Entertainment News Live Updates 24 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Jun 2022 08:38 PM
Lucky Ali : 'आय लव्ह उद्धव...विषय संपला'...राजकीय घडामोडींवर लकी अली यांची पोस्ट चर्चेत

Lucky Ali : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच शिंदे आणि ठाकरे गटाबद्दल (Uddhav Thackeray) आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी गायक लकी अलीची (Lucky Ali) पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

'भूल भुलैया 2'च्या यशाने भूषण कुमार भारावला; कार्तिक आर्यनला दिली महागड्या कारची भेट

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असला तरी सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या यशाने निर्माता भूषण कुमार (Bhushan Kumar) भारवला आहे. त्याने कार्तिकला एक महागडी कार भेट दिली आहे. 

Sarsenapati Hambirrao : सरसेनापतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी पाचव्या आठवड्यातही उसळतेय गर्दी

'सरसेनापती हंबीरराव' (Sarsenapati Hambirrao) हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे. आता या सिनेमाने पाचव्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे.

27 जूनला डिस्कव्हरीवर होणार 'वुमन लाइक हर'चा प्रीमियर

'वुमन लाइक हर' या कार्यक्रमाचा प्रीमियर 27 जूनला डिस्कव्हरीवर होणार आहे. चार विविध क्षेत्रातील महिलांच्या प्रेरणादायी कथा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाची नव्याने ओळख प्रेक्षकांना होणार आहे. 

मन्नतमध्ये खोली भाड्याने घेऊ शकतो का? शाहरुखने दिला भन्नाट रिप्लाय

शाहरुखने चाहत्यांसाठी 'आस्क एसआरके' या सत्राचे आयोजन केलं होतं. या सत्रात चाहत्यांनी शाहरुखला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक प्रश्न विचारले. दरम्यान एका चाहत्याने शाहरुखला मन्नतमधील एका खोलीच्या भाड्याबद्दल विचारले. या प्रश्नाला उत्तर देत किंग खानने ट्वीट केलं आहे की;"30 वर्षांची मेहनत लागेल." शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला अनेकांसाठी एक पर्यटन स्थळ आहे.  'मन्नत' पाहण्यासाठी शाहरुखचे अनेक चाहते लांबून लांबून येत असतात. 

इब्राहिम अली खान नाही तर ‘हा’ अभिनेता आहे श्वेता तिवारीच्या लेकीचा बॉयफ्रेंड!

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘बिजली बिजली’ या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पलकचं हे गाणं सोशल मीडियावर खूप हीट झालं होतं. पण याशिवाय ती काही वेळा इब्राहिम अली खानसोबत स्पॉट झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चा झाल्या होत्या. पण आता मात्र पलकचं नाव इब्राहिम नाही तर दुसऱ्या एका अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे. हा अभिनेता लवकरच सुहाना खान आणि खुशी कपूर यांच्यासोबत ‘द आर्चीज’मध्ये दिसणार आहे.

Shamshera New poster : 'शमशेरा'चे नवे पोस्टर आऊट

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'शमशेरा' (Shamshera) सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. अशातच निर्मात्यांनी 'शमशेरा'चे नवे पोस्टरदेखील रिलीज केले आहे. 





“शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी…” हेमांगी कवीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा

“शिकारीला निघालेल्या लोकांची कधी कधी शिकार होते. नेहमीच पंजांनी नाही तर कधी कधी डोळ्यांनी होते. तेव्हा जपून…” असं हेमांगीने तिचा फोटो शेअर करत म्हटलं आहे. टायगर प्रिंट स्कर्ट, काळ्या रंगाचा टॉप हेमांगीने परिधान केला असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. तिचा हा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. “कसली जीवघेणी नजर तुझी, एकदम मस्त” असं एका युजरने म्हटलं आहे.





मिका सिंहच्या स्वयंवरमध्ये मराठी विनोदवीरांच्या मुलीचा सहभाग; ध्वनी पवार बाजी मारणार का?

मिका सिंहच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. मिका त्याच्या गाण्यांसोबत खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. स्टार भारत या चॅनलवर नुकताच मिकाचा 'स्वयंवर मीका दी वोटी' हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या स्वयंवरमध्ये 12 मुली सहभागी झाल्या आहेत. यात लोकप्रिय विनोदवीर विजय पवार यांच्या मुलीचा ध्वनी पवारचादेखील समावेश आहे. 

रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा ट्रेलर रिलीज होणार, यशराजच्या बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता!

Shamshera Official Trailer : दोन वर्षांपासून प्रदर्शित होण्याची वाट पाहणाऱ्या यशराज फिल्म्सच्या 'शमशेरा' (Shamshera) चित्रपटाचा ट्रेलर अखेर आज (24 जून) आठवड्यात प्रदर्शित होत आहे. कोरोना काळात पहिला लॉकडाऊन संपताच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. या चित्रपटात रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) उत्तर भारतातील एका बंडखोराची चोराची भूमिका केली आहे, जो गरीबांना मदत करण्यासाठी श्रीमंतांना लुटतो आणि ब्रिटिश सैन्याचा सामना करतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील या कथेत अभिनेत्री वाणी कपूरही (Vaani Kapoor) एका खास भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील कलाकारांचे लूक रिलीज झाले आहेत.


यशराज फिल्म्ससोबतच अभिनेता रणबीर कपूरसाठीही 'शमशेरा' चित्रपट विशेष खास आहे. 'संजू' चित्रपटाच्या रिलीजच्या चार वर्षानंतर रणबीर कपूर पुढील महिन्यात मोठ्या पडद्यावर परतणार असून, त्याचे चाहते या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. रणबीर कपूरचा आणखी एक 'ब्रह्मास्त्र' चित्रपटही सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.


 

Swayamvar: Mika Di Vohti : मिकाच्या स्वयंवरात दिव्यांकाची हजेरी

Swayamvar: Mika Di Vohti : प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh)  गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. 19 जूनपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये दिव्यांकानं हजेरी लावली. 


वाचा सविस्तर 

बर्थडे सेलिब्रेशनची जोरदार तयारी, मलायका बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसह परदेशी रवाना!

Malaika Arora, Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. पूर्वी दोघेही एकमेकांबद्दल बोलणे टाळायचे. मात्र, आता दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. बॉलिवूडची ही प्रसिद्ध जोडी चाहत्यांना कपाळ गोल्स देत असते. आता पुन्हा एकदा मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कामातून वेळ मिळताच सुट्टीवर गेले आहेत. दोघेही रात्री उशिरा मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


दोन दिवसांनी म्हणजेच 26 जूनला अर्जुन कपूर त्याचा 37वा वाढदिवस साजरा करणार आहे. बर्थडे सेलिब्रेशनसाठी तो मलायका अरोरासोबत बाहेर गेला आहे. अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला असून, मलायका आपला बर्थडे वीकेंड जवळ आल्याची आठवण वारंवार करून देण्यास विसरत नसल्याचे म्हटले आहे. अर्जुन कपूरने मलायका अरोराकडून मिळालेल्या भेटवस्तूंची एक झलक त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.


वाचा संपूर्ण बातमी

'ओपनिंग-डे' ला भूल भुलैया-2 ला मागे टाकणार 'जुग जुग जियो'?

Jug Jugg Jeeyo Box Office Collection :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा  जुग जुग जियो (Jug Jugg Jeeyo) हा चित्रपट आज (24 जून) प्रदर्शित झाला आहे. अनेक लोक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात होते. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


वाचा सविस्तर बातमी

सुष्मिता सेनच्या भावाचा घटस्फोट? राजीव आणि चारु होणार विभक्त, चर्चांना उधाण

Charu Asopa- Rajeev Sen Separation : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  सुष्मिता सेनचा (Sushmita Sen) भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारु असोपा (Charu Asopa) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरु आहेत, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, दोघांनी आता विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून ते कायदेशीर मार्गानं वेगळे होणार आहेत. 


वाचा सविस्तर बातमी 

सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 तमिळ चित्रपटांच्या यादीत 'विक्रम'चं नाव सामील

Vikram : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कमल हसनचा (Kamal Hassan)  'विक्रम' (Vikram)  हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 390.50 कोटींची कमाई केली. हा चित्रपट लवकरच  400 कोटींचा टप्पा पार करणार आहे, असं म्हटलं जात आहे. विक्रम या चित्रपटचं नाव जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 तमिळ चित्रपटांच्या यादीत सामील झालं आहे.


वाचा सविस्तर बातमी 

सिद्धू मूसेवालांचे ‘SYL’ गाणे रिलीज, काही वेळातच मिळाले मिलिअन व्ह्यूज!

Sidhu Moose Wala Song: दिवंगत गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचे 'SYL' गाणे रिलीज झाले आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येनंतर तब्बल 26 दिवसांनी त्यांचे नवीन गाणे रिलीज झाले आहे, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सिद्धू मूसेवाला यांचे SYL हे गाणे सध्या यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. सोशल मीडिया युझर्स हे गाणे मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. गाणे ऐकून कॉमेंट सेक्शनमध्ये दिवंगत गायकाची आठवण काढत आहेत. ‘SYL’मध्ये सिद्धू यांनी सतलज-यमुना लिंक (SYL) कालव्याचा उल्लेख केला आहे


सिद्धू मूसेवालांचे हे गाणे 4 मिनिटे 9 सेकंदाचे आहे, जे चाहत्यांना खूप आवडत आहे. या गाण्यात पंजाबचे पाणी आणि त्याच्याशी संबंधित इतर समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यासोबत पंजाब-हरियाणा यांच्यातील बहुचर्चित सतलज-यमुना लिंक (SYL) कालव्याच्या वादाचा उल्लेख करून, तो सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाण्याच्या सुरूवातीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे हरियाणाचे प्रभारी सुशील गुप्ता यांचे विधान ऐकू येते. ज्यामध्ये ते पंजाबप्रमाणे हरियाणात 2024 मध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार बनल्यास एसवायएलचे पाणी हरियाणाला मिळण्याबाबत बोलत आहेत. याशिवाय पंजाब आणि पंजाबींचा अभिमानही गाण्यात दाखवण्यात आला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

वयाच्या 11व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण, आता छोटा पडदा गाजवतेय अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती!

Sumona Chakravarti Birthday : 'द कपिल शर्मा शो'मध्ये ‘भुरी’ची भूमिका करणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) आज (24 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहे. सुमोनाने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'द कपिल शर्मा शो'मध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती आज 34 वर्षांची झाली आहे. सुमोना गेल्या अनेक वर्षांपासून कपिलच्या शोचा एक भाग आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यापूर्वी आपण सुमोनाला अनेक रिअॅलिटी शोमध्ये पाहिले आहे.


1999मध्ये आलेल्या आमिर खान आणि मनीषा कोईराला स्टारर 'मन' या चित्रपटातून सुमोना चक्रवर्तीने अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात सुमोनाने नेहा नावाच्या शालेय विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. मात्र यानंतर ती मालिकांकडे वळली. तिने अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका केल्या. पण तिला खरी ओळख ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेमुळे मिळाली.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


एनसीबीने रिया चक्रवर्तीविरुद्ध न्यायालयात दाखल केले आरोपपत्र, शौविक चक्रवर्तीचे नावही सामील


Rhea Chakraborty : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा ड्रग्जच्या अँगलने तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुख्य आरोपी म्हणून रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), तिचा भाऊ शौविक (Showik) आणि आणखी काही लोकांना मुख्य आरोपी बनवले आहे. आता या प्रकरणात एनसीबीने रिया, शौविक आणि इतर आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. यावेळी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती देखील न्यायालयीन कामासाठी तिथे उपस्थित होते. NCB ने रिया, शौविकसह आणखी काही लोकांवर सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोप केला आहे.


विशेष सरकारी वकील अतुल सरपांडे यांनी सांगितले की, आरोपपत्रात सर्व आरोपींचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोपपत्राचा मसुदा दाखल करताना त्यांनी सांगितले की, रिया चक्रवर्ती आणि शौविक यांनी ड्रग्जचा वापर केला होता आणि त्यांनी सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केले होते.


विशेष सरकारी वकील म्हणाले की, न्यायालय सर्व आरोपींवर आरोप निश्चित करणार आहे. सुनावणीदरम्यान रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती कोर्टात हजर होते. ते म्हणाले की, दोषमुक्तीच्या याचिकांवर निर्णय झाल्यानंतरच आरोप निश्चित केले जातील, असे न्यायालयाने म्हटले आहे. बुधवारी रिया आणि शौविकसह अन्य आरोपी न्यायालयात हजर झाले होते. विशेष न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जुलै रोजी होणार आहे.


सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती जवळपास महिनाभर तुरुंगात होती, त्यानंतर तिला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता. सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. परंतु, अद्यापपर्यंत एजन्सी कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. रिया व्यतिरिक्त, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर अनेकांवर देखील अंमली पदार्थांचे सेवन, साठा आणि पैसे पुरवल्याबद्दल या प्रकरणात आरोप लावण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतांश आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.