Entertainment News Live Updates 26 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 26 May 2023 03:37 PM
Aryan Khan : आर्यन खानच्या 'Stardom'चा हिरो निश्चित! 800 ऑडिशन्सनंतर 'या' अभिनेत्याची निवड

Aryan Khan Debut Web Series Stardom Update : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या त्याच्या 'स्टारडम' (Stardom) या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये शाहरुख खान आणि रणवीर सिंहची झलक पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार या सीरिजमधील हिरोच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. आर्यनच्या 'स्टारडम' या सीरिजमध्ये अभिनेता लक्ष्य लालवानी (Lakshya Lalwani) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Chala Hawa Yeu Dya: थुकरटवाडीत मनोज वाजपेयीची एन्ट्री; 'चला हवा येऊ द्या' चा प्रोमो व्हायरल

Chala Hawa Yeu Dya 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात.  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मनोज वायपेयीनं (Manoj Bajpayee)  'चला हवा येऊ द्या'  या शोमध्ये हजेरी लावली आहे. नुकताच  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मनोज हा  'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमातील कलाकारांची कॉमेडी पाहून खळखळून हसताना दिसत आहे. 



Riteish Deshmukh Genelia Deshmukh : "आता यापुढे आपलं काहीही होऊ शकत नाही"; विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेश-जिनिलीयाची खास पोस्ट

Riteish Deshmukh Genelia Deshmukh On Vilasroa Deashmukh Birth Anniversary : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasroa Deshmukh) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलीया देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे.


वाचा सविस्तर

City Of Dreams 3 : राजकारणातील डावपेच, कोण जिंकणार? 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

City Of Dreams 3 : 'सिटी ऑफ ड्रीम्स' (City Of Dreams 3) या बहुचर्चित  वेबसीरिजचा तिसरा सीझन आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तिसऱ्या सीझनची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सीरिजची प्रतीक्षा करत आहेत. ही सीरिज महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. 


City Of Dreams 3 : राजकारणातील डावपेच, कोण जिंकणार? 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला!

Kon Honar Crorepati : मनासारखं जगायचं असेल तर, आता मागे नाही राहायचं! दोन दिवसात सुरू होतोय दोन कोटींचा खेळ

Kon Honar Crorepati : ज्ञान हे माणसाकडे असलेलं एक उत्तम साधन आहे. त्याच्याकडच्या या साधनाचा वापर करून तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याच ज्ञानाचा वापर करून पैसे मिळवण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati). 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व 29 मेपासून सुरू होत आहे. 



Gori Nagori : 'बिग बॉस 16'फेम अभिनेत्रीला मारहाण

Gori Nagori Attack : राजस्थानमधील लोकप्रिय नृत्यांगणा आणि 'बिग बॉस' फेम (Bigg Boss 16) अभिनेत्री गोरी नागोरी (Gori Nagori) सध्या मारहाणी प्रकरणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. 


वाचा सविस्तर

Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंटबाजी करताना रोहित रॉय जखमी

Rohit Roy Injured Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला दक्षिण आफ्रिकेत सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू होताच स्टंटबाजी करताना अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) जखमी झाला आहे. त्यामुळे तो आता मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 



Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंटबाजी करताना रोहित रॉय जखमी

Rohit Roy Injured Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला दक्षिण आफ्रिकेत सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू होताच स्टंटबाजी करताना अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) जखमी झाला आहे. त्यामुळे तो आता मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 





Ankita Lokhande : 'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे होणार आई?

Ankita Lokhande Pregnant : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर ती वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचा मोठा चाहतावर्गही आहे. दरम्यान अंकिताने सोशल मीडियावर (Social Media) तिचे साडीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरुन आता अंकिता प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 



IIFA Awards 2023 : 'आयफा 2023'ला आजपासून सुरुवात

IIFA Awards 2023 : 'आंतरराष्ट्रीय इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' सोहळ्याला (International Indian Film Awards) आजपासून सुरुवात होणार आहे. 2000 साली सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याची क्रेझ बॉलिवूडकरांमध्ये आजही कायम आहे. यंदाच्या 23 व्या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Cannes Film Festival : कौतुकास्पद! अनुराग कश्यपच्या 'कॅनेडी'ला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालं 'स्टँडिंग ओव्हेशन'


Cannes Film Festival : जगभरातील सिनेप्रेमींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' ची सुरुवात  (Cannes Film Festival 2023) 16 मे पासून  झाली आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी वॉक केला. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) 'कॅनेडी (Kennedy)' चित्रपटाचा प्रीमियर पार पडला आहे. अनुरागच्या या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये  'स्टँडिंग ओव्हेशन'  मिळालं आहे. ही भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.


Ashish Vidyarthi Wedding: अभिनेते आशीष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा केलं लग्न


Ashish Vidyarthi Wedding: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आशीष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. त्यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) यांच्यासोबत आज (25 मे)  रज‍िस्‍टर्ड मॅरेज केलं आहे. आशीष आणि रुपाली यांनी लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे देखील आयोजन केलं आहे.


Maharashtrachi Hasyajatra: समीर चौघुले आणि कोहली फॅमिलीची धमाल कॉमेडी; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचा प्रोमो पाहून खळखळून हसाल


Maharashtrachi Hasyajatra: शिवाली आवली कोहली,बिवाली आवली कोहली,पावली आवली कोहली,आवली लवली कोहली या कोहली फॅमिलीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या कोहली फॅमिलीच्या डायलॉग्सचे रील्स अनेक नेटकरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता ही कोहली फॅमिली पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. नुकताच   'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये कोहली फॅमिली आणि समीर चौघुले (Samir Choughule) यांची धम्माल कॉमेडी बघायला मिळत आहे. 


प्रोमोमध्ये दिसत आहे की, कोहली फॅमिली ही घे भरारी या कार्यक्रमात आली आहे. या कार्यक्रमात समीर त्यांचे स्वागत करतो. त्यानंतर समीर हा शिवाली  कोहलीला विचारतो, 'तुला काय व्हायचंय आहे?' यावर शिवाली म्हणते, 'मला व्हायचंय आवली' तर आवली कोहली म्हणतो, 'मी माझ्यासारखी मिशी तुला लावली.' हा डायलॉग ऐकून सर्वजण हसायला लागतात. या प्रोमोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत अभिनेता भरत जाधव दिसत आहे. हा प्रोमो समीर चौघुलेनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.