श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?

पंढरीचा पांडुरंग हा गरीब शेतकऱ्यांचा देव आहे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. लाडक्या पांडुरंगाला पाहून मनातून काही अर्पण करतात. रोख रक्कमेसह मौल्यवादन दागिनेही अर्पण केले जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पंढरीच्या पांडुरंला यापूर्वीही अनेकदा सोनं, चांदीच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंचं दान अर्पण करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वीच मंदिराला चांदीचा दरवाजा बसवण्यात आला आहे. भाविकांकडून ही सेवा सातत्याने दिली जाते.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस आज भाविकांकडून सोन्याचा चार पदरी हार पदकासह, ठुशी व चेन असे 6 लाख 50 हजार किंमतीचे दागिने व 2 लक्ष रूपयाची देणगी देण्यात आली आहे.
ठाणे येथील भाविक राकेश परशुराम दलाल व रुपेश परशुराम दलाल यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ सोन्याचा चार पदरी हार पदकासह व ठुशी असे सुमारे 73.950 ग्रॅम वजनाचे दागिने अर्पण केलेले आहेत. त्याची अंदाजे किंमत 5 लाख 82 हजार आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील विठ्ठल भक्त संकेत भास्कर पंडित या भाविकानेही आजच 9.800 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन अर्पण केली असून, त्याची 77 हजार इतकी किंमत होत आहे.
याशिवाय चेन्नई येथील विठ्ठल भक्त पी एस कुमारगुरूतम, यांनी दोन लाख रुपयाची देणगी विठ्ठल चरणी अर्पण केली आहे. मंदिर समितीच्या वतीने या सर्व विठ्ठल भक्तांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, पंढरीचा पांडुरंग हा, देव भक्तीचा भुकेला, भक्ताघरी धाऊनी आला.. असा आहे. आषाढी, कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात.