Entertainment News Live Updates 4 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Snehal Shidam : 'देवमाणूस' (Devmanus) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. जामकर आणि देवयानीच्या एन्ट्रीनंतर ही मालिका विलक्षण वळणावर आली आहे. जामकरने अजितकुमारला पुरता अडकवलं आहे. त्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात अडकण्याचा निश्चय जामकरने केला आहे. त्यासाठी लागणारा सर्व तपास जामकर करतो आहे. आता या मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. जामकरच्या पत्नीची आता मालिकेत एन्ट्री होणार आहे.
RRR Beats Hollywood Films : एस.एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'आरआरआर' (RRR) सिनेमा दिवसेंदिवस नव-नवे रेकॉर्ड करत आहे. या सिनेमात ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. जगभरात या सिनेमाने 1115 कोटींची कमाई केली आहे. आता या सिनेमाने हॉलिवूडच्या अनेक सिनेमांना मागे टाकलं आहे.
Karan Johar JUdge Jhalak Dikhhla Jaa : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhhla Jaa) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता या कार्यक्रमाच्या दहाव्या सीझनला सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच पहिल्या क्रमांकावर होता. या कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. या कार्यक्रमाचे परिक्षण वेगवेगळे सेलिब्रिटी करत असतात. 'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या दहाव्या पर्वाच्या परिक्षणाची धुरा बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर सांभाळणार आहे. काजोलने या कार्यक्रमाची ऑफर धुडकावली आहे.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रनवे 34' (Runway 34) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत आहे. अजयचा आगामी 'भोला' (Bholaa) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कॅथी' (Kaithi) या दाक्षिणात्य सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात अजय भोला हे पात्र साकारण्यासोबतच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.
पाहा गाणं:
Vikram : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तीन जून रोजी कमल हसन (Kamal Hassan)यांचा 'विक्रम' (Vikram) हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400.2 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 135 कोटींची कमाई केली होती. चित्रपटामधील डायलॉग्स आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. नुकतीच प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूनं (Mahesh Babu) विक्रम या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे. त्यानं ट्वीट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केले.
Kaali Poster Controversy : बॉलिवूड चित्रपटांमधून सातत्याने हिंदू देवदेवतांचा अपमान केला जातो, यावरून अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. आताही अशीच एक घटना घडली आहे. मात्र, यावेळी नेटकरी प्रचंड संतापले असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालय, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत कारवाई कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, सदर व्यक्तीला अटक आकारण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. ‘काली’ (Kaali Poster Controversy) नावाच्या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून हा वाद सुरु झाला आहे. चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरमुळे देशाभरात संतापाची लाट उसळली आहे.
या माहितीपटाच्या पोस्टरमध्ये काली माता साकारणारी अभिनेत्री सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे. इतकेच नाही तर, काली मातेच्या हातात LGBTQ वर्गाचा झेंडाही दाखवण्यात आला आहे. लीना यांनी हे पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. यानंतर आता लीना यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ:
Mumbai Metro Car Shed : मुंबईतील मेट्रो कारशेड आरेतच (Aarey Colony) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचित शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. तर, दुसरीकडे काही लोक या आरेतील कारशेडच्या निर्णयाला पाठिंबा देत आहे. यावरून बरेच वादही निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणी अभिनेते सुमीत राघवन (Sumeet Raghvan) यांनी देखील एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून त्यांनी सरकारला हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली आहे.
मेट्रोचे कारशेड आरेतच बनणार या सरकारच्या निर्णयाला अभिनेते सुमीत राघवन यांनी ट्वीट करत पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी ट्विटर पोस्ट लिहित नवनिर्वाचित सरकारला एक विनंती केली आहे.
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप चर्चेत आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाव्यतिरिक्त आलिया प्रेग्नेंट असल्यामुळेही चर्चेत आहे.
Sini Shetty Miss India 2022 : कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं (Sini Shetty) मिस इंडिया 2022 (Miss India 2022) चा किताब आपल्या नावे केला आहे. देशाला यंदाच्या वर्षीची मिस इंडिया मिळाली आहे. 3 जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मिस इंडिया 2022 च्या अंतिम फेरीत 31 फायनलिस्टवर मात देत सिनीनं 'मिस इंडिया 2022'चा मुकूट आपल्या नावे केला. अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनर अप ठरली. मिस इंडियाच्या ग्रँड फिनालेमध्ये तिघीही खूप सुंदर दिसत होत्या.
Tujha Laal Dupatta : प्रशांत नाकती (Prashant Nakti ) यांच्या प्रॉडक्शन हाऊसने त्यांच्या नावासारखंच संपूर्ण महाराष्ट्राला मराठी गाण्यांच्या माध्यमातून ‘नादखुळा’ केलं आहे. प्रशांत नाकती यांना संगीत विश्वातील ‘मिलिनिअर’ का म्हणतात हे सर्वांनाच ठाऊक आहे, त्यांच्या गाण्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून मिलिअन प्रेम मिळाले आहे आणि त्या प्रेक्षकांच्या प्रेमाखातरच ते नवनवीन गाणी तयार करतात. असंच एक त्यांचं नवीन गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.
निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित ‘तुझा लाल दुपट्टा’ (Tujha Laal Dupatta) हे नवीन रोमँटिक गाणं लवकरच ‘नादखुळा म्युझिक’ या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. बऱ्याच विशेष कारणांमुळे हे गाणं अतिशय विशेष ठरलं आहे. त्यातील पहिलं विशेष कारण म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने बॉलिवूडचा गायक नकाश अजीज आणि प्रशांत नाकती पहिल्यांदा एकत्र आले आहेत. नकाश अजीजने हे गाणं गायले असून, मोस्ट पॉप्युलर, जिचा आवाज सतत कानावर पडत राहावा असं वाटतं, जिचे सूर थेट मनाला भिडतात अशी गायिका सोनाली सोनावणेने त्याला साथ दिली आहे.
Swara Bhasker : उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेचा सर्वांनी निषेध केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत एक ट्वीट केले होते. मात्र, या ट्वीटनंतर अभिनेत्री स्वरा भास्करला लोकांनी खूप ट्रोल केले. यानंतर आता अभिनेत्रीने आणखी एक ट्वीट करून अशा लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे.
अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट केले आणि लिहिले की, 'माझ्या टाईमलाईनवर उदयपूरच्या भयंकर आणि राक्षसी घटनेचा तीव्र निषेध करणारे ट्वीट पिन केले आहे. माझा द्वेष करणारे, चिंटू, भक्त, धर्मांध आणि इतर अशा घृणास्पद प्रजाती मला विचारत आहेत की, मी या घटनेवर काय ट्वीट केले आहे का? आधी जा आणि काय लिहीलेय ते वाचा.’ स्वरा भास्कर सुरुवातीपासूनच या प्रकरणावर आपले मत व्यक्त करत आहे. उदयपूरच्या घटनेवरून बराच गदारोळ झाला आहे. उदयपूर हत्याकांडामुळे सोशल मीडियावरही जनक्षोभ पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनीही आपला निषेध व्यक्त केला आहे.
Peter Brook: जगप्रसिद्ध ब्रिटिश थिएटर आणि चित्रपट दिग्दर्शक पीटर ब्रुक (Peter Brook) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. ब्रुक यांनी दोन वेळा मानाचा ‘टोनी पुरस्कार’ पटकावला होता. ते फ्रान्समध्ये स्थायिक झाले होते. पीटर ब्रुक यांचा जन्म 1925 मध्ये लंडनमध्ये झाला होता. ब्रुक यांचे वडील एका कंपनीचे संचालक आणि आई शास्त्रज्ञ होत्या. वयाच्या 16 व्या वर्षी शाळा सोडल्यानंतर त्यांनी फिल्म स्टुडिओमध्ये प्रवेश घेतला. ऑक्सफर्डमधून इंग्रजी आणि परदेशी भाषांमध्ये पदवी प्राप्त केली. अगदी महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी लंडनमध्ये असताना ‘डॉक्टर फास्टस’ हे नाटक दिग्दर्शित केले होते.
ब्रुकचे प्रकाशक निक हर्न बुक्स यांनी रविवारी एक निवेदन जारी करत ही दुःखद बातमी सगळ्यांना सांगितली. यात त्यांनी म्हतके की, ‘त्यांनी एक विलक्षण कला वारसा मागे सोडला आहे.’ फ्रेंच मीडिया रिपोर्टनुसार, ब्रुक यांचे शनिवारी पॅरिसमध्ये निधन झाले.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
अभिनेता किशोर दासचे निधन
आसाम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किशोर दासचे निधन झालं आहे. किशोर दासनं वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. चैन्नईमधील एका रुग्णालयात किशोर हा कॅन्सरवर उपचार घेत होता. काही दिवसांपूर्वी किशोरनं रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करुन किशोरनं त्याला जाणवत असलेल्या समस्यांबाबत सांगितलं होतं.
'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार संत कान्होपात्रा!
'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत संत कान्होपात्रा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार आहे.
'स्टेपनी' सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
'पावनखिंड', 'झिम्मा', 'कारखानीसांची वारी' नंतर आता 'स्टेपनी' या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 10 जुलैला दुपारी एक वाजता हा सिनेमा प्रेक्षकांना प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात विनोदाचा बादशहा भरत जाधव मुख्य भूमिकेत आहे.
राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर शंभरी
एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमाने रिलीजनंतर अनेक रेकॉर्ड केले आहेत. नुकतेच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 दिवस पूर्ण केले आहेत. या सिनेमाने फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली नसून संपूर्ण जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस 'आरआरआर' सिनेमा उतरत आहे.
धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. धनुषच्या 'कॅप्टन मिलर'चा टीझर आऊट झाला आहे. धनुषने टीझर शेअर करत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सध्या हा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -