Aryan Khan : किंग खानचा मुलगा अभिनेता नव्हे तर दिग्दर्शक म्हणून करणार मनोरंजनसृष्टीत पदार्पण; जाणून घ्या आर्यनच्या आगामी प्रोजेक्टबद्दल
Aryan Khan : शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
Aryan Khan Directorial Debut : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) लेक आर्यन खान (Aryan Khan) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. आर्यन नुकताच एका जाहिरातीत दिसून आला होता. शाहरुखसोबतच त्याने जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवलं. गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान एका सिनेमाच्या दिग्दर्शनामुळे चर्चेत आहे. पण आता आर्यन खानच्या पदार्पणाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
आर्यन खानचं दिग्दर्शनात पदार्पण (Aryan Khan Directorial Debut)
आर्यन खानने डिसेंबर 2022 मध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असल्याची घोषणा केली होती. संहितेचा फोटो शेअर करत त्याने लिहिलं होतं,"अॅक्शन बोलण्यासाठी मी सज्ज आहे. आणखी प्रतीक्षा करू शकत नाही". आता आर्यनने त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे चाहतेदेखील या सिनेमाची प्रतीक्षा करत आहे". आर्यनच्या या पोस्टवर 'सीरिजला अजून वेळ आहे मित्रा', अशी कमेंट लेखक बिलाल सिद्दीकी यांनी केली आहे.
View this post on Instagram
आर्यन खानच्या पहिल्या-वहिल्या सीरिजचं नाव काय?
आर्यन खानची पहिली सीरिज सहा भागांची असणार आहे. 'स्टारडम' असं या वेबसीरिजचं नाव आहे. या सीरिजचं दिग्दर्शन करण्यासोबत आर्यनने बिलालला लेखनातदेखील मदत केली आहे. आर्यन खानच्या या सीरिजची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. ही सीरिज कधी प्रदर्शित होणार हे अद्याप समोर आलेलं नाही.
आर्यन खान नेटफ्लिक्सच्या आगामी वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. पुढच्या वर्षात ही वेब-सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. तर दुसरीकडे शाहरुखची लेक सुहाना जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. हा सिनेमादेखील नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
आर्यन खानबद्दल जाणून घ्या...
27 वर्षांच्या आर्यन खानने 'स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्स' या कॅलिफोर्नियातील एका महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. तसेच 2020 मध्ये त्याला बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, सिनेमॅटिक आर्ट्स आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शनची पदवी मिळाली आहे. आर्यन सिनेसृष्टीत येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होत्या. पण आता या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे.
संबंधित बातम्या