Entertainment News Live Updates 24 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

प्रियांका कुलकर्णी Last Updated: 24 May 2022 08:06 PM
तीन हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे जावून 'मजनू' सिनेमाचा ट्रेलर लॉंच

मजनू' (Majnu) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. सिनेसृष्टीच्या इतिहासात प्रथमचं तीन हजार फुटाच्या उंचीवर हेलिकॉप्टरद्वारे जावून 'मजनू' सिनेमातील कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी 'मजनू' सिनेमाचा ट्रेलर लॉंच केला आहे.  

Dharmaveer : 'धर्मवीर' सिनेमाने दहा दिवसांत केली 18.03 कोटींची कमाई

Dharmaveer : महाराष्ट्रात सध्या 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' (Dharmaveer mukkam post thane) चित्रपटाचाच बोलबाला आहे. 13 मे रोजी हा सिनेमा  तब्बल चारशेहुन अधिक सिनेमागृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले आहेत. आता या सिनेमाने दहा दिवसांत 18.03 कोटींची कमाई केली आहे. 

'पंचायत'ची रिंकी खूपच साधीभोळी; खऱ्या आयुष्यात सान्विका मात्र बोल्ड

'पंचायत 2' (Panchayat 2) या वेबसीरिजचा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. पंचायतचा दुसरा सीझनदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या वेब सीरिजमधील सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या वेब सीरिजमध्ये सरपंचांची मुलगी रिंकी उर्फ सान्विकाच्या Sanvikaa अदांवर चाहते फिदा झाले आहेत. 

पॉपस्टार जस्टिन बिबरचा आगामी लाईव्ह शो दिल्लीत होणार

कॅनडाचा प्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बिबरच्या (Justin Bieber) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जस्टिन बिबरचा आगामी लाईव्ह शो आता भारतात होणार आहे. 18 ऑक्टोबरला जस्टिनचा लाईव्ह शो नवी दिल्लीत होणार आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडिअमध्ये हा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. जस्टिन बिबरच्या या लाईव्ह कॉन्सर्टची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Man Udu Udu Zhala : कार्तिक सोडणार सानिकाची साथ

मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट आला आहे. मालिकेत सध्या दीपूचा गंभीर अपघात झाला आहे. हा अपघात सानिकामुळे झाला असल्याचे कार्तिक आता इंद्राला मालिकेच्या आगामी भागात सांगणार आहे. सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतला आहे. 

'Thor: Love And Thunder'चा ट्रेलर रिलीज

'Thor: Love And Thunder' 'थॉर: लव्ह अॅंड थंडर' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 8 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

शूटिंग दरम्यान समंथा आणि विजय देवरकोंडा यांच्यासोबत दुर्घटना

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा (Samantha)  आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)  यांचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग हे काश्मिर येथे झाले आहे. या चित्रपटामधील एका सिनच्या शूटिंग दरम्यान एक घटना घडली. या घटनेमुळे समंथा आणि विजयला गंभीर दुखापत झाली. 


वाचा सविस्तर बातमी 

भूल भुलैय्या-2 ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद

अभिनेता  कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा भूल भुलैय्या-2  (Bhool Bhulaiyaa 2)  सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ चार दिवासांमध्ये या चित्रपटानं 60 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे.  लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल, असं म्हटलं जात आहे. 


वाचा सविस्तर बातमी

Cannes 2022 : हेडबँड्स रेड कार्पेटवर बॉलीवूड स्टार्ससह अधिकृतपणे जातात!

 Cannes 2022 : हेडबँड्स रेड-कार्पेट हॉट झाले आहेत कारण त्यावर दोन बॉलीवुड स्टार्सच्या मान्यतेचा शिक्का आहे! दीपिका पदुकोण आणि अदिती राव हैदरी या दोघींनी यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या पोशाखांसह हेडबँड घातले होते.

गाण्यानंतर आता करण जोहरवर स्क्रिप्ट चोरीचा आरोप

दिग्दर्शक  करण जोहरचा (Karan Johar) जुग जुग जियो (Jug jugg Jeeyo) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती देखील मिळाली. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. पाकिस्तानी गायक अबरार उल हक यांनी त्यांचं गाणं या चित्रपटामध्ये चोरी केल्याचा आरोप करण जोहरवर केला.  तर आता नुकताच एका स्क्रिप्ट रायटरनं देखील करणवर चित्रपटाची स्क्रिप्ट चोरी केल्याचा आरोप केला आहे. त्या लेखकाचा असा आरोप आहे की, त्यानं लिहिलेलं कथानक चोरी करुन करणनं या चित्रपटाची निर्मिती केली. 


वाचा सविस्तर बातमी

Rinku Rajguru New movie : रिंकू राजगुरूच्या नवीन चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे

झुंड नंतर रिंकू राजगुरूच्या नवीन चित्रपटाचा टीझर रिलीज झाला.

Bhool Bhulaiyaa 2 : 'एकला चलो रे'; विवेक अग्निहोत्रींनी केलं कार्तिकचं कौतुक, भूल भूलैय्या-2 साठी दिल्या शुभेच्छा

'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांनी देखील भूल भूलैय्या-2 चित्रपटाचे कौतुक केलं आहे. 

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेमध्ये 'दया बेन' परत येणार? पाहा काय म्हणाले निर्माते

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधील  दया बेन या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  एका मुलाखतीमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितलं, 'दयाबेनच्या भूमिकेत दिशा वकानीच परत येईल की नाही मला माहित नाही. पण दिशा बेन असो वा निशा बेन, तुम्हाला मालिकेमध्ये दयाबेन नक्की पहायला मिळेल. '

Sunny Deol : सनी देओलच्या हाती कोट्यवधींच्या गाडीचं स्टेअरिंग; नव्या गाडीची किंमत माहितीये?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. सनीला वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन करायला आवडते. नुकतीच त्यानं लँड रोवर डिफँडर 110 ही गाडी घेतली आहे. सनीने या 5-डोरच्या एसयूव्हीचे  V8 टॉप मॉडेल खरेदी केले आहे.  या गाडीची  किंमत 2.05 कोटी रुपये आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

शूटिंग दरम्यान समंथा आणि विजय देवरकोंडा यांच्यासोबत दुर्घटना

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा (Samantha)  आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)  यांचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग हे काश्मिर येथे झाले आहे. या चित्रपटामधील एका सिनच्या शूटिंग दरम्यान एक घटना घडली. या घटनेमुळे समंथा आणि विजयला गंभीर दुखापत झाली. 


वाचा सविस्तर बातमी 

पाकिस्तानी गायकाचा करण जोहरवर गाणं चोरल्याचा आरोप; टी-सीरिजचं सडेतोड उत्तर

दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) जुग जुग जियो (Jug Jug Jiyo) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्मीती करणच्या धर्मा प्रोडक्शन या कंपनीनं केली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ट्रेलरमध्ये नाच पंजाबन या गाण्याची झलक दिसत आहे. आता एका पाकिस्तानी गायकानं करण जोहरवर नाच पंजाबन हे गाणं चोरल्याचा आरोप केला आहे. या पाकिस्तानी गायकाचं नाव अबरार उल हक (Abrar-ul-Haq) असं आहे. या गायकानं केलेल्या आरोपावर टी सीरिज या कंपनीनं उत्तर दिलं आहे. 


वाचा सविस्तर बातमी

पार्श्वभूमी

सुमित राघवनने केलं योगी आदित्यनाथांचे कौतुक



अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghvan) नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडत असतो. एकीकडे त्याने मांडलेल्या मुद्द्यांचं कौतुकही होतं. तर दुसरीकडे त्याला ट्रोलही केलं जातं. पण असं असूनही तो नेहमी सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. नुकतेच सुमीत राघवनने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 


CHYD : 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येणार सेलिब्रिटी कपल



CHYD : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला  पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमध्ये अनेक कलाकारांची देखील लग्न झाली. तर काही कलाकारांचा साखरपुडादेखील झाला. या सगळ्यात चर्चेत होते ते म्हणजे विराजास कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे आणि प्रेक्षकांचा लाडका राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हे दोन्ही सेलेब्रिटी कपल या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर हजेरी लावणार आहेत. 


आनंद महिंद्रा यांचे ट्वीट चर्चेत; म्हणाले, 'रोहित शेट्टी, ही गाडी उडवायला तुम्हाला अणुबॉम्ब वापरावा लागेल'



भारतामधील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा(Anand Mahindra)हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अनेक वेळा नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सला ते रिप्लाय देतात. नुकतेच आनंद महिंद्रा यांनी एक ट्वीट केले आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.


केदार शिंदेंनी शेअर केला अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ


Ankush Choudhary : केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केलं आहे. आता केदार शिंदेंनी अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 


'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात अंकुश शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. केदार शिंदेंनी आता अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या भूमिकेसाठी अंकुश खूप मेहनत घेत आहे. अंकुश चौधरी शाहीर साबळेंची वेशभूषा कशा प्रकारे साकारत आहे, त्यासाठी तो कोणता मेकअप करतो या गोष्टी केदार शिंदेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.