पुणे : शहरातील येरवाडा परिसरात भररस्त्यात आपली अलिशान कार (car) थांबवून दारूच्या नशेत लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे, उद्याच गौरव आहुजा तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. येरवडा लघुशंका प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या गौरव आहुजाला पुणे सत्र न्यायालयाकडून अटी व शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला.  7 मार्च रोजी गौरव आहुजाने भररस्त्यात लघुशंका करण्याचे कृत्य केले होते. पुण्यात वाघोली परिसरामध्ये बीएमडब्ल्यू कारने जात असताना,एका तरुणाने येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली, त्यानंतर रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याचा व्हिडीओ शनिवार 9 मार्च रोजी व्हायरल झाला होता. त्यानंतर, सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली होती. आता, 17 दिवसांनी त्याला न्यायालयाकडून (Court) जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

Continues below advertisement


पुण्यातील येरवडा परिसरात काही दिवसापूर्वी गौरव अहुजाने भर रस्त्यावर मद्यप्राशन करत लघुशंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर, पुण्यासह सर्वच ठिकाणाहून गौरव आहुजाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला. तसेच, याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुमोटो दखल घेत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर, याप्रकरणी दोन आरोपींना येरवडा पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्याच प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव आहुजाला आज जामीन मंजूर झाल्याने आता तो तुरुंगातून बाहेर येणार आहे. 


पुण्यातील लघुशंका प्रकरणी गौरव मनोज आहुजा (25, रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा) व त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (25, रा. मार्केट यार्ड)  यांच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ओसवाल याला शनिवारी रात्री अटक केली. दरम्यान गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर, त्याला न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली. दरम्यान गौरव मनोज आहुजा याने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागत मी आठ तासात पोलिसांसमोर हजर होईन असं म्हटलं होतं.  


पोलिसांकडून पंचतारांकीत हॉटेलचे सीसीटीव्ही जप्त


पुणे पोलिसांनी शहराती पंचतारांकीत हॉटेलमधील एका पबमधील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले. घटनेच्या आधी गौरव आहुजा ज्या पबमध्ये गेला होता, त्या ठिकाणचे फुटेज पोलिसांनी जप्त केले होते. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील मुंढवा रोडवर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गौरव आहुजा होता, त्याच्यासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल देखील होता. गौरव हा त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याच्यासोबत त्या पबमध्ये गेले असल्याची माहिती पोलिसांच्या समोर आली होती.


हेही वाचा


श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?