Entertainment News Live Updates 29 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेन्ण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
कान्स चित्रपट महोत्सवात भारताच्या All That Breathes माहितीपटाला पुरस्कार
'कान्स चित्रपट महोत्सवा'ची (Cannes 2022) आज सांगता होणार आहे. 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवात भारतीय सिनेतारकांसह सिनेमांचादेखील दबदबा आहे. कान्स चित्रपट महोत्सवात आता दिग्दर्शक शौनक सेन (Shaunak Sen) यांच्या 'ऑल दॅट ब्रीथ्स' (All That Breathes) या माहितीपटाने गोल्डन आय अवॉर्ड (Golden Eye) पटकावला आहे.
'ऑल दॅट ब्रीथ्स' हा माहितीपट 'कान्स 2022'च्या आधी एचबीओ चॅनलवर दाखवण्यात आला होता. तेव्हा हा माहितीपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता कान्स चित्रपट महोत्सवात शॉर्ट फिल्म कॅटेगरीत या माहितीपटाला 'गोल्डन आय अवॉर्ड' मिळाला आहे. त्यामुळे या माहितीपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. गोल्डन आय ज्युरी सदस्य अॅग्निएस्का हॉलंड, इरिना त्सिल्क, पियरे डेलडोनचॅम्प्स आणि अॅलेक्स व्हिसेंट यांनी हा माहितीपट दिल्लीच्या प्रदूषणावर आधारित एक उत्कृष्ट माहितीपट असल्याचे म्हटले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला 'ऑल दॅट ब्रीथ्स' या माहितीपटाला फिलाडेल्फिया येथील वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सनडांस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणारा हा 90 मिनिटांचा एकमेव हिंदी माहितीपट आहे. दोन भावांवर भाष्य करणारा हा माहितीपट आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे. तसेच सहा भारतीय सिनेमांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. या सहा सिनेमांत मराठी सिनेमांचादेखील समावेश आहे. 'पोटरा’ (Potra), ‘कारखानीसांची वारी’ (Karkhanisanchi Wari) आणि ‘तिचं शहर होणं’ (Ticha Shahar Hona), ‘गोदावरी’ (Godavari) या मराठी सिनेमांना 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये मानाचं स्थान मिळालं आहे. यंदाचा महोत्सव खास आहे. सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा सिनेमादेखील 'कान्स फिल्म फेस्टिवल 2022' मध्ये दाखवला जाणार आहे.
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर कपिल शर्मा, शहनाज गिलसह सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि कॉंग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांना ओळखले जायचे.
आमिर खानचा 'मास्टरपीस' लाल सिंह चड्ढाचाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आमिर खान एका पंजाबी सरदारच्या भूमिकेत दिसत आहे. आमिरसोबत करीना कपूरदेखील (Kareena Kapoor) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात; असं करा तिकीट बुक
7 व्या 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'ला (Mumbai International Film Festival) आजपासून सुरुवात झाली आहे. 29 मे ते 5 जून दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची अनेक सिनेप्रेमींची इच्छा आहे. तर चाहत्यांना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना पाहायची संधी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळते. त्यामुळे प्रेक्षक या महोत्सवात जाण्याची उत्सुकतेने वाट पाहत असतात. सिनेप्रेक्षक http://miff.in या लिंकवरून तिकीट बुक करू शकतात. अथवा miffindia@gmail.com यावर संपर्क साधू शकतात.
पार्श्वगायक एदवा बशीर यांचे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन
मल्याळम संगीत जगताने दिग्गज पार्श्वगायक गमावले आहेत. पार्श्वगायक एदवा बशीर (Edava Basheer) यांचे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन झाले आहे. 28 मे 2022 रोजी वयाच्या 78 व्या वर्षी एदवा बशीर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे दिग्गजांसह चाहत्यांकडून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज
आमिर खानच्या (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी हा सिनेमा सज्ज झाला आहे. हा सिनेमा 'केजीएफ 2'चा रेकॉर्ड मोडू शकतो, असेही म्हटले जात आहे. 11 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिरचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा फ्लॉप झाला होता. त्यामुळे प्रेक्षक 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. बॉक्स ऑफिसवर 'लाल सिंह चड्ढा' यशस्वी होण्याची पाच कारणे आहेत.