Entertainment News Live Updates 5 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
After Operation London Cafe : अभिनेत्री मेघा शेट्टी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे (After Operation London Cafe) सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. निर्माते दिपक राणे यांनी आपल्या या सिनेमातून कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीला मराठी सिनेमात लाँच केले आहे. मेघा शेट्टी (Megha Shetty) ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. ट्रायबल रायडींग आणि दिलपसंद या सिनेमातही मेघाने काम केले आहे. कन्नड इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त अभिनेत्री म्हणून मेघाचे नाव घेतले जाते.
'सोशल मीडिया स्टार' नील सालेकरकडून चाहत्यांना खास गिफ्ट; 'जिंकलो' गाणं रिलीज
सोशल मीडियावरील (Social Media) स्टार असणारा नील सालेकर (Neel Salekar) हा इन्स्टाग्रामवर नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळा कंटेन्ट घेऊन येत असतो. त्या नीलचं एक भन्नाट गाणं रिलीज झालं आहे. नील सालेकर उर्फ जस्ट नील थिंग्सने गली गँगच्या डी'इव्हिल आणि कांचनसोबत 'जिंकलो' हे गाणं रिलीज केले आहे. वाढदिवसाचं औचित्य साधत नीलनं त्याच्या चाहत्यांना हे गिफ्ट दिलं आहे. इंस्टाग्रामवर एक मिलियनचा टप्पा नीलनं पार केला. याचं सेलिब्रेशन करत नीलने त्याच्या मित्रांसोबत मिळून हे गाणं तयार केलं.
ब्रह्मास्त्रमधील 'देवा देवा' गाणं होणार रिलीज; पाहा टीझर
प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील केसरिया (Kesariya) हे गाणं 17 जुलै रोजी रिलीज झालं. आता या चित्रपटामधील 'देवा देवा' (Deva Deva) या गाण्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गाण्याच्या टीझरमध्ये रणबीर, आलियाला आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे दिसत आहेत.
'या' भूमिकेसाठी घेतले 12 कोटी? करीनानं दिलेल्या उत्तरानं वेधलं अनेकांचे लक्ष
गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की, सीता ही भूमिका करीना साकारणार आहे. एका रिपोर्टनुसार, बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद हे सीता: द इनकार्नेशन या चित्रपटाचं शूटिंग करणार आहेत. हा चित्रपट पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय विजयेंद्र प्रसाद यांनी घेतला आहे, असं म्हटलं जात आहे. एका रिपोर्टनुसार सीता ही भूमिका साकारण्यासाठी करीनानं 12 कोटींची डिमांड केली. ज्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केलं. या सर्व गोष्टींवर करीनानं प्रतिक्रिया दिली की, या चित्रपटाची तिला ऑफर देखील आली नाही.
Aboli : ‘अबोली’ मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; साकारणार वकिलाची भूमिका
स्टार प्रवाहवरील ‘अबोली’ (Aboli) मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. सोहमच्या खुनाचा आरोप अबोलीवर आहे. अबोलीने खरंच हा खून केलाय की तिला विनाकारण यात अडकवलं जातंय याची उकल मालिकेच्या पुढील भागांमधून होईलच. पण सध्या खुनाचं हे नाट्य कोर्टापर्यंत येऊन पोहोचलं आहे.अबोलीच्या बाजून केस लढणार आहे नामांकित वकील अजिंक्य राजाध्यक्ष. सुप्रसिद्ध अभिनेता गौरव घाटणेकर (Gaurav Ghatnekar) हा अजिंक्य राजाध्यक्ष ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
Dharmaveer : ब्लॉकबस्टर 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे.
View this post on Instagram
Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत सलग चौथ्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर
टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे. तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.
Dagdi Chaawl 2 : 'दगळी चाळ 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर आऊट
Dagdi Chaawl 2 : 'दगळी चाळ 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाळ काही विसरत नसते असे म्हणत या सिनेमाचे नवे पोस्टर आऊट झाले आहे. 18 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
Raqesh Shamita Song : ब्रेकअपनंतर राकेश-शमिताचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; 'तेरे विच रब दिसदा' सोशल मीडियावर व्हायरल
Raqesh Shamita Song : बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) ब्रेकअपमुळे सध्या चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटीमुळे शमिता आणि राकेश चर्चेत आले होते. आता ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'तेरे विच रब दिसदा' (Tere Vich Rab Disda) असे या गाण्याचे नाव आहे.
View this post on Instagram
Bigg Boss 16 : भाईजानच्या बहुचर्चित कार्यक्रमात फरमानी नाजची एन्ट्री? 'बिग बॉस 16' लवकरच होणार सुरू
Bigg Boss 16 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस (Bigg Boss) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतो. लवकरच या कार्यक्रमाचे सोळावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमात 'हर हर शंभू' गाणं गाणारी फरमानी नाज (Farmani Naaz) सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.