Udayanraje : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात उदयनराजेंची फिल्मी स्टाईल एन्ट्री
Udayanraje : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात उदयनराजेंनी फिल्मी स्टाईल एन्ट्री केली आहे.
![Udayanraje : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात उदयनराजेंची फिल्मी स्टाईल एन्ट्री Udayanraje: Udayanraje film style entry in Chala Hawa Yeu Dya Udayanraje : 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात उदयनराजेंची फिल्मी स्टाईल एन्ट्री](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/23/ef3e00299a1f1062044c250f6890c401_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Udayanraje : भाजपचे खासदार उदयनराजे (Udayanraje) त्यांच्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध आहेत. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने निलेश साबळेच्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचे साताऱ्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उदयनराजेंनी फिल्मी स्टाईल एन्ट्री केली आहे.
उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात नागराज मंजुळेच्या आगामी झुंड सिनेमाच्या टीमने हजेरी लावली होती. कार्यक्रमात उदयनराजेंनी 'पुष्पा' सिनेमातील डायलॉगदेखील मारले. दरम्यान ते म्हणाले, मी झुकतो ते फक्त लोकांसाठीच. लोकांना जोडण्याचे काम मी केले आहे. 'पुष्पा' सिनेमातून मी हाच बोध घेतला आहे.
'चला हवा येऊ द्या'चा आगामी भाग खूपच खास असणार आहे. याआधी अनेकदा उदयनराजे शर्टाची कॉलर उडवत 'पुष्पा' सिनेमातील डायलॉग मारताना दिसून आले आहेत. पण 'चला हवा येऊ द्या'च्या कार्यक्रमात उदयनराजेंच्या फिल्मी स्टाईल एन्ट्रीमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली आहे.
सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'झुंड'ची टीम 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर
'झुंड' सिनेमाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात मेगास्टार अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. 'झुंड' सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक क्रिडा विषयक सिनेमा आहे. हा सिनेमा फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. सध्या 'झुंड' सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'झुंड' सिनेमाची टीम 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर आली होती.
संबंधित बातम्या
Udayanraje On Pushpa : उदयनराजेंची हटके स्टाईल, 'पुष्पा'चा डायलॉग मारत पुन्हा एकदा उडवली कॉलर
Gangubai Kathiawadi : गंगूबाई काठियावाडी सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
Mahesh Manjrekar : 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' सिनेमामुळे महेश मांजरेकरांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)