मुंबई :  बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा  23 सप्टेंबर 2024 पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. मुंबई हायकोर्टात न्यायालयीन चौकशी समितीचा सादर करण्यात आला आहे. जे पाच पोलीस होते दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदे एकटा होता, त्यामुळं पाच पोलीस त्याच्यावर नियंत्रण का मिळवू शकले नाहीत, असा सवाल न्यायालयानं विचारला आहे. अक्षय शिंदे याच्या बोटांचे ठसे बंदुकीवर नाहीत, असे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पाच पोलिसांवर एफआयर दाखल केलं जाईल, असं सरकारच्या वतीनं एफआयआर दाखल केलं जाईल असं सांगण्यात आलं आहे.  न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या.डॉ. नीला गोखले यांनी यांनी न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल वाचून दाखवला. न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.


सुषमा अंधारे यांनी जेव्हा बदलापूरमध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला होता तेव्हा पत्रकार परिषद घेऊन प्रश्न उपस्थित केले होते, असं म्हटलं. ज्या प्रकारे अक्षय शिंदेला जेलबाहेर काढून त्याच्या प्रवासाचा मार्ग बदलण्यात आला होता. त्याला ज्या पद्धतीनं गोळ्या घातल्या होत्या हा प्रकार संशयास्पद  होता. हैदराबादच्या एन्काऊंटरचा संदर्भ देत अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक आहे, हे सांगितलं होतं.  सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरुन घालण्यासाठी स्पष्टपणे झालेला मर्डर आहे, असं त्यावेळी म्हटल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.


माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानते की या निमित्तानं त्यांनी सरकार आणि पोलीस यांचं संगनमत उघड झालं आहे. अक्षय शिंदे हा साधू संत नव्हता, समाजसुधारक नव्हता. त्याला तशीही फाशीची शिक्षा झाली असती. शिक्षा देण्यासाठी न्यायव्यवस्था आहे, न्यायालय आहे. सरकारनं हस्तक्षेप केला आहे तो वाईट आहे. आता जबाबदार असणाऱ्या असणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.


फेक एन्काऊंटर करण्याची गरज सरकार पक्षाला होती. निवडणुका तोंडावर होत्या, ज्या पद्धतीनं भाजप किंवा एकनाथ शिंदे यांच्या  मुख्यमंत्रिपदाच्या काळात सरकारकडून वारंवार अक्षम्य चुका होत होत्या. स्वत:चं ग्लोरिफिकेशन करण्यासाठी, उद्दातीकरण करण्यासाठी एका आरोपीचा जीव घेण्यापर्यंत यांची मजल गेली. फक्त आपली राजकीय जुळवण्यासाठी, स्वत:चं उद्दातीकरण करुन घेण्यासाठी  म्हणून आपण बघितलं असेल या सगळ्यानंतर ज्या पद्धतीची बॅनरबाजी केली गेली. लाडक्या बहिणींना न्याय दिला गेला, लाडक्या बहिणींचा देवाभाऊ वगैरे हे सगळं ग्लोरिफाय करण्यासाठी, आपली काळवंडत चाललेली प्रतिमा उजळ करण्यासाठी अक्षय शिंदेचा जीव घेतला गेला. स्वत:चा नाकर्तेपणा हे झाकण्यासाठी, महिलांना न्याय देऊ शकत नाही हा नाकर्तेपणा झाकण्यासाठी अगतिकतेनं आणि अतार्किकपणे उचलेलं पाऊल आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.  



इतर बातम्या : 


Akshay Shinde Encounter: मोठी बातमी : बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका!