Jalgaon Crime News : पाच वर्षांपूर्वीच्या केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या लोकांनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून ठार केल्याची धक्कादायक घटना जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरात घडली आहे. या घटनेत 7 जण गंभीर झाले असून आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले सून आता मयताच्या चुलत्याने बदल्याचा विडा उचलला आहे. 

Continues below advertisement


मयत तरुणाचे काका निळकंठ शिरसाठ म्हणाले की, मुलासोबत त्यांचे जुने वैर होते. त्यांच्या मुलीसोबत आमच्या मुलाने प्रेमविवाह केला होता. त्यांचे त्यामुळे सासरच्या लोकांसोबत त्याची दुश्मनी होती. ते त्याला मारण्यासाठी प्रयत्न करत होते. संधीची वाट ते बघत होते. कल रात्रीपासून ते संधी शोधत होते. त्यांनी जमाव जमवला होता, त्यांना माहीत होतं की, रविवार असल्याने मुलगा घरी असतो. यांच्यासोबत आपण काहीतरी करू. त्यामुळे त्यांनी असे काम केले. कोयते, रॉड आणि तलवारीने मारहाण करण्यात आली, विटा देखील फेकण्यात आल्या. 25 ते 30 जणांनी हल्ला केला. त्यांना वाटत असेल की, त्यांनी आमच्या पोराला मारले आहे. त्यांचे देखील आम्ही एक-दोन खल्लास करू, तरच आम्ही राहू, असे त्यांनी म्हटले आहे.


नेमकं काय घडलं? 


मुकेश शिरसाठ याने पाच वर्षांपूर्वी त्याच परिसरातील बनसोडे परिवारातील पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. तेव्हापासून शिरसाठ कुटुंबीय व आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते. रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला होता. त्यावेळी मुलीच्या माहेरीच्या मंडळींनी कोयता, चॉपरने मुकेशवर सपासप वार केले. या मारहाणीत मुकेश गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. 


तर मुकेशवर सासरचे मंडळी हल्ला करत असताना त्याला मयताचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सासरच्या मंडळींनी मुकेशला वाचवणाऱ्या लोकांवरही हल्ला केला. यात सात जण गंभीर जहामी झालेत. जखमींवर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी  रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरुणीचा भाऊ, काका यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंप्राळा हुडको परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


आणखी वाचा 


Akshay Shinde Encounter: मोठी बातमी : बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका!