Entertainment News Live Updates 23 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Akshay Kumar : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा उत्तराखंडमध्ये केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी पोहोचला. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो आपल्या सुरक्षेसह केदारनाथ मंदिरात प्रवेश करताना दिसत आहे. त्याच्याभोवती चाहत्यांची गर्दीही दिसत आहे.
Armaan Malik Chain Snatching: युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा नेहमी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिक हा अडचणींचा सामना करत आहे. अरमानची पत्नी आणि त्याच्या मुलांची तब्येत खराब झाली होती. आता अरमान मोठं नुकसान झालं आहे. त्याच्यासोबत चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे. अरमानची चेन चोरीला गेली आहे.
City Of Dreams Season 3 : 'सिटी ऑफ ड्रीम्स 3' (City Of Dreams) या सीरिजचे दोन्ही सीझन सुपरहिट ठरले आहेत. आता या बहुचर्चित सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने सीरिजबद्दलची त्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सत्तेसाठीचा संघर्ष प्रेक्षकांना या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. स्वप्नांच्या नगरीवर राज्य करण्यात कोण कशापद्धतीने यशस्वी होतं हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
City Of Dreams 3 : साम दाम दंड भेद... 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! जाणून घ्या कधी होणार रिलीज?
Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीच्या सीझन 2 (Bigg Boss OTT 2) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? जे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या सीझनमध्ये विविध सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यामधील दिव्या अग्रवाल ही बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची विजेती ठरली होती. आता बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सहभागी होणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आता या चर्चेवर आदित्यनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे.
Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये वेगवेगळे ट्वीस्ट येत असतात. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मल्हारच्या स्वप्नात वैदेही येते. या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हा लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
Keerthy Suresh Wedding Rumours : दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश (Keerthy Suresh) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. उद्योगपती फरहान बिन लियाकतसोबत किर्ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. पण आता अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडलं आहे. ट्वीट करत तिने नेटकऱ्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे.
Hrithik Roshan JR NTR War 2 Release Date : बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर (JR NTR) सध्या 'वॉर 2' (War 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. अद्याप निर्मात्यांनी या सिनेमासंदर्भात माहिती दिलेली नाही. पण ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरने मात्र या सिनेमासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. 'वॉर 2' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या मालिकेत आजही नव-नवे ट्विस्ट येत आहेत. आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत आजपासून अरुंधती दिसणार नाही. अरुंधतीच्या परदेशवारीला अखेर सुरुवात झाली आहे.
The Kerala Story Story Box Office Collection : सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाला भारतीय सिनेप्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत या सिनेमाने 200 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Ray Stevenson Death : एस. एस. राजामौलींच्या (S. S. Rajamouli) ऑस्कर विजेत्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील अभिनेते रे स्टीवेन्सन (Ray Stevenson) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रे स्टीवेन्सन यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Ray Stevenson Passes Away : 'RRR' फेम अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे निधन; वयाच्या 58 वर्षी घेतला अखेरचा श्वास
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Aditya Singh Rajput Death: अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू
Aditya Singh Rajput Demise: प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचा (Aditya Singh Rajput) मृत्यू झाला आहे. आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी (Andheri) येथील घरातील बाथरूममध्ये आढळला. आदित्यच्या एका मित्राला आदित्य हा मृतावस्थेत आढळला, त्यानंतर त्या मित्राने आणि इमारतीच्या वॉचमॅनने आदित्यला रुग्णालयात नेले. रुग्णालयात आदित्यला मृत घोषित करण्यात आले. आदित्यच्या मृत्यूमागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.
Raghav Chadha, Parineeti Chopra: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी शेअर केले खास फोटो
Raghav Chadha, Parineeti Chopra: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडला. नुकतेच परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
परिणीतीनं तिच्या आणि राघव यांच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'आम्ही एकदा नाश्ता एकत्र केला. त्यानंतर मला माहित झाले की मी योग्य व्यक्तीला भेटले आहे. तो सर्वात अद्भुत माणूस ज्याचा स्वभाव शांत आणि प्रेरणादायक आहे. त्याचा पाठिंबा, विनोद बुद्धी आणि मैत्री ही निखळ आनंद देणारी आहे. तो माझ्या घरासारखा आहे. आमची एंगेजमेंट पार्टी एक स्वप्न जगण्यासारखी होती. हे स्वप्न प्रेम, आनंद, भावना आणि डान्स या गोष्टींनी सुंदरपणे फुलणारे होते.'
Sara Ali Khan : सारा अली खान पोहोचली अजमेर शरीफ दर्ग्यात
Sara Ali Khan Zara Hatke Zara Bachke : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सारा सध्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाचं प्रमोशन करत असून आता या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिने राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -