Entertainment News Live Updates 28 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 28 Dec 2022 12:51 PM
Ziva Dhoni: Like Father, Like Daughter... धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; फोटो व्हायरल

Ziva Dhoniफिफा विश्वचषक 2022  (FIFA World Cup 2022) मध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. अर्जेंटिनाची (Argentina) टीम वर्ल्ड चॅम्पियन ठरली तर लियोनेल मेस्सी  (Lionel Messi) या खेळाडूनं या मॅचमध्ये केलेल्या कामगिरीनं अनेकांची मनं जिंकली. जगभरातील मेस्सीच्या चाहत्यांनी अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोष केला. भारतात देखील अनेक फुटबॉल प्रेमी अर्जेंटिनाच्या विजयानं खुश झाले. नुकताच क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी धोनीनं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. साक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये एमएस धोनी आणि साक्षीची मुलगी झिवानं (Ziva Dhoni) अर्जेंटिनाची जर्सी परिधान केलेली दिसत आहे. 



Abhijeet Bichukale : 'पठाण' मधील शाहरुखची हेअरस्टाईल माझ्यासारखी; अभिजीत बिचुकलेचा दावा

Abhijeet Bichukale : साताऱ्यात माध्यमांशी बोलताना अभिजीत बिचुकले म्हणाला,"मला असं वाटतं शाहरुख खान 'बिग बॉस' बघत होता. सलमान (Salman Khan) आणि मी एका इंडस्ट्रीमध्ये आहोत. इंडस्ट्री आणि राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो. शाहरुखचा 'पठाण' सिनेमातील लूक माझ्यासारखा आहे. ही एक सकारात्मक गोष्ट आहे". 

Sheezan Khan : शिझान खान आज न्यायालयात हजर होणार

Tunisha Sharma Death Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) चर्चेत आहे. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप शिझान खानवर लावण्यात आला होता. आता या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. शिझान खानला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. 





Tunisha Sharma Death : "100 टक्के लव्ह जिहाद"; तुनिषाच्या काकांचा मोठा दावा

Tunisha Sharma Death Case : 'अली बाबा-दास्तान ए काबुल' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचणारी अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तिचे काका पवन शर्मा यांनी एक मोठा दावा केला आहे. 

Siddharth: 'त्यांनी माझ्या वृद्ध पालकांना... '; विमानतळावरील सुरक्षा कर्मचार्‍यांवर अभिनेता सिद्धार्थनं केला आरोप

Siddharth: 'रंग दे बसंती' (Rang De Basanti) या चित्रपटातील अभिनयामुळे अभिनेता सिद्धार्थला (Siddharth) विशेष लोकप्रियता मिळाली. सिद्धार्थ हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील त्याची मत मांडतो.  त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो अनेकदा चर्चेत असतो. नुकताच सिद्धार्थनं विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन सिद्धार्थनं सुरक्षा कर्मचार्‍यांवर त्याच्या पालकांना त्रास दिल्याचा आरोप केला.  


 


Rashmika Mandanna: चाहत्यावर भडकली रश्मिका; रस्त्यात गाडी थांबवून घेतली शाळा, व्हिडीओ व्हायरल

Rashmika Mandanna: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. रश्मिका ही सध्या तिच्या  Vairsu या तमिळ चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं ऑडिओ लाँच करण्यासाठी रश्मिका चैन्नईमधील एका कार्यक्रमामध्ये गेली होती. यावेळी रश्मिका तिच्या चाहत्यावर भडकली.   हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्यामुळे रश्मिकानं चाहत्याला फटकारले.



Leena Nagwanshi Death : तुनिषानंतर छत्तीगडमधील 22 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सरने संपवलं आयुष्य

Leena Nagwanshi Death : सेलिब्रिटींच्या आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतचं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं. अशातच आता छत्तीसगडमधील सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर (Social Media Influencer) लीना नागवंशीने (Leena Nagwanshi) आत्महत्या केली आहे. 





Tunisha Sharma Death : तुनिषा शर्माच्या आयुष्यातला शेवटचा क्षण; रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज एबीपी न्यूजच्या हाती

Tunisha Sharma Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. आता तिच्या आत्महत्येनंतरचा एक व्हिडीओ एबीपी न्यूजच्या हाती लागला आहे. या व्हिडीओमध्ये शिझान तिला रुग्णालयात घेऊन जाताना दिसत आहे. 





Lathi Charge On Salman Khan Fans : सलमानची एक झलक पाहण्यासाठी घराबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; पोलिसांकडून लाठी चार्ज

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salamn Khan) नुकताच 57 वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवशी सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर खूप गर्दी केली होती. काही वेळातच ही गर्दी इतकी वाढली की ती गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. 



Year Ender 2022: कांतारा ते आरआरआर; 2022 मध्ये साऊथ चित्रपटांचा बोलबाला

Year Ender 2022: 2022 हे वर्ष बॉलिवूडबरोबरच साऊथ चित्रपटसृष्टीसाठी देखील खास वर्ष होते. या वर्षी अनेक साऊथ चित्रपट हिट ठरले तर काही कलाकारांचा गौरव देखील करण्यात आला. जाणून घेऊयात 2022 मध्ये रिलीज झालेले साऊथचे चित्रपट...


Year Ender 2022: कांतारा ते आरआरआर; 2022 मध्ये साऊथ चित्रपटांचा बोलबाला

Lalit Prabhakar : त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री..!; ललित प्रभाकर प्रथमच दिसणार टेरर अंदाजात

Lalit Prabhakar Tarri : अभिनेता ललित प्रभाकरचा (Lalit Prabhakar) 'टर्री' (Tarri) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री... त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय...टर्री", असा जबरदस्त स्वॅग या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Tunisha Sharma: तुनिषा शर्माच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार


(Tunisha Sharma) पार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यात आले.. तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी जगाचा निरोप घेतला.  मीरा रोड  येथील गोडदेव स्मशानभूमीमध्ये तुनिषाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता विशाल जेठवा, अभिनेत्री रोशनी वालिया, अभिनेत्री स्वीटी वालिया तसेच काही सेलिब्रिटी तुनिषा शर्माच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते.


Gandhi Godse Ek Yudh : 'गांधी-गोडसे एक युद्ध' सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट


Gandhi Godse Ek Yudh Chinmay Mandlekar : 'गांधी-गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाची घोषणा झाल्यानंतर या सिनेमात नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका नक्की कोण साकरणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. या सिनेमात मराठमोळा अभिनेता चिन्यम मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे. 


Sheezan Khan : पोलिसांसमोरच शिझानला कोसळलं रडू, गर्लफ्रेंड तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी सलग तीन दिवसांपासून कसून चौकशी


Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खान (Sheezan Khan) सध्या चर्चेत आहे. आता पोलीस चौकशी दरम्यान शिझानला रडू कोसळलं आहे. चौकशीदरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर शिझान रडू लागला. अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझानची सध्या चौकशी सुरू आहे. तुनिषाला आत्महत्या करण्यासाठी शिझाननेच प्रवृत्त केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्याला रडू कोसळलं आहे. 


'वादळवाट' फेम ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड


Raja Bapat Passed Away : ज्येष्ठ अभिनेते राजा बापट (Raja Bapat) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांत आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.