.
View this post on Instagram
Mohandas Sukhtankar : मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या मोहनदास सुखटणकरांना पहिलं नाटक कसं मिळालं?
Mohandas Sukhtankar : सुखटणकरांचं बालपण गोव्यात गेलं. शाळेत असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली. आंतरशालेय नाटुकल्या स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले होते. दुसरीत असताना त्यांनी 'खोडकर बंडू' या नाटुकलीत काम केलं. त्यावेळी त्यांना अभिनय येतो म्हणून नव्हे तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून शाळेतील शिक्षकांनी नाटुकलीत घेतलं होतं. या नाटुकलीच्या निमित्ताने त्यांना पहिल्यांदा रंग लागला. 'खोडकर बंडू' या नाटुकलीत त्यांनी खोडकर बंडूची भूमिका साकरली होती. या नाटकामुळे त्यांना अभिनयाची आवड असल्याची जाणीव झाली.
Post Office Ughad Aahe : 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' नवी मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज
Post Office Ughad Aahe : छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका सुरू आहेत. मालिकांसह वैविध्यपूर्ण कार्यक्रमदेखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. आता लवकरच 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' (Post Office Ughad Aahe) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम अभिनेत्रीच्या कारला ट्रकची धडक
Hetal Yadav : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हेतल यादवचा (Hetal Yadav) अपघात झाला आहे. सध्या ती छोट्या पडद्यावरील 'इमली' (Imlie) या लोकप्रिय मालिकेत शिवानी राणा हे पात्र साकारत आहे. हेतल रविवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत असताना तिच्या कारला ट्रकने धडक दिली.
Kirstie Alley : एमी पुरस्कार विजेती अभिनेत्री किर्स्टी एली यांचं वयाच्या 71 व्या वर्षी निधन
Kirstie Alley Passed Away : 'चीअर्स' आणि 'ड्रॉप डेड गॉर्जिअस' फेम अभिनेत्री किर्स्टी एली (Kirstie Alley) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आहे. एली यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
— Kirstie Alley (@kirstiealley) December 6, 2022