(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Entertainment News Live Updates 28 April : 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा टीझर रिलीज
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Fatafati : अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीचं अनोखं पाऊल; बॉडी पॉझिटिव्हीटी दाखवण्यासाठी केलं खास शूट!
Fatafati : अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती (Ritabhari Chakraborty) तिच्या आगामी 'फटाफटी' या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे इंडस्ट्रीत चर्चेत आहे आणि तिने ही व्यक्तिरेखा साकारण्यात कसलीही कसर सोडली नाही. रिताभरी चक्रवर्तीने नुकतेच सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर्ससोबत एक खास शूट केले आहे. ज्यात ती सर्व प्रकारचे शरीर हे सुंदर आहेत, त्यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही, असा संदेश देते. हे एक बिनधास्त आणि अनफिल्टर शूट केले आहे, यातील सर्व महिलांना स्वत:वर आणि स्वत:च्या व्यक्तिमत्तावर असलेला अभिमान दिसून येतो.
Jiah Khan Suicide Case Sooraj Pancholi: सूरज पांचोलीचे काय होणार? अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआय कोर्ट सुनावणार निकाल
Jiah Khan Suicide Case Sooraj Pancholi: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिने 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. जिया खानच्या आत्महत्येनंतर जिया खानच्या (Jiah khan) आईनं अभिनेता सूरज पांचोलीवर (Sooraj Pancholi) गंभीर आरोप केले होते. या प्रकरणावर आता उद्या (28 एप्रिल) स्पेशल सीबीआय कोर्ट हे अंतिम निकाल देणार आहे. जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोली काही काळ तुरुंगात होता. त्यानंतर त्याची सुटका झाली. आता या 10 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणातून सूरज पांचोलीची सुटका होईल की, त्याच्या अडचणीत वाढ होईल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे.
जिया खान आत्महत्या प्रकरणासंदर्भात नुकत्याच झालेल्या सुनावणीत स्पेशल सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर न्यायमूर्ती सय्यद यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. ते उद्या (28 एप्रिल) निर्णय देतील.
Raj Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचं काम कधी सुरु होणार? अमोल कोल्हेंचा प्रश्न; राज ठाकरेंच्या उत्तरानं वेधलं लक्ष
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईमध्ये पार पडलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या निर्मितीबाबत सांगितलं. लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर या पुरस्कार सोहळ्यात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला की, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या चित्रपटाची निर्मीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी, अशी तुमची इच्छा आहे, त्या चित्रपटाचं दिग्दर्शन करावं, अशीही तुमची इच्छा आहे. या चित्रपटाचं काम कधी सुरु होणार?' अमोल कोल्हे यांच्या या प्रश्नाला राज ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा टीझर रिलीज; रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुचित्रा बांदेकर प्रमुख भूमिकेत
Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.
पाहा टीझर
Sooraj pancholi: 'मी एवढ्या लहान वयात जे अनुभवले ते...'; जिया खान मृत्यू प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीनं व्यक्त केल्या भावना
काय म्हणाला सूरज?
सूरज भावना व्यक्त करत म्हणाला, 'हा निकाल 10 वर्षानंतर लागला. हा काळ वेदनादायक होता. अनेक रात्री मला झोप लागली नाही. आज मी केवळ माझ्याविरुद्धचा हा खटला जिंकला नाही तर माझा सन्मान आणि आत्मविश्वासही परत मिळवला आहे. अशा घृणास्पद आरोपांसह जगाला सामोरे जाण्यासाठी खूप धैर्य हवे होते. मी एवढ्या लहान वयात जे अनुभवले ते अनुभवायची वेळ कोणावरही येऊ नये, अशी देवाकडे मी प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातील ही 10 वर्षे मला कोण परत देईल हे मला माहीत नाही, पण मला आनंद वाटत आहे की, शेवटी हा निकाल लागला आहे. बरं झालं या गोष्टीचा शेवट झाला आहे, हे फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या कुटुंबासाठी देखील महत्वाचे होते. या जगात शांततेपेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही.'
Khupte Tithe Gupte : आता खुपणार नाही तर टोचणार! पुन्हा सुरू होतंय 'खुपते तिथे गुप्ते'
Khupte Tithe Gupte Show : छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या कार्यक्रमांनी बाजी मारली आहे. असाच एक कार्यक्रम म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte). आता या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
Khupte Tithe Gupte : आता खुपणार नाही तर टोचणार! पुन्हा सुरू होतंय 'खुपते तिथे गुप्ते'
Khupte Tithe Gupte Show : छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या कार्यक्रमांनी बाजी मारली आहे. असाच एक कार्यक्रम म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte). आता या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
Jiah Khan : अभिनेत्री जिया खानप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीला मोठा दिलासा
Jiah Khan : जिया खान मृत्यू प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष सुटका झाली आहे. तब्बल 10 वर्षांनंतर अभिनेत्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.