Entertainment News Live Updates 25 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

प्रियांका कुलकर्णी Last Updated: 25 May 2022 10:06 PM
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

 बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) 'हीरोपंती 2' (Heropanti 2) या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या सिनेमात तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि नवाजु्द्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) मुख्य भूमिकेत होते. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

'तू आणि मी, मी आणि तू' सिनेमाचे पोस्टर रुपाली चाकणकरांच्या हस्ते झाले रिलीज

बऱ्याच कवी-साहित्यिकांनी आपापल्या भाषांमध्ये प्रेमाच्या वेगवेगळ्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे प्रेम नेमकं असतं तरी कसं हे विचारलं तर ते कोणालाही ठामपणे सांगता येणं शक्य नाही. कारण प्रेम ही भावना आहे, ज्याचा प्रत्येकव्यक्तीला एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे हे सोप्प वाटणार प्रेम अजिबात नाही त्यात येणारी वादळे कधी दिशा भरकटवतील हे सांगणाऱ्या 'जैन फिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तू आणि मी, मी आणि तू' या मराठी सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

करण जोहर कोट्यवधींचा मालक

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करण जोहरने शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' या सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. करण सोशल मीडियावरदेखील चर्चेत असतो. धर्मा प्रॉडक्शनचा मालक असलेला करण जोहर त्याचे आयुष्य खूपच आलिशान पद्धतीने जगतो. तसेच तो करोडोंचा मालकदेखील आहे. 

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात

17 वा 'मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (Mumbai International Film Festival) येत्या 29 मे पासून सुरू होत आहे. हा महोत्सव 29 मे ते 5 जून दरम्यान पार पडणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक बिग बजेट हिंदी-मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. अशातच आता चित्रपट महोत्सवालादेखील सुरुवात झाली आहे. कान्स चित्रपट महोत्सवालादेखील सुरुवात झाली आहे. कान्स चित्रपट महोत्सव झाल्यानंतर लगेचच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. 

'केजीएफ'च्या चाहत्यांसाठी खुशखबर!

'केजीएफ' (KGF) सिनेमाचे दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 2018 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 14 एप्रिल 2022 ला या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचे दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 2025 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Zollywood : 'झॉलीवूड'चा ट्रेलर रिलीज

झाडीपट्टी नाटकाची धमाल दाखवणाऱ्या 'झॉलीवूड' (Zollywood) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कारप्राप्त 'झॉलीवूड' हा सिनेमा 3 जून रोजी प्रदर्शित होत आहे. पहिल्यांदाच झाडीपट्टी नाटकाचं खरंखुरं चित्रण या सिनेमात मांडण्यात आलं आहे. 

Mumbai International Film Festival : 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 29 मे पासून होणार सुरुवात

17 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 29 मे ते 4 जून 2022 या कालावधीत होणार आहे.

करण जोहरने वाढदिवशी चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

बॉलिवूडचा लोकप्रिय निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखक करण जोहर (Karan Johar) आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. करण जोहरने आज खास पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. करणचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान करणने वाढदिवशी त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. करणने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी सिनेमासंदर्भात माहिती दिली आहे. 

अखेर यश आजोबांना सांगणार नेहाच परीची आई असल्याचं सत्य

'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. अखेर यश आजोबांना नेहा परीची आई असल्याचं सत्य सांगणार आहे. 

अजिंक्य राऊतचं हॅक झालेलं इन्स्टाग्राम अकाऊंट मिळालं त्याला परत

'मन उडू उडू झालं' मालिकेतील इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊतचं हॅक झालेलं इन्स्टाग्राम अकाऊंट त्याला परत मिळाले आहे. अजिंक्यने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 

दिग्दर्शक हंसल मेहता 54 व्या वर्षी अडकले लग्नबंधनात

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) हे 54 व्या वर्षी लग्नबंधनात अडकले आहेत. हंसल मेहता यांनी त्यांच्या लाँग टाइम लिव्ह इन पार्टनरसोबत म्हणजेच सफीना हुसैन (Safeena Husain) यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. हंसल मेहता यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Priyanka Chopra : टेक्सास गोळीबार प्रकरण; प्रियांका चोप्रा शोक व्यक्त करत म्हणाली...

Priyanka Chopra : अमेरिकेमधील टेक्सास येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.  टेक्सासमधील शाळेत एका तरुणानं अंधाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली आहेत. या गोळीबारामुळे अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे.   सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल हल्लेखोर ठार झाला. या प्रकरणाबाबत आता अभिनेत्री प्रियांका चोप्रानं  (Priyanka Chopra) तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Bhool Bhulaiyaa : पाहा भूल भुलैय्या-2 चे पाच दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

भू भुलैय्या-2 या  चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती. तसेच दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 18.34 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 23.51 कोटींची कमाई केली.  सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी या चित्रपटानं 10.75 कोटींची कमाई केली. आता पाचव्या दिवशी या चित्रपटानं 9.56 कोटींची कमाई करुन  76.27 कोटींचा टप्पा गाठला आहे. आता हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये कधी सामील होईल? याची कार्तिकचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 

Anupam Kher : अमेरिकेत भेटलेल्या व्यक्तीला पाहून अनुपम खेर झाले थक्क; म्हणाले 'ही हेअर स्टाईल मी करेल'

Anupam Kher : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचा व्हिडीओ व्हायरल


पाहा व्हिडीओ





मीडियम स्पाइसी’चा ट्रेलर रिलीज

Disha Vakani Baby Boy : दिशा वकानी दुसऱ्यांदा झाली आई

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमधून विशेष लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) आता दुसऱ्यांदा आई झाली आहे. दिशा आणि तिचा मयूर पाडिया यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. दिशा यांच्या भावानं म्हणजेच मयूर वकानीनं  याबाबत माहिती दिली आहे. मयूर हे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये सुंदरलाल ही भूमिका साकरतो. त्यानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'मला आनंद होत आहे कारण मी पुन्हा मामा झालो आहे. 2017 मध्ये दिशानं मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता ती पुन्हा आई झाली आहे. मला खूप आनंद होत आहे.'

काजोलच्या भावासोबत लग्न करणार? पाहा काय म्हणाली सुमोना चक्रवर्ती

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन सुमोना चक्रवर्तीला (Sumona Chakravarti)  द कपिल शर्मा शोमुळे (The Kapil Sharma Show) विशेष लोकप्रियता मिळाली. आता सुमोना ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ती अभिनेता सम्राट मुखर्जीसोबत (Samrat Mukerji) लग्नगाठ बांधणार आहे, असंही म्हटलं जात आहे. सम्राट हा  काजोल (Kajol), तनीषा (तनीषा ) आणि अयान मुखर्जीचा (Ayan Mukerji) चुलत भाऊ आहे.


वाचा सविस्तर बातमी 

'रानबाजार' ला प्रेक्षकांची पसंती; नवा भाग 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

नुकतेच ‘रानबाजार’चे 3 भाग 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या तिन्ही भागांनी अक्षरशः खळबळ माजवली आहे. यातील तिसरा भाग अशा एका रंजक वळणावर येऊन थांबला आहे, जिथे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे, ती पुढील भागांची. मात्र प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक न ताणता 'रानबाजार'चे पुढील भाग येत्या शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी झळकणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असणाऱ्या या वेबसीरिजची भव्यता यापूर्वी क्वचितच वेबविश्वात अनुभवण्यास आली असेल. 

पार्श्वभूमी

Entertainment News Live Updates 25 May:  Man Udu Udu Zhala : कार्तिक सोडणार सानिकाची साथ



मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट आला आहे. मालिकेत सध्या दीपूचा गंभीर अपघात झाला आहे. हा अपघात सानिकामुळे झाला असल्याचे कार्तिक आता इंद्राला मालिकेच्या आगामी भागात सांगणार आहे. सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतला आहे. 


 शूटिंग दरम्यान समंथा आणि विजय देवरकोंडा यांच्यासोबत दुर्घटना



दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा (Samantha)  आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)  यांचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग हे काश्मिर येथे झाले आहे. या चित्रपटामधील एका सिनच्या शूटिंग दरम्यान एक घटना घडली. या घटनेमुळे समंथा आणि विजयला गंभीर दुखापत झाली. 


भूल भुलैय्या-2 ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद



अभिनेता  कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा भूल भुलैय्या-2  (Bhool Bhulaiyaa 2)  सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ चार दिवासांमध्ये या चित्रपटानं 60 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे.  लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल, असं म्हटलं जात आहे. 


केदार शिंदेंनी शेअर केला अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ


Ankush Choudhary : केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केलं आहे. आता केदार शिंदेंनी अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 


'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात अंकुश शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. केदार शिंदेंनी आता अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या भूमिकेसाठी अंकुश खूप मेहनत घेत आहे. अंकुश चौधरी शाहीर साबळेंची वेशभूषा कशा प्रकारे साकारत आहे, त्यासाठी तो कोणता मेकअप करतो या गोष्टी केदार शिंदेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.



 


 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.